पंतप्रधान मोदी यांनी उझेबेकिस्तानवरून परताना इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी केली चर्चा भारत आणि इराण व्यापार वाढविणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी बिश्केक येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदे दरम्यान इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी चर्चा केली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध, व्यापार आणि पश्चिम आशियातील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली.

पंतप्रधान मोदींनी सांगितले की, भारत भविष्यात इराणसोबतच्या आपल्या व्यापाराची व्याप्ती वाढवण्यास आणि त्यात विविधता आणण्यास उत्सुक आहे. तसेच, विविध क्षेत्रांत तेहरानसोबतची दीर्घकालीन मैत्री अधिक दृढ करण्याबाबत भारताची कटिबद्धता त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली.

पंतप्रधान मोदी यांनी बिश्केक येथे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांची भेट घेतली. विविध क्षेत्रांत इराणसोबतची भारताची दीर्घकालीन मैत्री अधिक दृढ करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला, असे पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटले.

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी यांनी आम्हाला भविष्यात आमच्या व्यापाराची व्याप्ती वाढवायची आहे आणि त्यात विविधता आणायची आहे. आम्ही या क्षेत्रातील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली. शाश्वत शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने केल्या जाणाऱ्या सर्व प्रयत्नांना भारत आपला पाठिंबा देत राहील, असेही त्यांनी नमूद केले.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, दोन्ही नेत्यांची “फलदायी बैठक” झाली; यात द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली आणि पश्चिम आशियातील अलीकडील घडामोडींचा आढावा घेण्यात आला.

सर्व समस्यांचे निराकरण संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातूनच केले जावे, या भारताच्या सातत्यपूर्ण भूमिकेचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला, असे रणधीर जयस्वाल यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

रणधीर जयस्वाल यांच्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी या प्रदेशात शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासोबतच जहाजवाहतूक आणि व्यापाराचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याच्या गरजेवरही भर दिला.

पश्चिम आशियातील तणाव आणि संघर्षामुळे प्रादेशिक स्थिरता, व्यापार आणि जहाजवाहतूक मार्गांसमोर आव्हाने निर्माण होत असतानाच ही बैठक झाली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या SCO शिखर परिषदेदरम्यान आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिन्यान यांच्याशीही स्वतंत्र द्विपक्षीय चर्चा केली.

बिश्केक येथील शांघाय सहकार्य संघटनेच्या SCO शिखर परिषदेदरम्यान आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिन्यान यांच्याशी झालेली भेट अतिशय उत्तम होती, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, संरक्षण, माहिती तंत्रज्ञान, अंतराळ, शिक्षण आणि औषधनिर्माण यांसारख्या क्षेत्रांत भारत आणि आर्मेनिया यांच्यातील सहकार्य वाढणार आहे. संरक्षण, माहिती तंत्रज्ञान, अंतराळ, शिक्षण, औषधनिर्माण आणि इतर क्षेत्रांत भारत-आर्मेनिया सहकार्य वाढण्यास सज्ज आहे. भविष्यात व्यापार आणि गुंतवणुकीचे संबंध अधिक दृढ होतील, याचीही आम्हाला खात्री आहे,असल्याचे सांगितले.

About Editor

Check Also

नेपाळ पुरातील मृतांची संख्या ७६८ वर पोहोचली , भोटेकोशी नदीच्या पाणी पातळीत वाढ सर्वांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून इशारा, बचाव आणि मदत कार्यावर परिणाम नको म्हणून सतर्कतेचा इशारा

देशाच्या मध्य भागातून आलेल्या विनाशकारी अचानक आलेल्या पुराच्या काही दिवसांनंतर, भोटेकोशी नदीतील पाण्याची पातळी पुन्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *