जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असा लौकिक असलेल्या भारतातील लोकशाहीला संपुष्टात आणण्याचे पाप केले जात आहे. भाजपा सरकार सर्व यंत्रणांच्या माध्यमातून लोकशाही पायदळी तुडवत असून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतांवर दरोडा टाकला जात आहे. देशात विरोधी पक्षच नको अशी भाजपची भूमिका आहे त्यामुळेच हे सर्व सुरु असून महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस झाले …
Read More »नाना पटोले यांचा निर्धार, बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी लवकरच भारत जोडो यात्रेप्रमाणे जनआंदोलन… मारकडवाडीतील गावकऱ्यांवर जबरदस्तीने दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्या
भारताच्या शेजारच्या देशातील लोकशाही संपुष्टात येत असताना भारतात लोकशाही व्यवस्थेला ग्रहण लावण्याचे काम सुरु आहे. लोकशाहीत मतदार हा राजा असतो त्या मतदार राजाच्या मतदानाची चोरी केली जात आहे. यामध्ये ईव्हीएम मशिनबद्दल जनतेच्या मनात शंका आहेत म्हणूनच मारकडवाडीच्या लोकांनी आपले मत कोणाले गेले हे पाहण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेऊन …
Read More »नाना पटोले यांची टीका, भाजपा युतीला ‘लाडकी बहीण’ची गरज संपली…आता ‘लाडका भाऊ’साठी काम.. सत्तापक्ष मतदारांच्या मतांची थट्टा करतो, जनभावना पायदळी तुडवणे ही सत्तेची मस्ती
‘लाडकी बहिण’मुळेच पुन्हा सत्तेत आलो असे भाजपा युतीचे नेते सांगत आहेत, पण आता निवडणुका संपल्याने लाडक्या बहिणीची महायुतीला गरज राहिलेली नाही. लाडकी बहिणचा विषय आता संपला आहे. सरकारचा शपथविधी होताच दोन दिवसात एका ‘लाडक्या भावाला’ एक हजार कोटी रुपयांची संपत्ती परत मिळाली आहे. ही तर सुरुवात असून ‘आगे आगे देखो …
Read More »विधानसभा अध्यक्ष पदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड विशेष अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस
नव्या सरकारचा अर्थात महायुतीचा शपथविधी पार पडल्यानंतर विधानसभेच्या अध्यक्ष पदी भाजपाचे आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीच निवड पुन्हा एकदा करण्यात आली. विशेष म्हणजे विरोधकांकडील आमदारांची संख्या कमी असल्याने विधानसभा अध्यक्ष पदासाठी राहुल नार्वेकर वगळता दुसरा कोणाचाही अर्ज विधानसभेच्या सचिवाकडे आला नाही. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड …
Read More »नाना पटोले यांची मागणी, … दखल निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयाने घ्यावी मारकडवाडीप्रमाणे राज्यातील अनेक गावामध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी ग्रामसभेचे ठराव
राज्यातील नव्या सरकारबद्दल जनतेच्या मनात संभ्रम असून हे सरकार आपल्या मताचे नाही ही जनभावना राज्यात तीव्र बनली आहे. मारकडवाडीतच नाही तर राज्यातील प्रत्येक गावाची हीच भावना आहे. बॅलेट पेपरवरच मतदान घ्यावे अशी मागणी जनतेतूनच जोर धरत असून ग्रामसभा तसे ठराव पास करत आहेत. निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय या दोन …
Read More »राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष पदीः उपाध्यक्ष पद मविआकडे? अध्यक्षपदासाठी एकट्या नार्वेकरांचा अर्ज
विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहिर झाल्यानंतर रितसर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे-अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. या शपथविधीनंतर आयोजित विधानसभेचे विशेष अधिवेशन सध्या सुरु आहे. निवडणूकीत महायुतीला २३१ जागा मिळाल्याने निर्विवाद बहुमत महायुतीच्या बाजून असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विधानसभेचे अध्यक्षपदीही भाजपाकडेच राहणार असल्याचे सांगण्यात येत होते. …
Read More »काँग्रेसच्या आमदारांनी राज्यघटनेची पुस्तिका हाती घेत शपथः ८ आमदार राहिले विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी १०६ सदस्यांनी सदस्यपदाची घेतली शपथ
विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास निळकंठ कोळंबकर यांनी ११४ पैकी १०६ नवनिर्वाचित आमदारांना विधानसभेच्या सदस्यपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सदस्य उपस्थित होते. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. …
Read More »नाना पटोले यांची टीका, मतदान चोर सरकारचा निषेध म्हणून सदस्यत्वाची शपथ न घेण्याचा मविआचा निर्णय बॅलेट पेपरवर मतदान ही मारकडवाडीत पडलेली ठिणगी देशभरात पोहचवण्याचा काँग्रेसचा संकल्प
विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात भाजपा युतीचे सरकार आले असले तरी आपल्या मतदानाने हे सरकार आलेले नाही अशीच भावना जनतेला वाटत आहे. जनतेच्या मतांचे हे सरकार नाही. मारकडवाडीच्या लोकांची जी भावना आहे तीच राज्यातील बहुतांश जनतेची भावना आहे. जनभावनेचा आदर करत महाविकास आघाडीतील विधानसभा सदस्यांनी आज शपथ न घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती …
Read More »नाना पटोले यांची टीका, ब्रिटिशांना साथ देणारे संबित पात्राच्या पक्षाचे पुर्वजच खरे गद्दार व देशद्रोही अदानीच्या भ्रष्टाचारावर चर्चेची मागणी केल्यानेच भाजपाकडून राहुल गांधींची बदनामी
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अदानीच्या भ्रष्टाचारावर चौकशी करण्याची मागणी करताच अदानीचे दलाल राहुल गांधींची बदनामी करु लागले आहेत. जेव्हा जेव्हा अदानीच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केले जाते तेव्हा तेव्हा अदानीचे दलाल भाजपाचे नेते काँग्रेस व राहुल गांधी यांच्यावर बेछुट आरोप करतात. आताही भाजपाचा टुकार खासदार संबित पात्राने राहुल गांधी …
Read More »नाना पटोले यांचा इशारा, गुजरातधार्जिण्या सरकारने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावू नये काँग्रेसची विधानसभेतील संख्या कमी झाली असली तरी हिम्मत व ताकद कायम
निवडणूक आयोगाच्या मदतीने मतमोजणीत घोटाळे करुन महाराष्ट्रात जनतेच्या मतांची चोरी करणारे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. चोरीचे बहुमत असतानाही नव्या सरकारची स्थापनाच वादाने झाली असून या तीन पक्षातील अंतर्गत वादामुळे महाराष्ट्राची प्रतिमा देशात मलीन झाली आहे. महाराष्ट्राच्या माथी पुन्हा गुजरातधार्जिणे सरकार बसले असले तरी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले, …
Read More »
Marathi e-Batmya