उच्च न्यायालयाचा सवाल, आदित्य ठाकरे यांना ताब्यात घेऊन चौकशीची गरज का? दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नितेश राणे यांच्या याचिकेवरील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाचा सवाल

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांची व्यवस्थापक दिशा सालियन प्रकरणी भाजपाचे आमदार तथा मंत्री नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच या याचिकेच्या अनुशषंगाने शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या चौकशीची मागणीही केली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने आदित्य ठाकरे यांना ताब्यात घेऊन चौकशीची गरज का आहे असा सवाल केला.

उच्च न्यायालयाने यावेळी याचिकाकर्त्यांना आदित्य ठाकरे यांना ताब्यात घेऊन चौकशीची आवश्यकता का आहे? असा सवाल करत हे पटवून द्या असे सांगत त्यासाठी दोन आठवड्यांची मुदतही न्यायालयाने यावेळी दिली. दरम्यान याप्रकरणी आदित्य ठाकरे यांनीही उच्च न्यायालयात अर्ज करत या प्रकरणी आपलेही म्हणणे ऐकून घ्यावे अशी विनंती न्यायालयाला केली.

८ जून २०२० रोजी दिशा सालियन रोजी दिशा, आदित्य ठाकरे, राहुल कनाल, सूरज पांचोली, सचिन वाझे, एकता कपूर, याचं संभाषण तपासलं जावे कारण त्या रात्री सगळेजण १०० मीटरच्या परिसरात एकत्रच होते असा दावाही नितेश राणे यांनी त्यांच्या याचिकेत केला. तसेच १३ आणि १४ जून २०२० रोजी सुशांतसिंग राजपूत, रिया चकवर्ती, आदित्य ठाकरे, अरबाज खान, संदिप सिंग, शौविक चक्रवर्ती या सर्वांचे मोबाईल तपासले जावेत अशी मागणी करत या सर्वांच्या मोबाईलचे लोकेशन आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात यावी अशी मागणीही यावेळी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत यांचा मृत्यू झाला त्या दरम्यान रिया चक्रवर्ती आणि आणि आदित्य ठाकरे यांच्यात ४४ वेळा फोनवरून बोलंण झाले. त्यामुळे सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूसंदर्भात काही प्रश्न निर्माण होत आहेत. त्यासाठी या सर्व साक्षी पुरव्यांची चौकशी करावी अशी मागणीही याचिकेद्वारे करण्यात आली. त्याचबरोबर नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर लहान मुलांच्या लैगिंक शोषणाचा आरोप करत त्याचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली. ही याचिका सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील आशिलांच्या संघटनेचे अध्यक्ष रशीद खान यांनी दाखल केली आहे.

 

About Editor

Check Also

उच्च न्यायालयाने एफडीएला प्रश्न उपस्थित करताच, सिप्ला विरोधातील आदेश घेतला मागे एफडीएच्या मनमानी आणि अतिरेकी वागण्यावर प्रश्न उपस्थित करताच आदेश मागे घेतला

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शनिवारी सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेस लिमिटेडच्या पुण्यातील कॅरिंग …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *