Tag Archives: भाजपा

शरद पवार यांची टीका, दावोसमधून महाराष्ट्रात गुंतवणूक आणल्याचा सरकारचा दिखावा महाराष्ट्रातील कंपन्यांनाच तिथे बोलावून उद्योग आणत असल्याचा देखावा

दावोसमध्ये ज्या कंपन्यांशी करार झाले त्यातील बहुसंख्या कंपन्या भारतीय होत्या. फक्त एकाच परदेशी कंपनीने महाराष्ट्राशी करार केलेला आहे. २८ भारतीय कंपन्यांनी सामंजस्य करार केला, त्यातील २० कंपन्या महाराष्ट्रातील असून त्यातही १५ मुंबईतील आहेत. या कंपन्या गुंतवणूक करणार हे आधीच ठरले होते, मग त्या सगळ्यांना दावोसला निमंत्रित केले गेले. तिथून महाराष्ट्रात …

Read More »

नाना पटोले यांची घोषणा, लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसचा एल्गार,राष्ट्रीय मतदार दिनी आंदोलन लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या भाजपा व निवडणूक आयोगाचा निषेध करणार

भारतीय जनता पक्ष व निवडणूक आयोगाने विधान सभेच्या निवडणुकीत मतांवर दरोडा टाकून लोकशाहीचा गळा घोटला आहे. भाजपा व निवडणुक आयोगाची ही अभद्र युती लोकशाहीला कलंक लावणारी आहे. लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी तसेच मतदारांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्ष शनिवारी २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनी राज्यभर जिल्हा व तालुका स्तरावर तीव्र आंदोलन करणार …

Read More »

छ. संभाजीनगरमधील ‘उबाठा’ च्या ५० पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्वागत

छत्रपती संभाजीनगर येथील उद्धव ठाकरे गटाच्या ५० प्रमुख पदाधिका-यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला खा. डॉ. भागवत कराड, प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, प्रदेश सचिव किरण पाटील, नवनाथ पडळकर, संभाजीनगर भाजपा जिल्हाध्यक्ष संजय …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा सवाल, आपलचे निर्णय रद्द करण्याची वेळ सरकार का आली? महाराष्ट्राची आजची परिस्थिती अस्वस्थ करणारी

पालकमंत्री पदावरून रुसवे फुगवे धरायला हे काय तुमचे घर नाही. तुम्हाला जनतेची कामे करण्यासाठी निवडून दिले आहे, त्यामुळे ही तुमच्या घराची स्टोरी नसल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, राज्य सरकारने आता कामाला लागायला …

Read More »

गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी व अतिक्रमणे रोखण्यासाठी जिल्हास्तरीय कमिटी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांची समिती

गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी आणि नव्याने अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कमिटी गठीत करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना दिली. महाराष्ट्र राज्यात सध्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत एकूण ४७ केंद्र संरक्षित किल्ले आणि पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनलय अंतर्गत ६२ …

Read More »

मार्क झुकेरबर्गच्या त्या टिपण्णीवर फेसबुक मेटाने मागितली माफी कोविडनंतर त्यावेळी असलेले सरकार पुन्हा सत्तेत आले नाही पण भारत त्यात अपवाद

मेटा इंडियाने बुधवारी मार्क झुकेरबर्गच्या टिप्पणीबद्दल माफी मागितली की भारतातील विद्यमान सरकार २०२४ च्या निवडणुकीत सत्ता गमावले आणि याला “अनवधानाने चूक” म्हटले. आयटीवरील संसदीय पॅनेलचे प्रमुख असलेले भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी या टिप्पणीवर कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावले जाईल, असे सांगितल्यानंतर मेटा इंडियाच्या उपाध्यक्षांनी माफी मागितली. “२०२४ च्या निवडणुकीत अनेक विद्यमान …

Read More »

सुरेश धस यांची टीका, परळीचा नवा पॅटर्न, राष्ट्रवादीच्या मुख्य मुन्नीला बोलायला सांगा परळीत मात्र कराडच्या समर्थकांकडून आजही बाजारपेठा बंद, ठिय्या आंदोलन

राज्यात कधी नव्हे इतका व्हिआयपी खटला वाल्मिक कराड यांच्या निमित्ताने बनला आहे. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात न्याय मागण्यासाठी मराठवाड्यातील सर्व पक्षिय आमदार आणि नेते रस्त्यावर उतरल्यानंतर आता बीड जिल्ह्यात वेगळीच परिस्थिती पहायला मिळत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्यावर काल मकोका कायदा लागू केल्यानंतर कालपासून …

Read More »

आता राष्ट्रीय महामार्गावरील टोल गौतम अदानी गोळा करणार नितीन गडकरी यांच्या विभागाकडून टोल वसुलीचे कंत्राट

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या महामार्ग मालमत्तेच्या नवीनतम संचासाठी अदानी रोड ट्रान्सपोर्ट सर्वाधिक बोली लावणारी कंपनी म्हणून उदयास आली आहे, जी टोल ऑपरेट ट्रान्सफर (ToT) मोडद्वारे मुद्रीकरणासाठी ऑफर केली गेली आहे. कंपनीने ToT अंतर्गत एकत्रित केलेल्या आणि ऑफर केलेल्या रस्त्यांच्या भागांसाठी १,६९२ कोटी रुपयांची बोली लावली आहे. ToT मॉडेलद्वारे …

Read More »

आशिष शेलार यांचा आरोप, विश्वासघाताच्या राजकारणामुळेच शरद पवारांना हद्दपार केलं अमित शाह यांच्यावरील शरद पवार यांच्या टीकेला उत्तर

विश्वासघाताच्या राजकारणाचे जनक असलेल्या शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना आपला तोल गमावला आहे. विश्वासघाताचं आणि खंजीर खुपसण्याचं राजकारण आजवर केल्यामुळेच महाराष्ट्राच्या मतदारांनी तुम्हाला हद्दपार केलं, असा घणाघाती हल्ला मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी मंगळवारी चढवला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या …

Read More »

शरद पवार यांची खोचक टीका,…पण कुणीही तडीपार झालं नाही अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर

देशाच्या गृहमंत्रीपदी सरदार वल्लभभाई पटेल होते, तसंच एके काळी यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते. या पदाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी या देशभक्तांनी अतिशय मोलाचे काम केले. एकेकाळी गुजरात आणि महाराष्ट्र एकच राज्य होतं. गुजरातने उत्तम प्रशासकांची ओळख देशाला करून दिली. जी नावं मी तुम्हाला सांगितली त्यापैकी सर्वांचे एक वैशिष्ट्य …

Read More »