कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) बुधवारी लवकरच नवीन आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली असून, संस्थापक अभिजित दीपके यांनी याला “जंतर मंतरचा सीझन २” म्हटले आहे. दिल्लीतील नारायणा येथे सीजेपी स्वयंसेवकांची बैठक ऐनवेळी रद्द झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. अभिजीत दीपके यांनी आरोप केला की, सत्ताधारी भाजपाच्या “दबावामुळे” बँक्वेट हॉलच्या मालकाने बुकिंग रद्द केले.
प्रसारमाध्यमांना संबोधित करताना अभिजीत दीपके म्हणाले की, पक्षाला सोशल मीडियावर विचारणा करणारे संदेश येत आहेत की त्यांच्या जंतर मंतर आंदोलनाचा दुसरा टप्पा कधी सुरू होईल.
अभिजीत दीपके पुढे म्हणाले की, अनेक लोक इन्स्टाग्रामवर ‘जंतर-मंतर’चा सीझन २ कधी सुरू होईल याबद्दल कमेंट करत होते. मला त्यांना सांगायचे आहे की ‘जंतर-मंतर’चा सीझन २ लवकरच सुरू होणार आहे, असल्याचे सांगितले.
अभिजीत दीपके म्हणाले की, पक्षाने आपल्या स्वयंसेवकांच्या बैठकीसाठी एक हॉल आरक्षित केला होता, परंतु आयोजक जेव्हा त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. आयोजकांना सांगण्यात आले की, बैठकीला परवानगी न देण्यासाठी मालकांवर ‘दबाव’ होता. आज दिल्लीत आमच्या स्वयंसेवकांची बैठक होणार होती. आम्ही हॉलच्या शोधात होतो, पण कोणीही आम्हाला भाड्याने देत नव्हते. वरून दबाव आहे, असे सगळेजण म्हणत होते, असेही सांगितले.
अभिजीत दीपके यांनी पुढे बोलताना असा आरोप केला की, परिसरातील इतर ठिकाणांवरूनही सीजेपी-कॉकरोच जनता पार्टीला अशाच प्रकारच्या नकारांचा सामना करावा लागला आणि पक्षाच्या बैठकांसाठी जागा देण्याविरोधात लोकांना धमकावले जात असल्याचे सांगितले.
We want an India where children carry the tricolour to school, not sell it at traffic signals out of poverty.#SchoolThikKaro pic.twitter.com/6yGIJdnTwt
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) August 12, 2026
अभिजीत दीपके यांनी पुढे असाही आरोप केला की, बैठकीसाठी अखेरीस मिळालेल्या जागेवर कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी दबाव आणला गेला आणि सीजेपीच्या बैठकीला परवानगी दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी तेथील मालकांना देण्यात आली. “त्यांना सांगण्यात आले की, जर त्यांनी येथे सीजेपीच्या बैठकीला परवानगी दिली, तर त्यांना उलटे टांगले जाईल,” असा गंभीर आरोपही केला.
सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी या दबावासाठी भाजपाला जबाबदार धरले आणि सांगितले की, अशा कृतींमुळे पक्ष आपले कार्य सुरू ठेवण्यापासून परावृत्त होणार नाही.
पुढे बोलताना अभिजीत दीपके म्हणाले की, हे सर्व भाजप करत आहे. त्यांच्या कृती आणि शब्दांवरून हे स्पष्टपणे दिसून येते की ते देशातील तरुणांना घाबरतात. अशा क्षुल्लक कृत्यांनी आम्ही घाबरू, असे त्यांना वाटत असेल तर त्यांचा मोठा गैरसमज आहे. तुम्ही कितीही धमक्या दिल्या तरी आम्ही घाबरणार नाही, असा इशाराही यावेळी सांगितले.
अभिजीत दीपके यांच्या या आरोपांवर भाजपने तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास म्हणाले की, पक्षाच्या संघटन मोहिमेचा पुढचा टप्पा आधीच सुरू झाला असून, त्यात जनतेचा अभिप्राय जाणून घेण्यासाठी देशव्यापी मोहिमेचा समावेश असेल. सीजेपीच्या वतीने, जनतेचे म्हणणे ऐकण्यासाठी आम्ही आता देशव्यापी ‘पब्लिक क्या बोलती है दौरा’ सुरू करत आहोत. आम्ही एक मोहीम राबवू आणि स्वातंत्र्यदिनापासून शिक्षणाच्या मुद्द्याला प्राधान्य देत आहोत, असेही सांगितले.
Children in the villages are the future of India too! #SchoolThikKaro pic.twitter.com/MnAXThIsCB
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) August 12, 2026
सौरव दास पुढे म्हणाले, हाच तर दुसरा सीझन आहे. अशा अकार्यक्षम सरकार आणि अधिकाऱ्यांविरोधात देशभरात आंदोलने होत आहेत.
नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सीजेपीने दिल्लीतील जंतर मंतर येथे ३६ दिवसांचे आंदोलन केले होते. या आंदोलनात देशभरातील विद्यार्थी, तरुण स्वयंसेवक आणि विरोधी पक्षनेते सहभागी झाले होते. कार्यकर्ते सोनम वांगचुक २८ जून रोजी आंदोलनात सामील झाले आणि प्रकृती खालावल्यानंतर सफदरजंग रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी त्यांनी अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू केले.
२० जुलै रोजी आंदोलकांनी संसदेकडे मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी कारवाई केली. सरकारसोबत चर्चा झाल्यानंतर आणि आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांबाबत आश्वासन मिळाल्यानंतर २५ जुलै रोजी आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर सीजेपीने आपला राष्ट्रीय संघ जाहीर केला आणि व्यापक संघटनात्मक रचना उभारण्याच्या दिशेने वाटचाल करत दीपके यांची राष्ट्रीय संयोजक म्हणून नियुक्ती केली.
Marathi e-Batmya