सामाजिक

नोंदणीकृत कामगारांची संख्या वाढवून सुविधा द्या कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे निर्देश

राज्यात असंघटीत क्षेत्रातील कुठलाही कामगार नोंदणीपासून वंचित राहू नये. यासाठी विभागाने कामगारांची मोहिम स्तरावर नोंदणी करावी. नोंदणीकृत कामगारांना सुविधांचा लाभ द्यावा, असे निर्देश कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री खाडे बोलत होते. बैठकीला कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता वेद …

Read More »

सामुदायिक सोहळ्यातील विवाहासाठीच्या अनुदानात २५ हजारांची वाढ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

आदिवासी तसेच आर्थिक दुर्बल घटकातील वधू-वर सामुदायिक विवाह सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. सामुदायिक विवाहसोहळ्यातील विवाहासाठीच्या अनुदानात २५ हजारांपर्यंत वाढ करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली. पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार रवींद्र फाटक, राजेश पाटील, श्रीनिवास वनगा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष …

Read More »

शरद पवार यांचा इशारा; एक शुद्र, अति शुद्र असे वातावरण समाजामध्ये… कष्ट करण्याचे काम तुमचे आणि धनसंपत्ती ठेवायचे काम मालकांचे

संपत्ती मिळवायची आणि ठेवायचा अधिकार फक्त आमचा आहे आणि कष्ट करणारी जमात ही तुमची आहे. कष्ट करण्याचे काम तुमचे आणि धनसंपत्ती ठेवयाचे काम मालकांचे. त्यामुळे एक शुद्र, अति शुद्र असे वातावरण समाजामध्ये करून आज काही लोक मालकांच्या नावाने एक वेगळा निकाल घेत आहेत. तो निकाल त्यांना घ्यायचा असेल तर माथाडी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेसाठी चार तात्पुरती बस स्थानके उभारणार पंढरपूर आषाढी यात्रेसाठी जादा बस वाहतुकीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरयात्रेकरिता वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातून ५ हजार विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. २५ जुन ते ०५ जुलै या दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी (२७ जुन रोजी) २०० अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पंढरपूर …

Read More »

परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांना संधी देणारे डॉ. राम ताकवले याचं निधन नाशिकच्या मुक्त विद्यापीठाचे पहिले कुलगुरु, एमकेसीएलचे संस्थापक, पुणे विद्यापाठीचे कुलगुरु

ज्येष्ठ शिक्षण तज्ञ व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे पहिले कुलगुरू व राष्ट्रसेवा दल व समाजवादी विचारसरणीचे विचारवंत प्रो. राम ताकवले यांचे आज निधन झाले. मुक्त विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, सोबतच पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिले होते. महाराष्ट्र ज्ञानमंडळाची स्थापना (एमकेसीएल) झाली त्यामध्ये संस्थापक संचालक म्हणूनही त्यांनी भूमिका बजावली होती. …

Read More »

संत चोखोबाराय मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

महाराष्ट्र संतांची भूमी आहे. समाजप्रबोधन करण्याचे काम संत विचारांनी केले आहे. याच विचारांचा वसा घेऊन शासन वाटचाल करीत आहे. इसरूळ येथील श्री संत चोखोबारायांचे मंदिर आणि ही भूमी तीर्थस्थळ म्हणून विकसित होण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. संत चोखोबारायांची जन्मभूमी असलेल्या मेहुणा …

Read More »

अनुसूचित जाती, जमाती, मराठा, ओबीसींसाठींच्या शैक्षणिक योजनांमध्ये एकसूत्रता ठेवा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश

अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधा देण्यासाठी शासन खूप सकारात्मक आहे. बार्टी, टीआरटीआय, सारथी आणि महाज्योती या चारही संस्थांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या शैक्षणिक योजनांमध्ये एकसूत्रता असावी आणि विद्यार्थ्यांना समान लाभ देण्यासाठी या चारही संस्थांनी समन्वय ठेवावा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील …

Read More »

आणि सुषमा अंधारे यांनी शरद पवारांच्या मदतीचा किस्सा सांगत भर कार्यक्रमातच रडल्या शरद पवारांनी एक फोन केला आणि पाच तासात मी दिल्लीत त्यांच्यासमोर हजर होते

शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पुरोगामी चळवळीतील महिला नेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर ठाकरे गटानेही त्यांची उपनेत्या आणि प्रवक्त्या म्हणून नियुक्ती केली. परंतु बंडखोरीवरून शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्री यांना आपल्या वकृत्वाने सुषमा अंधारे यांनी चांगलेच घायकुतीला आणले. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून अश्वाघ्य पध्दतीने सुषमा अंधारे यांच्यावर …

Read More »

अल्पसंख्याक समाजासाठीच्या कर्ज योजनेसाठीच्या अर्जाची मुदत पुन्हा वाढविली इच्छुकांचा चांगला प्रतिसाद असल्याने ३१ मेपर्यंत नवीन अर्ज करण्याची संधी

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत कर्ज स्वरुपात उपलब्ध होणाऱ्या निधीतून राज्यात अल्पसंख्याक समाजासाठी व्यवसाय, उद्योग सुरु करण्याकरीता राबविण्यात येणाऱ्या मुदत कर्ज योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. संपूर्ण राज्यभरातून मुदत कर्ज योजनेअंतर्गत १ हजार ५५३ अर्ज विविध जिल्हा कार्यालयामध्ये प्राप्त झाले आहेत. ११ नोव्हेंबर २०२२ रोजी भारतरत्न मौलाना अबुल …

Read More »

दोन वर्षांत सर्व आदिवासी आश्रमशाळांच्या वसतिगृहांचे बांधकाम पूर्ण करणार आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांची ग्वाही

आदिवासी आश्रमशाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविणेही राज्य शासनाची प्राथमिकता असून येत्या दोन वर्षात राज्यातील सर्व आश्रमशाळांमधील वसतीगृहांचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच आदिवासी आश्रमशाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्य शासन विशेष कार्यक्रम राबविणार आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांची दर दोन महिन्यातून तर शिक्षकांची दर तीन महिन्यातून परीक्षा घेण्यात येणार आहे अशी माहिती आदिवासी …

Read More »