राज्यातील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी १ जानेवारी २०११ पर्यंत झालेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याच्या मोहिमेला गती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गठित करण्यात आलेल्या विधानसभा क्षेत्रस्तरीय आढावा समित्यांवर विविध मतदारसंघांत ११५ सहअध्यक्षांची नियुक्ती केली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे की, १ जानेवारी २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे सरसकट पाडली जाणार नाहीत, मात्र जी अतिक्रमणे नियमांत बसत नाहीत किंवा सार्वजनिक हिताच्या जागांवर आहेत, ती काढून टाकली जातील. कमाल १,५०० चौरस फुटांपर्यंतचेच निवासी अतिक्रमण नियमित केले जाईल; त्यापेक्षा जास्त क्षेत्रफळावर केलेले अतिक्रमण पाडण्यात येईल. नदीपात्र, नाले, गायरान, सार्वजनिक रस्ते, वने, स्मशानभूमी, खेळण्याची मैदाने आणि शाळा किंवा रुग्णालयांसाठी आरक्षित असलेल्या जमिनींवरील अतिक्रमणे कोणत्याही परिस्थितीत नियमित केली जाणार नाहीत. ही अतिक्रमणे हटवून तेथील बाधित कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेतून पर्यायी घरे दिली जातील. कोणत्याही परदेशी नागरिकाचे किंवा बांग्लादेशी घुसखोराचे अतिक्रमण नियमित होणार नाही. असे अतिक्रमण आढळल्यास ते हटवण्यासोबतच संबंधितांविरुद्ध थेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
—-
नियुक्त सहअध्यक्ष व मतदारसंघ (नाव — विधानसभा मतदारसंघ)
* मकरंद नगीन पाटील — शहादा (अ.ज.)
* अजय तानाजी वसावे — नवापूर (अ.ज.)
* राजेंद्र कोंडू माळी — धुळे ग्रामीण
* गजेंद्र महादेव अंपळकर — धुळे शहर
* अमरिश रसिकलाल पटेल (आ.) — शिरपूर
* पांडुरंग मिठाराम पाटील — रावेर
* विशाल राधेशाम त्रिपाठी — जळगांव शहर
* नितीन रमेश पाटील — चाळीसगांव
* गजानन भिकाजी चरखे — मलकापूर
* दिपक विश्वनाथ खरात — चिखली
* शिव रामदास ठाकरे — मेहकर (अ.जा.)
* लोकेश लालचंद राठी — जळगाव (जामोद)
* राजेश अच्युतराव रावणकर — अकोट
* किशोर रामजी कुचके — बाळापूर
* संजय श्रावणजी गोटफोडे — अकोला पश्चिम
* प्रवीण गुलाबराव हगवणे — अकोला (पूर्व)
* नंदकिशोर सुरेश राऊत — मुर्तिजापूर
* सुनिल हरीरामजी मालपाणी — वाशिम
* राजू महादेवराव गाडवे — कारंजा
* भाऊराव उर्फ बाळासाहेब किसनराव शिरपूरकर — धामणगाव रेल्वे
* सोपान उर्फ योगेश सुधीरराव गुडधे — तिवसा
* गोपाल रामकृष्ण चंदन — दर्यापूर (अ. जा.)
* शिवा गजानन काकड — मेळघाट
* अशोक श्रीधरपंत बनसोड — अचलपूर
* संतोष संपतराव निमगरे — मोर्शी
* धनंजय अशोक चौबे — आर्वी
* दिपक सुधाकर बावनकर — देवळी
* वामन पांडुरंग चंदनखेडे — हिंगणघाट
* राजीव भास्करराव पोतदार — सावनेर
* नितेश दिलीप साखळे — हिंगणा
* विनोद शंकरराव ठाकरे — साकोली
* दुर्गाप्रसाद बाबूलाल ठाकरे — तिरोरा
* आशिष मोतीराम ठकराणी — गोंदिया
* सदानंद बाबुराव कुथे — आरमोरी
* भास्कर नागोबाजी बुरे — गडचिरोली (अ. ज.)
* राधेश्याम लक्ष्मीनारायण अडानिया — राजूरा
* बलराम प्रभूदास डोडानी — चंद्रपूर (अ. जा.)
