विशेष बातमी

अमित शाह यांचे नाव घेतल्या प्रकरणी राहुल गांधी यांना भाजपाची हक्कभंगाची नोटीस २८ तारखेपर्यंत नोटीसीला उत्तर देण्याचे आदेश

भाजप खासदारांनी दाखल केलेल्या हक्कभंगाच्या तक्रारीसंदर्भात लोकसभा सचिवालयाने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, २०२६ वरील चर्चेदरम्यान केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांना २८ ऑगस्टपर्यंत आपले उत्तर सादर करण्यास सांगण्यात आले आहे. ही नोटीस लोकसभा अध्यक्षांच्या सचिवालयाच्या वतीने जारी करण्यात आली आहे. लोकसभेच्या कार्यपद्धती आणि …

Read More »

मोदींवरील टीकेवेळी मेलोनी यांचा संदर्भ, सरकारची राहुल गांधी यांना सूचना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी इटलीशी संबध विस्तारले असल्याची माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि संदीप दीक्षित यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा उल्लेख केल्यानंतर, परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी राजनैतिक संवादात परस्पर आदराची अपेक्षा व्यक्त केली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, अलीकडच्या काळात भारताचे इटलीसोबतचे संबंध “सर्वच बाबतीत” विस्तारले आणि बळकट …

Read More »

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भाजपा, पंतप्रधान मोदी आणि आरएसएसवर टीका मेलोनी प्रकरणावरून मोदी यांच्यावर केली टीका

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी मंचावर काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांना मिठी मारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासह परदेशी नेत्यांना दिलेल्या मिठीवर टीका केली. रचनात्मक काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना राहुल गांधी म्हणाले, “त्यांना (पंतप्रधान मोदींना) ही कल्पना कुठून सुचली हे मला माहीत नाही. लोकांच्या डोक्यात …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांनी ज्या ठिकाणी भाषण केले त्या ठिकाणाचे भाजपा समर्थकांकडून शुद्धीकरण उत्तराखंडमधील श्री राम सेना संघटनेचे काम, अशा घटनांना भाजपचा पाठिंबा नाही

भाजपशासित उत्तराखंडमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ज्या ठिकाणी सभेला संबोधित केले होते, त्या ठिकाणी ‘शुद्धीकरण’ विधी पार पडल्याचे सांगितल्यानंतर राज्यसभेत मोठा गदारोळ झाला. मल्लिकार्जून खर्गे यांनी हा मुद्दा उपस्थित करताच, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी या घटनेला “दुर्दैवी” म्हटले आणि भाजप अशा उपक्रमांना पाठिंबा देत नाही, असे सांगितले. …

Read More »

पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी संसदेत नरेंद्र मोदी-अमित शाह हजर, वंदे मातरमने सुरुवात कामकाजाला सुरुवात पण कामकाज संपवले

पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, गुरुवारी लोकसभेच्या कामकाजाची सुरुवात ‘वंदे मातरम’ने झाली. संसदेच्या इतिहासात असे प्रथमच घडले असून, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि सभागृह पूर्ण क्षमतेने उपस्थित होते. दरम्यान संपूर्ण अधिवेशात काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीने विद्यार्थ्यांच्या विरोधात वापरण्यात आलेल्या लाठीचार्ज, पॅलेट गन …

Read More »

माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर निहंग जसपाल सिंग यांचा कृपानने हल्ला बादल यांच्या हाताला किरकोळ दुखापत

शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर गुरुवारी महाराष्ट्रातील नांदेड येथील गुरुद्वारात धारदार शस्त्राने हल्ला झाला, असे पोलिसांनी सांगितले. हा हल्ला दुपारी १.४५ च्या सुमारास गुरुद्वारा माता साहिब देवन जी मुगत येथे झाला, जिथे बादल भेट देण्यासाठी गेले होते. हल्लेखोराची ओळख निहंग जसपाल सिंग तेजपाल …

Read More »

सरन्यायाधीश सुर्यकांत यांना निमंत्रित करण्यास विरोध, बीसीआयची थेट विद्यार्थ्यांच्या वकिल नोंदणीवर बंदी हैद्राबादच्या नालसार विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर बंदीची बीसीआयचा निर्णय

विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांना निमंत्रित करण्याच्या निर्णयाला काही विद्यार्थ्यांनी विरोध केल्यामुळे निर्माण झालेल्या वादामुळे, ‘नालसार’ (NALSAR) मधील २०२६ मध्ये कायद्याचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची वकील म्हणून नोंदणी ‘बार कौन्सिल ऑफ इंडिया’ने (BCI) तूर्तास स्थगित केली आहे. बीसीआय BCI ने कुलगुरूंकडून याप्रकरणी अहवाल मागवला असून, …

Read More »

अभिजीत दीपके यांची घोषणा, जंतर मंतर सीजन-२ लवकरच बैठकीसाठी हॉल न देण्यासाठी भाजपाचा मालकांवर दबाव

कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) बुधवारी लवकरच नवीन आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली असून, संस्थापक अभिजित दीपके यांनी याला “जंतर मंतरचा सीझन २” म्हटले आहे. दिल्लीतील नारायणा येथे सीजेपी स्वयंसेवकांची बैठक ऐनवेळी रद्द झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. अभिजीत दीपके यांनी आरोप केला की, सत्ताधारी भाजपाच्या “दबावामुळे” बँक्वेट हॉलच्या मालकाने बुकिंग …

Read More »

विरोधकांच्या विरोधानंतर एफसीआरए विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवले संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारचा निर्णय

विरोधी पक्षांच्या विरोधानंतर आणि आक्षेपांनंतर केंद्राने लोकसभेत प्रस्ताव मांडल्यावर, परकीय योगदान (नियमन) सुधारणा विधेयक, २०२६ बुधवारी संयुक्त संसदीय समितीकडे (JPC) पाठवण्यात आले. हा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. प्रस्तावित कायदा अल्पसंख्याकांना लक्ष्य करतो, या विरोधी पक्षाच्या आरोपावरून अखिलेश यादव आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्यातही जोरदार वाद झाला. …

Read More »

सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नात पंतप्रधान मोदी, मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी हास्यविनोदात प्रियांका गांधी वाड्राही लग्न सोहळ्यात उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि इतर काँग्रेस नेत्यांसोबत हलक्याफुलक्या गप्पा मारत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (सपा) खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला असल्याचा दिशाभूल करणारा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ लग्नाच्या रिसेप्शनमधील नाही. या …

Read More »