मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दारिद्र रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भूमिहीन कुटुंबांना उत्पन्नाचे साधन म्हणून जमीन खरेदीकरीता दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभीमान योजनेंतर्गत संपूर्ण अनुदान देण्यात येणार असून शेत जमिन खरेदीसाठी लागणाऱ्या अनुदानातही वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी विधानसभेत केली. विधानसभेतयासंबंधिचा तारांकित प्रश्न नाशिक मध्यच्या आमदार …
Read More »डॉ. अमोल कोल्हेंच्या उपस्थितीत शंभूराजांचा बलिदान स्मरणदिन वढू बुद्रुक येथे कार्यक्रम साजरा
पुणे : प्रतिनिधी डॅा. अमोल कोल्हे यांनी आजवर लक्षवेधी अभिनयकौशल्याच्या बळावर पडद्यावरील विविधांगी व्यक्तिरेखा सजीव केल्या आहेत. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अबालवृद्धांच्या मनातील शिवराय साकारल्यानंतर धर्मवीर संभाजी महाराजही त्यांनी आपल्या अभिनयाद्वारे सजीव केले. रंगभूमीवर गाजलेल्या ‘शंभू राजे’ या नाटकानंतर अमोल सध्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या …
Read More »असंघटीत कामगारांसाठी ३१ मार्च पर्यंत कामगार सुरक्षा मंडळ स्थापणार वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी सल्लागार समिती गठीत करण्याचे कामगार मंत्र्यांचे आश्वासन
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ३ कोटी ६५ हजार असंघटीत कामगारांसाठी ३१ मार्च पर्यंत कामगार सुरक्षा मंडळ स्थापन केले जाणार आहे. या मंडळांतर्गत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठीही सल्लागार समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत शिवसेनेचे सदस्य सुनिल प्रभू, सुनिल राऊत, अशोक पाटील, …
Read More »दिव्यांगांच्या अनुदानात वाढ करणार एक महिन्यात निर्णय घेणार असल्याची सामाजिक न्यायमंत्री बडोलेचे आश्वासन
मुंबई : प्रतिनिधी सामाजिक न्याय विभागातर्फे चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना ९०० रुपयांचे अनुदान देण्यात येते. मात्र या अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय येत्या महिनाभरात घेण्यात येईल, असे आश्वासन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज विधान परिषदेत दिले. यासंबंधीचा तारांकित प्रश्न डॉ. अपूर्व हिरे, …
Read More »भटक्या- विमुक्त व इतर मागासवर्गीच्या आर्थिक उन्नतीसाठी सरकार उदासीन मिलिटरी आणि पोलिस पूर्व भरती प्रशिक्षण, स्पर्धा परिक्षांच्या केंद्रांबाबत अद्याप निर्णय नाही
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील भटक्या व विमुक्त जाती जमाती आणि इतर मागासवर्गांच्या आर्थिक कल्याणांकरीता राज्य सरकारने स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले. मात्र तरीही या मंत्रालयाकडून या समाजातील विद्यार्थ्यांना शासकिय विभागांमध्ये नोकऱ्याच्या संधी मिळाव्यात, संगणकाचे ज्ञान व्हावे याबाबत कोणतीही हालचाल करण्यात येत नसल्याचे उघडकीस आले असून या समाजाला आर्थि उन्नतीचे पर्याय उपलब्ध …
Read More »अस्मिता योजनेसाठी वितरक म्हणून २ हजार ३७२ बचतगटांची नोंदणी दोन हजार गावांपर्यंत पहिल्याच आठवड्यात पोहोचली अस्मिता योजना
