Tag Archives: मंत्री

उदय सामंत यांची माहिती, मुंबईतील २०१४ च्या पात्र यादीतील पथविक्रेत्यांना तात्पुरती जागा देणार विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिले आश्वासन

मुंबईतील पथविक्रेत्यांच्या (हॉकर) प्रश्नासंदर्भात दाखल असलेल्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून उच्च न्यायालयाचा  निर्णय लवकरच अपेक्षित आहे. मात्र हा निर्णय येईपर्यंत २०२४ च्या पात्र यादीप्रमाणे पथविक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरूपाची जागा (पिचेस) उपलब्ध करून देण्याचे महापालिकेला निर्देश देण्यात येतील अशी माहिती, मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधानसभेत दिली. मुंबई शहरात पथविक्रेता कायद्याची अंमलबजावणी …

Read More »

माधुरी मिसाळ यांचा इशारा, मुंबईत वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिला इशारा

मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासन गंभीर असून, बांधकाम प्रकल्पांसाठी निश्चित केलेल्या नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. मुंबईतील बांधकाम प्रकल्पांवर वायू प्रदूषण मापन यंत्रे बसवणे, धूळ नियंत्रणाचे उपाय करणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नात  दिली. मुंबईतील वायू …

Read More »

वरळीतील टेस्टिंग लॅबच्या भूखंडावर बहुमजली रोबोटिक पार्किंग प्रकल्प आणि इमारतीच्या टेंडरची चौकशी सपा आमदार रईस शेख याच्या प्रश्नाला माधुरी मिसाळ यांचे उत्तर तर नार्वेकर यांचे बैठकीचे आश्वासन

बृहन्मुंबई महानगरपालिकेने वरळीतील महापालिकेच्या टेस्टिंग लॅबच्या जागेवर बहुमजली रोबोटिक पार्किंगसाठी काढलेल्या टेंडरबाबत तसेच ई वार्ड कार्यालय बांधकाम रेंगाळत ठेवल्याबाबत नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यामार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केली. समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी यासंदर्भात गुरुवारी विधानसभेत तारांकित प्रश्न …

Read More »

इराणचे अब्बास अराघची म्हणाले, आमचे लक्ष्य अमेरिकी तळांना, शेजाराऱ्यांना नाही आखातातील राष्ट्रांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर इराणचे स्पष्टीकरण

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर अमेरिका आणि इस्रायलशी संघर्ष वाढत असताना, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची म्हणाले की तेहरान आखाती प्रदेशातील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करत आहे, शेजारील देशांना नाही. अल जझीराला दिलेल्या मुलाखतीत, अब्बास अराघची म्हणाले की इराणचे हल्ले इराणविरुद्धच्या कारवाईला पाठिंबा देणाऱ्या अमेरिकन मालमत्तेवर केंद्रित …

Read More »

शंभूराज देसाई यांचे आश्वासन, मुंबईतील उद्याने आणि मोकळ्या जागांवर अधिक सुरक्षा रक्षक नेमणार विधान परिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना दिली माहिती

मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण ८९५ उद्याने आणि मनोरंजन उद्याने अस्तित्वात आहेत. या उद्यानांसह शहरातील मोकळ्या जागांवर पुरेशा प्रमाणात सुरक्षा रक्षक नेमण्यात येतील. याअनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. विधानसभा सदस्य दिलीप लांडे यांनी या संदर्भातील …

Read More »

महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये फुले कृषी महोत्सव उत्साहात संपन्न! शेतीच्या कामात महिला भगिनी अग्रेसर ; शेतकऱ्यांची प्रगती ही कृषि विद्यापीठांच्या वाणांमुळेच! : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

राज्यातील सर्व कृषि विद्यापीठांचे काम चांगले आहे. राहुरी कृषी विद्यापीठाचे काम हे दीपस्तंभासारखे आहे. अजूनही आपल्याला खोलवर जाऊन काम करण्याची गरज आहे. शेतीच्या कामांमध्ये महिला भगिनी अग्रेसर आहेत. या महिलांचे शेतीमधील श्रम कमी करण्यासाठी संशोधन होणे आवश्यक आहे. शेतकर्यांची प्रगती ही कृषि विद्यापीठांनी विकसीत केलेल्या वाणांमुळेच आहे. कृषी विभागांतर्गत आपण …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, भाजपा महायुती सरकारच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली लाचखोरीप्रकरणी मंत्र्याचे कार्यालय सिल केल्याची घटना अत्यंत गंभीर

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री, नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला मंत्रालयात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने लाचलुचपत विभागाने मंत्री कार्यालयच सिल केले आहे. या घटनेने भाजपा महायुती सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. या लाचखोरीची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी मंत्री नरहरी झिरवळांनी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस …

Read More »

साताऱ्यात मंत्र्यांच्या बालेकिल्ल्यांना भगदाड, मतदारांचा घराणेशाहीला स्पष्ट नकार मंत्री मकरंद पाटील, जयकुमार गोरे यांच्या गडाला धक्का

सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांनी जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. प्रस्थापित नेत्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना घरी धाडून मतदारांनी विकासाला आणि नव्या चेहऱ्यांना पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः मंत्री मकरंद पाटील यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला असून, महाबळेश्वरच्या तळदेव गटात शिवसेनेच्या (शिंदे गट) अजित …

Read More »

मंत्री जयकुमार गोरे यांच्या बंधूचा निवडणूकीत पराभव, पण वहिनीचा विजय ठरला चर्चेचा? मनिषा फडतरे यांच्या विजयावर आक्षेप घेत पुर्न मतमोजणी घेण्यात आली त्यानंतर भारती गोरे विजयी

राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५  पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांनी एका बाजूला महायुतीला दिलासा मिळाल्याचे चित्र असले तरी दुसऱ्याबाजूला मात्र अनेक भाजपाच्या मंत्र्यांच्या गडाला चांगलेच हादरे बसल्याचे दिसून आले. त्यापैकीच एक असलेल्या सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत मंत्री जयकुमार गोरे यांना हादरा बसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे जयकुमार गोरे …

Read More »

१५० दिवस ई गर्व्हनन्स कार्यक्रमात कामगार विभाग अव्वल कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी केले अधिकाऱ्यांचे अभिनंदन

राज्य शासनाने १५० दिवसांचा ई गर्व्हनन्स व सेवाकर्मी पुरस्कार कार्यक्रम शासकीय विभाग, संचालक, आयुक्तालय, क्षेत्रीय कार्यालय आदींसाठी जाहीर केला. यामध्ये ३  हजारपेक्षा कमी मंजूर पदसंख्या असलेल्या विभागांच्या प्रकारात २०० गुणांपैकी १८५ गुण मिळवित कामगार विभाग राज्यात अव्वल ठरला आहे. विशेष प्रशंसनीय वर्गवारीमध्ये विभागाला स्थान मिळाले आहे. कार्यालयीन मूल्यमापनात १५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स कार्यकम अंतर्गत राज्यातील ६८ सर्वोत्तम आयुक्त, संचालक प्रकारात कामगार विभागअंतर्गत कार्यरत बाष्पके …

Read More »