हॉवर्ड लुटनिक म्हणाले, भारताशी व्यापारी चर्चा पूर्ण करणार पण… रशियाकडून क्रुड ऑईल विकत घेणे थांबविल्यानंतर

नवी दिल्लीने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवल्यानंतर भारतासोबत व्यापार करार पुढे जाऊ शकतो असे अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी संकेत दिले.

प्रमुख व्यापार प्राधान्यांबद्दल सीएनबीसीशी बोलताना हॉवर्ड लुटनिक म्हणाले, “ठीक आहे, आम्ही भारताशी तोडगा काढणार आहोत,” असे सांगून त्यांनी पुढे म्हटले की, भारताने रशियन तेल आयात बंद करावी यावर प्रगती अवलंबून आहे. व्यापार आणि ऊर्जा धोरणांवरून दोन्ही देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर लुटनिक यांचे हे विधान आले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “प्रिय मित्र” असे संबोधल्यानंतर लुटनिक यांनी भारतासोबतच्या संबंधांवर सामंजस्यपूर्ण टिप्पणी केली.

ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, ते येत्या आठवड्यात त्यांचे “खूप चांगले मित्र” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलण्यास उत्सुक आहेत, व्यापारातील अडथळे दूर करण्यासाठी वाटाघाटी सुरू आहेत आणि दोन्ही देशांसाठी “यशस्वी निष्कर्ष” निघेल असा विश्वास व्यक्त केला.

पंतप्रधान मोदींनी उत्तर देताना म्हटले की, “भारत आणि अमेरिका हे जवळचे मित्र आणि नैसर्गिक भागीदार आहेत. मला विश्वास आहे की आमच्या व्यापार वाटाघाटी भारत-अमेरिका भागीदारीच्या अमर्याद क्षमता उघडण्याचा मार्ग मोकळा करतील.”

 

About Editor

Check Also

इराण आणि अमेरिका दरम्यानची पाकिस्तानातील चर्चा ठरली अखेर अपयशी २१ तास मॅरेथॉन चर्चा कोणत्याही कराराविना संपली

इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यातील अत्यंत महत्त्वाच्या चर्चेचा उद्देश दोन आठवड्यांच्या नाजूक शस्त्रसंधीला कायमस्वरूपी बनवणे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *