राज्यात ऑर्केस्टाच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील नृत्यावर कठोर निर्बंध आणणारे सुधारणा विधेयक मंगळवारी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकामुळे आता हॉटेल, उपहारगृहे आणि बारना महाराष्ट्र पोलीस अधिनियमाअंतर्गत मिळालेल्या ऑर्केस्ट्रा परवान्याच्या आधारे २०१६ च्या कायद्याअंतर्गत येणारे नृत्याचे कार्यक्रम घेता येणार नाहीत. अशा आस्थापनांना २०१६ च्या कायद्यानुसार आवश्यक परवानग्या घ्याव्या लागतील आणि …
Read More »डॉ पंकज भोयर यांचा इशारा, शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदीची सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करणार अशा शाळांची यादीही तयार करण्याचे प्रशासनाला दिले आदेश
विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानांतूनच पुस्तके, गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या राज्यातील काही खासगी तसेच सीबीएसई, आयसीएसई बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई करील, असे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधान परिषदेत सांगितले. राज्यातील शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याबाबत विधानपरिषद सदस्य सुधाकर अडबाले यांनी प्रश्न उपस्थित …
Read More »राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांची माहिती, टीईटीबाबत मांडलेल्या सूचनांवर सकारात्मक शिक्षकांना एआयचे मोफत प्रशिक्षण
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ही सेवामूल्यमापनासाठी नसून मूलभूत शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेची पडताळणी करण्यासाठी आहे. टीईटी संदर्भात सदस्यांनी मांडलेल्या सर्व सूचनांची शासनाने नोंद घेतली असून त्यावर सकारात्मक विचार केला जाईल. तसेच राज्यातील सर्व शिक्षकांना गुगल एज्युकेशनच्या सहकार्याने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) विषयाचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज …
Read More »एनईटीची प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर टीईटीची प्रश्नपत्रिका ? परीक्षा पुढे ढकलली शिक्षक पात्रता चाचणी परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय
काही महिन्यापूर्वी राष्ट्रीय चाचणी परिक्षेचा अर्थात नॅशनल एक्साम टेस्टची सीईटीचा पेपर फुटल्याच्या घटनेवरून देशात तरूणांमध्ये एकच रोष निर्माण झाला आहे. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रेज जनता पार्टीकडून जंतरमंतर येथे आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. या गोष्टीला काही काळ लोटत नाही तोच शिक्षक पात्रता तपासणी अर्थात टीईटी …
Read More »डॉ पंकज भोयर यांची माहिती, ग्रामीण व दुर्गम भागातील माध्यमिक शाळांमध्ये २० विद्यार्थ्यांवर तीन शिक्षक अनुज्ञेय विधान परिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिली माहिती
ग्रामीण व दुर्गम भागातील इयत्ता नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी शासनाने शिक्षक अनुज्ञेयतेबाबत मोठा निर्णय घेतला असून, २०२५-२६ या संचमान्यता वर्षासाठी दोन्ही वर्गांची एकत्रित पटसंख्या २० किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास तीन शिक्षक अनुज्ञेय करण्याची सवलत देण्यात आली आहे, अशी माहिती राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य किरण …
Read More »शालेय शिक्षण विभाग आणि गुगल दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार राज्यातील चार लाख शिक्षकांना मिळणार लाभ
राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे प्रगत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि गुगल फॉर एज्युकेशन यांच्यादरम्यान उद्देशपत्रावर स्वाक्षरी करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत पुढील दीड वर्षांच्या कालावधीत राज्यातील चार लाखांहून अधिक शिक्षकांना ‘गुगल एआय एज्युकेटर सिरीज’ अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील …
Read More »डॉ पंकज भोयर यांचे निर्देश, कारागृह पुनर्विकास आणि आधुनिकीकरण प्रकल्पांना गती द्या कारागृह विकास प्रकल्पांमुळे बंदी क्षमता व सुविधा वाढणार
राज्यातील कारागृहांच्या पुनर्विकास, स्थलांतर आणि आधुनिकीकरणासाठी हाती घेण्यात आलेल्या महत्वाच्या प्रकल्पांची कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी गतीने कार्यवाही करण्याच्या सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ मे २०२६ रोजी आयोजित कारागृहाबाबत आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशांच्या अनुपालनाबाबत मंत्रालयात राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार …
Read More »डॉ पंकज भोयर यांची माहिती, दक्षिण मुंबईतील पुनर्विकास व गृहनिर्माण प्रकल्पांना गती दक्षिण मुंबईतील कामाठीपुरामधील पुनर्विकास व गृहनिर्माण प्रकल्पांना गती
दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा आणि उमरखाडी परिसरातील पुनर्विकास व गृहनिर्माण प्रकल्पांना गती देण्याबाबत राज्य शासन कटिबद्ध असून लवकरच कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल, अशी माहिती राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिली. विधानसभेत सदस्य अमिन पटेल यांनी याबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती. राज्यमंत्री डॉ पंकज भोयर म्हणाले की, कामाठीपुरा परिसरातील जुन्या, मोडकळीस आलेल्या आणि उपकरप्राप्त इमारतींचा समूह …
Read More »मजूर संस्थांसोबतच महिला सहकारी संस्थांना कामे देणार राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली ग्वाही आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार ५ सदस्यीय समिती गठित
राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे राज्यातील मजूर सहकारी संस्था सोबतच प्राधान्याने महिला सहकारी संस्थांना शासनाच्या विविध कामांमध्ये अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली. सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत …
Read More »आराजी वर्ग २ च्या जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
आराजी असलेल्या शेत जमिनीबाबत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी आराजी असलेली वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी दिली. सदस्य सचिन अहिर यांनी या विषयी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित …
Read More »
Marathi e-Batmya