सामाजिक

अनुसूचित जाती-नवबौद्ध समाजातील उद्योजकांना १५ टक्के मार्जिन मनी देणार

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना प्रकल्पाच्या कमाल १५ टक्के मार्जिन मनी (Front end subsidy) देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया या योजनेतील अनुसूचित जाती व …

Read More »

शोषित, वंचितांच्या शोषणाविरूध्द आवाज उठविणाऱ्या पत्रकारास मूकनायक पुरस्कार देणार

३१ जानेवारीला दिल्लीत होणार दिमाखदार वितरण सामाजिक न्यायमंत्री बडोले यांची माहिती दिल्ली : प्रतिनिधी वंचित, शोषितांवरील अन्याय अत्याचाराला वाचा फोडून न्यायासाठी लेखणीलढा देणाऱ्या आणि सामान्याच्या अपेक्षांचे प्रतिबिंब राज्याच्या धोरणात प्रतिबिंबीत व्हावे यासाठी धडपडणाऱ्या पत्रकारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुकनायक पत्रकारीता पुरस्कार ३१ जानेवारीला दिल्लीमध्ये एका दिमाखदार समारंभात देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे …

Read More »

दिव्यांगांना स्वावलंबी करण्यासाठी मोबाईल शॉप देणार

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय : सामाजिक न्यायमंत्री बडोले यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) मोफत उपलब्ध करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यासाठी लाभार्थ्यांना कमाल पावणेचार लाख रुपये अनुदान मिळणार असल्याची माहिती सामाजिक …

Read More »

शाळाबाह्य मुलींसाठीच्या पूरक पोषणासाठी आता साडेनऊ रूपये मिळणार

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय मुंबई : प्रतिनिधी  शाळाबाह्य मुलींच्या पूरक पोषणासाठी राज्यातील अकरा जिल्ह्यांत केंद्र पुरस्कृत SAG ( Scheme for Adolescent Girls) अर्थात किशोरवयीन मुलींसाठी सुधारित योजना राबविण्यात येणार असून या योजनेच्या लाभात प्रतिदिन पाच रूपयांवरुन साडेनऊ रूपये एवढी वाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. याबरोबरच या मुलींना व्यावसायिक किंवा …

Read More »

ओबीसी मुस्लिमांच्या प्रश्नांसाठी मंत्री राम शिंदे यांना वेळच नाही

ऑल इंडीया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचा आरोप मुंबई : प्रतिनिधी मुस्लिम ओबीसी समाजाचे प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सोडविण्याबाबत वारंवार निवेदन देऊन सुद्धा ओबीसी मंत्री प्रा. राम शिंदे यांना वेळ नाही का ? असा संतप्त सवाल ऑल इंडिया मुस्लिम ओबीसीचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी उपस्थित केला. यावेळी अन्सारी म्हणाले की, …

Read More »

‘अक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मुळे देशाला दिला माहितीचा अधिकार

माहिती अधिकार कार्यकर्त्ये अनिल गलगली यांचे परखड मत मुंबई : प्रतिनिधी ज्या पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांस अक्सिडेंटल पंतप्रधान म्हणून हिणवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच अक्सिडेंटल पंतप्रधानानी देशाला दिला माहितीचा अधिकार देत सर्वसामान्य जनतेला रस्त्यांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून थेट पंतप्रधान यांस प्रश्न विचारण्याचा अधिकार प्राप्त झाल्याचे परखड मत माहिती …

Read More »

जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी समिती स्थापन करणार

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची माहिती  मुंबई : प्रतिनिधी  जादूटोणा विरोधी कायद्याची जनजागृती करण्यासाठी प्रचार व प्रसारासह या कायद्याची परिणामकारक व योग्यरितीने अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व तालुका स्तरावर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. जादूटोणा विरोधी कायदा …

Read More »

राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ.सदानंद मोरे यांची नियुक्ती

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या मराठी भाषा विभागाच्या राज्य साहित्य व संस्कृती मंडळावरील अध्यक्ष व सदस्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. या मंडळाच्या अध्यक्ष पदी ज्येष्ठ विचारवंत डॉ.सदानंद मोरे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यासह अन्य ३५ नव्या सदस्यांची नियुक्तीही करण्यात आल्याचा शासन निर्णय आज बुधवारी जारी करण्यात …

Read More »

मंत्री बडोले यांच्यामुळे सरळसेवा भरतीत पुन्हा समांतर आरक्षण सामान्य प्रशासनाकडून अखेर आदेश जारी

मुंबई : प्रतिनिधी शासन सेवेत सरळसेवा भरती करताना आता पुन्हा समांतर आरक्षण सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, वि.जा.भ.ज., वि.मा.प्र. आणि एसईबीसी समाजघटकांना दिलासा मिळाला. यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने तगादा लावला. त्यामुळे …

Read More »

महार बटालियन आणि शौर्याचा इतिहास सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचा खास लेख

आताच्या नवबौध्द आणि पूर्वाश्रमीच्या महार जातीच्या पराक्रमी इतिहासाची मोठी परंपरा आहे. लढवय्या महारांना आपल्या पुर्वजांकडून मिळालेल्या अंगभूत नैसर्गिक साहसी गुणामुळे त्यांनी आपला इतिहास घडवता आला. डॉ. बाबसाहेब आंबेडकरांनी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक अशा सर्वच आघाड्यांवर प्रस्तापितांच्या अन्यायाविरोधी दिलेली कडवी झुंज याची साक्ष आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या …

Read More »