* राहुल शरद संतोषवार — बल्लारपूर
* मनोज राजाराम वठे — ब्रम्हपुरी
* सचिन रामदास आकुलवार — चिमूर
* प्रशांत सदाशिव झाडे — वरोरा
* संजय आण्याजी पिंपळशेंडे — वणी
* चिंतामन अभिमान पायघन — यवतमाळ
* बाळू दशरथ जाधव — आर्णी
* श्रीधर केशवराव देवसरकर — उमरखेड
* आनंद चन्नप्पा मच्छेवार — किनवट
* निळकंठ बाळासाहेब मदने — भोकर
* परमेश्वर बळीराम कदम — नायगाव
* अभयसिंह शहाजीराव देशमुख — देगलूर – बिलोली
* उत्तम बाबुराव बनसोडे — मुखेड
* अमोल माधवराव जाधव — हिंगोली
* निलेश दासराव देशमुख — परभणी
* तुकाराम दिगंबर तांदळे — गंगाखेड
* सुबोध दिनकर चव्हाण — परतूर
* दिपक दगडू पांढरे — बदनापूर
* भगवान रामदास गिरणारे — भोकरदन
* दत्ता पांडुरंग उकिर्डे — फुलंब्री
* दिपक हरेराम बडे — गंगापूर
* देवीदास (देवा) खंडू पाटील — मालेगांव मध्य
* सोमनाथ तेजीराम सूर्यवंशी — बागलान
* विजय पुंजाराम धाकराव — चांदवड
* सुनिल रघुनाथ केदार — नाशिक पूर्व
* चित्रेश मुकुंद वस्पटे — नाशिक मध्य
* राकेश शिवाजी ढोमसे — नाशिक पश्चिम
* दिनेश लक्ष्मण मर्दे — डहाणू (अ. ज.)
* कुणाल प्रदीप उदावंत — विक्रमगड (अ. ज.)
* महेश हरी पाटील — नालासोपारा
* अजय सखाराम चौकेकर — वसई
* संदीप यशवंत पाटील — भिवंडी पश्चिम
* प्रकाश श्रीपत भोईर — मुरबाड
* प्रदीप अर्जुनदास रामचंदानी — उल्हासनगर
* निखिल किशोर चव्हाण — कल्याण पूर्व
* सौरभ विवेक ताम्हणकर — डोंबिवली
* सुनेश रामचंद्र जोशी — ठाणे
* राजन भिमराव पाटील — मुंब्रा – कळवा
* विक्रांत बाळासाहेब पाटील (आ.) — पनवेल
* सोपान उत्तम जांभेकर — पेण
* गणेश जगन्नाथ कवडे — जुन्नर
* प्रिया नारायणराव पवार (सौ.) — खेड आळंदी
* सुभाष मुरलीधर नाणेकर — खडकवासला
* विजया प्रभाकर गाडेकर (सौ.) — श्रीरामपूर (अ.जा.)
* राहुल तानाजीराव मालुसरे — शेवगांव
* संदीप शंकरराव निकम — राहूरी
* संदीप बलभीम नागवडे — श्रीगोंदा
* सचिन सखाराम पोटरे — कर्जत जामखेड
* जालिन्दर बाबासाहेब सानप — बीड
* रोहिदास पाटील — आष्टी
* हिंदुलाल बाबुराव काकडे — केज (अ.जा.)
* दशरथ तात्यासाहेब सरवदे — लातूर ग्रामीण
* गणेश उत्तमराव गोजमगुंडे — लातूर शहर
* संजय सिताराम दोरवे — निलंगा
* प्रकाश विजयसिंह पाटील — औसा
* गणेश नागनाथ चिवटे — करमाळा
* योगेश सुरेश पाटील — माढा
* केदार हनुमंत पवार — बार्शी
* रमेश लक्ष्मण माने — मोहोळ
* राजकुमार बाबुराव हंचाटे — सोलापूर शहर मध्य
* अमर गणेश पाटील — अक्कलकोट
* प्रणव मुकुंद परिचारक — पंढरपूर
* सत्यशील भिकाजीराव पाटील — माळशिरस
* राजन शंकर पाटील — कराड उत्तर
* जगदिश भिकाजी आंब्रे — गुहागर
* शिवानंद प्रभाकर धनवडे — चंदगड
* चेतन उत्तमराव चव्हाण — कोल्हापूर दक्षिण
* प्रवीण प्रभाकर प्रभावळकर — शाहूवाडी
* सचिन संभाजी मेथे — हातकणंगले
* अनिकेत बाबासो पाटील — इचलकरंजी
* सातगोंडा उर्फ पोपट दत्ता पुजारी — शिरोळ
* धनंजय महादेव कुलकर्णी — मिरज
* पृथ्वीराज संभाजी पवार — सांगली
* प्रसाद उत्तमराव पाटील — ईश्वरपूर
* सम्राट नाना
साहेब महाडिक — शिराळा
* संदीप दत्तात्रय पाटील — पलूस – कडेगांव
* उदयराजे बळवंत भोसले — तासगाव – कवठेमहांकाळ
* सोमनिंग गुरसंगप्पा बोरामणी — जत
——————————
Marathi e-Batmya