पॅरिस येथे होणाऱ्या ‘ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप २०२६’ या गेमिंग विश्वाच्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी ‘इंडिया रायझिंग’ आणि ‘जिओ ब्लास्ट’च्या माध्यमातून भारताचे दरवाजे खुले होत आहेत. महाराष्ट्रातील आणि देशातील प्रत्येक गुणवंत युवा गेमरला आता जागतिक स्तरावर आपल्या कौशल्याचा ठसा उमटविण्याची संधी उपलब्ध झाली असून, हा भारताच्या डिजिटल क्रिएटिव्ह अर्थव्यवस्थेच्या वाटचालीतील ऐतिहासिक टप्पा असल्याचे …
Read More »राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांना सवाल, तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय आहे? हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यत पसरला आहे?
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व , पश्चिम , उत्तर , दक्षिण भारतातील लोकं सर्रास बोलत आहेत. केंद्रातील लोकं वाट्टेल तसे वागत आहेत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच. पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे ? आणि तुम्ही तू पसरू देताय? असा …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, ॲट्रॉसिटी’ कायद्याअंतर्गत गुन्ह्यांमधील दोषसिद्धीचे प्रमाण वाढवा राज्यस्तरीय दक्षता व संनियंत्रण समिती बैठक
अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अर्थात ‘ॲट्रॉसिटी’ कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवन येथे अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंमलबजावणीसाठी गठीत राज्यस्तरीय दक्षता व संनियंत्रण समितीच्या बैठकीत दिले. या कायद्यासारख्या विशेष कायद्यामध्ये सरकारी वकिलांमार्फत दोषसिद्धी वाढविण्यासाठी करण्यात आलेल्या कार्याचा उल्लेख त्यांच्या मूल्यमापनात करण्याचे …
Read More »राज्यस्तरीय कृषी पुरस्कार २०२३-२४ चे वितरण नैसर्गिक व तंत्रज्ञानाधारित शेतीत महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल- राज्यपाल जिष्णु देव वर्मा
दिवंगत वसंतराव नाईक यांनी शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी दूरदृष्टीने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. सत्तरच्या दशकात महाराष्ट्र भीषण दुष्काळाचा सामना करत असताना त्यांनी कृषी क्षेत्राला नवी दिशा दिली. राज्यात कृषी विद्यापीठांच्या स्थापनेत त्यांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम येथे …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, अवैध डान्स बार रोखण्यासाठी पोलीस कायद्यात दुरुस्ती करणार विधानसभेत दिली माहिती
राज्यात डान्स बारवर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या विद्यमान कायद्यातील पळवाटा बंद करण्यासाठी राज्य सरकार महाराष्ट्र पोलीस अधिनियमात दुरुस्ती करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. या दुरुस्तीनंतर डान्स बार चालविण्यासाठी महाराष्ट्र डान्स बार कायद्यांतर्गतच परवाना घेणे बंधनकारक राहील. पोलीस कायद्यांतर्गत केवळ सादरीकरण (परफॉर्मिंग लायसन्स) घेऊन डान्स बार चालविण्याची प्रथा …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, ‘एल निनो’चे संभाव्य संकट जलसंधारणासाठी इष्टापत्ती कमी कालावधीत पूर्ण होऊ शकणारी जलसंधारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करा
विविध हवामान संस्थांनी या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये ‘एल निनो’बाबत दिलेल्या इशाऱ्यांबाबत शासन गंभीर आहे. यामुळे निर्माण होऊ शकणारी संभाव्य टंचाई परिस्थिती यशस्वीपणे हाताळण्यासाठी शासन सज्ज आहे. त्यामुळे एल निनोचे संभाव्य संकट हे जलसंधारणासाठी इष्टापत्ती असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कमी कालावधीमध्ये पूर्ण होऊ शकणारी जलसंधारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, बाल गुन्हेगारांची वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षे करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविणार बालकांचा गुन्ह्यांसाठी वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार
बाल गुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा १८ वर्षांवरून १६ वर्षे करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. बालकांचा गुन्हेगारी आणि अमली पदार्थांच्या वितरणासाठी वापर करणाऱ्यांविरोधात अधिक कठोर कारवाई करता यावी, यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीकडे वाढता कल याबाबत सदस्य अर्जुन …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा आरोप, बिश्नोई गँगचा महाराष्ट्रात वाढता धुमाकूळ,खंडणीसाठी धमक्या आणि गोळीबाराच्या घटना बिश्नोई आणि लोणकर वर कारवाई कधी करणार?
महाराष्ट्रात बिश्नोई गँगच्या नावावरून सुरू असलेली खंडणी, जीवे मारण्याच्या धमक्या आणि गोळीबाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरत गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, पिंपरी-चिंचवड …
Read More »आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरून विधानसभेत गोंधळ, विरोधकांचा सभात्याग..! व्यापक चर्चेअंती निर्णय घेऊ - मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
महाराष्ट्रात अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर सखोल चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घालून सभात्याग केला. हा विषय फार महत्त्वाचा आणि गंभीर असून दलित समाजावर अन्यायकारक आहे अशी टीका विरोधकांनी केली. या विषयावर व्यापक चर्चेअंती, सर्व सहमतीने निर्णय घेऊ,कोणावरही अन्याय केला जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडली. …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन, ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’ ही शेती परिवर्तनाची व्यापक जनचळवळ ५० लाख शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प
‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’ ही केवळ स्पर्धा नसून महाराष्ट्रातील शेती परिवर्तनाची व्यापक जनचळवळ आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास हेच त्याचे सर्वात मोठे यश आहे. आजचे १८ हजार शेतकरी गट पुढील काळात ५० लाख शेतकऱ्यांना एकत्र आणतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. वर्षा निवासस्थानी पानी फाऊंडेशनच्या सहकार्याने …
Read More »
Marathi e-Batmya