मुंबई : प्रतिनिधी अस्मिता योजनेतून किशोरवयीन मुली आणि महिलांना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करुन देण्यासाठी वितरक म्हणून अवघ्या एका आठवड्यात २ हजार ३७२ बचतगटांनी नोंदणी केली आहे. या माध्यमातून हे बचत गट कार्यरत असलेल्या साधारण दोन हजार गावांपर्यंत पहिल्याच आठवड्यात ही योजना पोहोचली आहे. अस्मिता फंडालाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ११ हजार ४३९ मुलींच्या सॅनिटरी नॅपकीनसाठी ५१८ जणांनी स्पॉन्सरशिप स्विकारली आहे. यातून सुमारे २० लाख ८६ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. किशोरवयीन मुलींना फक्त पाच रुपयांत तर महिलांना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करुन देणे, त्याच्या वितरण व्यवसायातून बचतगटांच्या महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दुहेरी उद्देशाने जागतिक महिला दिनी अस्मिता योजनेचा शुभारंभ करण्यात आला. सॅनिटरी नॅपकीनच्या विक्रीसाठी आवश्यक असलेल्या मोबाईल ॲपवर नोंदणी करण्यासाठी मागील आठ दिवसात बचतगटांचा चांगला प्रतिसाद …
Read More »राज्यात नव्या वीस वसतिगृहांची मुहूर्तमेढ दोन हजार मुलामुलींच्या निवासाची सोय होणार असल्याची मंत्री बडोलेंची माहिती
मुंबई : प्रतिनिधी अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सामाजिक न्याय विभाग तत्पर असून त्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी निवासाच्या सोयी निर्माण व्हाव्यात यासाठी या वर्षी राज्यात तब्बल वीस नवीन वसतिगृहांसह निवासी शाळांच्या बांधकामास मंजुरी दिली आहे. या वसतिगृहात दोन हजार विद्यार्थी विद्यार्थीनींच्या निवासाची सोय होणार आहे, …
Read More »सावित्रीच्या लेकी…आम्ही कारभारणी महिला दिनानिमित्त सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील निवडक महिलांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख
चूल आणि मुल इतक्यावरच न थांबता काही वेगळे प्रयोग करुन समाजापुढे आदर्स निर्माण करणाèया तेजस्विनी आजही या महाराष्ट्रात कार्यरत आहेत. वेगवेगळया क्षेत्रात त्या आपले नाव झळकावताहेत. मात्र, हे वेगळेपण जपताना प्रसिध्दिपासून दुर अशा सामाजिक कार्याला वाहून घेणाऱ्या काही तेजस्विनींची ही ओळख… गतीमंदासाठी तिने विकले घरदार जयश्री ! आईवडीलांची एकुलती एक …
Read More »प्लास्टिक थर्माकोलपासून बनविलेल्या प्लेटस्, ताट, वाट्या लवकरच बंद बंदीसंदर्भातील अधिसूचना काढणार असल्याची पर्यावरण मंत्र्यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात संपूर्ण प्लास्टिक व थर्माकोल बंदी संदर्भात प्रारुप अधिसूचनेचा आराखडा तयार करण्यात आला असून तो शासनाच्या राजपत्रात लवकरच प्रसिद्ध केला जाईल असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले. ते आज मंत्रालयात प्लास्टिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत बोलत होते. पर्यावरण मंत्री कदम म्हणाले की, महाराष्ट्रात प्रतीदिन १८०० टन प्लास्टिक कचरा निर्माण …
Read More »काय असते तबलिगी इज्तेमा? औरंगाबादेत नुकत्याच पार पडलेल्या इज्तेमाच्या पार्श्वभूमीवर
औरंगाबाद : जगदीश कस्तुरे नुकताच औरंगाबादला लाखो लोकांच्या उपस्थितीत “तबलिगी इज्तेमा” सुरु झाला आहे. त्यानिमीत्ताने हा काय प्रकार असतो याचे कुतुहल मराठी माणसांत जागं झालं आहे. म्हणून आपण तबलिगी जमातचा आधी परिचय करून घेऊ. पाठीवर भलेमोठे बॅग, पिशव्या, गाठोडं वगैरे घेतलेले कुर्ता, पायजामा घातलेले लांब लांब दाढी, टोपीवाल्यांचा जत्था रस्त्याने …
Read More »
Marathi e-Batmya