विशेष बातमी

जळगांव परधाडे येथे रेल्वे दुर्घटनाः घाबरून एका रेल्वेतून उतरले अन् दुसऱ्या चिरडले अर्धा तास झाला तरी मध्य रेल्वेकडून अद्याप अधिकृत माहिती नाही

मुंबईकडे येणाऱ्या पुष्पक रेल्वे एक्सप्रेसमध्ये आग लागल्याच्या अफवेमुळे जळगांव रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर काही वेळातच परधाडे रेल्वे स्थानकाच्या जवळ रेल्वे थांबवित रेल्वेतून खाली उतरले अन् त्याच रेल्वे ट्रॅकच्या समांतर असलेल्या दुसऱ्या ट्रॅकवर पोहोचले. मात्र त्यावेळी त्याच दुसऱ्या ट्रॅकवरून बंगरूळकडे निघालेल्या भरधाव वेगातील बंगळूरु एक्सप्रेस तेथून जात होती. त्यावेळी या पुष्पक एक्सप्रेसच्या …

Read More »

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डब्लूएचओतून घेतली माघारः भारतवर परिणाम? डब्लूएचओच्या निधीवर होणार परिणाम आणि धोक्याच्या इशाऱ्यावर होणार परिणाम

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पदभार स्वीकारण्याच्या पहिल्याच दिवशी जागतिक आरोग्य संघटनेतून अर्थात डब्लूएचओ WHO संघटनेतून बाहेर पडण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. आदेशात म्हटले आहे की माघार घेण्याची कारणे डब्लूएचओ WHO ने कोविड-१९ “COVID-19 साथीच्या आजाराचे चुकीचे व्यवस्थापन” केले आहे, “तातडीच्या आवश्यक सुधारणा स्वीकारण्यात अपयश”, “डब्लूएचओ WHO सदस्य देशांच्या …

Read More »

अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प तर उपाध्यक्ष म्हणून जेडी व्हान्स यांनी घेतली शपथ व्हाईट हाऊसमध्ये पार पडला शपथविधी सोहळा

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “अमेरिकेचा सुवर्णकाळ आत्तापासून सुरू होत आहे” आणि दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांनी २० जानेवारी रोजी एका अंतर्गत समारंभात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पुनरागमन केले. रिपब्लिकन नेत्याने अलीकडील निवडणुकीत व्हाईट हाऊसमध्ये अभूतपूर्व पुनरागमन केले – महाभियोग, गुन्हेगारी आरोप आणि दोन हत्येच्या प्रयत्नांवर मात करून. “न्यायाचे प्रमाण …

Read More »

मद्रास आयआयटीचे संचालकांचे धक्कादायक वक्तव्य, गोमूत्रात औषधी मूल्य रिसर्च पेपर प्रसिद्ध करणार -सर्वस्तरातून तामीनळनाडूत टीकेची झोड

एकाबाजूला देशात सनातन धर्माच्या नावाखाली गाय ही लोकपोपयोगी पशू असली तरी त्या गाईते गोमूत्र पिणारे आणि गोबर खाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे देशातील अंधभक्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यातच आता मद्रास आयआयटी संचालक व्ही. कामकोटी यांनी गोमूत्रावर रिसर्च पेपर प्रसिद्ध करणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे व्ही कामकोटी …

Read More »

आरजी कार रूग्णालय बलात्कार आणि हत्या प्रकरणी संजय रॉयला जन्मठेप सियालदाह सत्र न्यायालयाचा निर्णय

कोलकाता येथील सियालदाह येथील सत्र न्यायालयाने आरजी कार बलात्कार आणि खून प्रकरणात मुख्य आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची आज शिक्षा सुनावली आहे. मागील आठवड्यात त्या प्रशिक्षार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी न्यायालयाने संजय रॉय यास न्यायालयाने दोषी ठरविले होते. तसेच या आठवड्यात शिक्षा सुनावणार असल्याचे जाहिर केले होते. त्यानुसार सत्र …

Read More »

युद्धबंदीनंतर हमासने इस्त्रायलच्या तीन ओलिसांची केली सुटका रेड क्रॉसकडे केले हस्तांतरण

हमास आणि इस्त्रायल मध्ये युद्धबंदी जाहिर करण्यात आल्यानंतर हमासने अपहरण केलेल्या तीन ओलिसांना रेड क्रॉसकडे सुटका करत त्यांच्याकडील आश्वासनाची पुर्तता केली. गाझामधील १५ महिन्यांहून अधिक काळ चाललेला संघर्ष या युद्धबंदीमुळे थांबला. घटनास्थळावरील छायाचित्रांमध्ये तीन महिला ओलिस – रोमी गोनेन, डोरॉन स्टाइनब्रेचर आणि एमिली दमारी – सशस्त्र हमास सैनिकांनी वेढलेल्या वाहनातून …

Read More »

एनटीएने जेईई मेन परिक्षेचे जाहिर केले वेळापत्रक २२ ते ३० तारीख या कालावधीत पार पडणार परिक्षा

एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने १८ जानेवारी रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर JEE मेन प्रवेशपत्र २०२५ जारी केले आहे. जेईई JEE मेन २०२५ परीक्षेचे प्रवेशपत्र jeemain.nta.nic.in वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. उमेदवार नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड यासारख्या लॉगिन क्रेडेंशियल्सचा वापर करून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. एनटीए NTA च्या अधिकृत …

Read More »

राष्ट्रपतींच्या हस्ते या खेळाडूंना खेलरत्न पुरस्कारांचे वितरण दिपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार, स्वप्निल कुसळे, सचिन खिल्लारी आणि मुरलीकांत पेटकर यांना अर्जुन पुरस्कार प्रदान

राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडप येथे आयोजित भव्य सोहळ्यात २०२४ च्या मेजर ध्यानचंद खेलरत्न, अर्जुन पुरस्कार आणि इतर राष्ट्रीय खेळ पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज करण्यात आले. पार पडलेल्या या सोहळ्यात देशभरातील अनेक खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांचा आज गौरव करण्यात आला. यामध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन ब्रॉन्झ मेडल जिंकणारी …

Read More »

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १४ वर्षाची शिक्षा भ्रष्टाचार प्रकरणी पत्नी बुशरा खानलाही ७ वर्षाची शिक्षा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ऑगस्ट २०२३ पासून अटकेत असलेल्या क्रिकेटस्टार कम राजकारणी यांना मिळालेली ही सर्वात मोठी तुरुंगवासाची शिक्षा आहे. पाकिस्तान तेहरीक ए इन्साफचे प्रमुख इम्रान खान यांच्यावर देशाची गुपिते उघड करण्यापासून ते पंतप्रधान म्हणून मिळालेली भेटवस्तू विकण्यापर्यंत …

Read More »

एनटीए घेणार एनईईटीची-एनईईटी युजी परिक्षा घेणार तीन तास २० मिनिटांची परिक्षा एकाच दिवसात होणार

राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) अधिकृतपणे सांगितले की २०२५ मध्ये पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा (एनईईटी) (एनईईटी यूजी २०२५) एकाच शिफ्टमध्ये, एकाच दिवशी आणि पेन आणि पेपर पद्धतीने, ओएमआर (ऑप्टिकल मार्क रिकग्निशन) प्रणाली वापरून घेतली जाईल. नोव्हेंबर २०२४ मध्ये, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एनईईटी युजी NEET UG त्याच्या पारंपारिक …

Read More »