चंद्रशेखर बावनकुळे यांची सूचना, शेतरस्ते, जलसंधारणासाठी लोकप्रतिनिधींनी निधी वापरावा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आमदारांसोबत बैठकीनंतर केली सूचना

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता आमदार आणि खासदारांनी आपला निधी मृदसंधारण, चारा लागवड, गोवंश जिवंत ठेवण्यासह जनावरांसाठी पाण्याची सोय करण्यासाठी वापरावा अशी सूचना महसूलमंत्री व दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली .

राज्यातील सर्व खासदार आणि आमदारांशी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऑनलाईन संवाद साधत दुष्काळाशी सामना करण्याबाबत काही उपाययोजनाही सुचविल्या. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘फार्मर आयडी’ तयार करून घेणे आवश्यक आहे. राज्यातील सुमारे ५० लाख शेतकरी अद्याप या लाभापासून वंचित असल्याने त्यांना जाणीवपूर्वक मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, २४ लाख शेतकऱ्यांची पीक पाहणी ऑफलाईन पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्यांचे केवायसी (KYC) आणि पीक पाहणी प्रलंबित आहे, त्यांनी येत्या दोन महिन्यांच्या आत हे काम पूर्ण करून घ्यावे. फार्मर आयडी तयार झाल्यावर शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ घेताना अडचण येणार नाही.

सातबारा नसलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणींवर मार्ग आणि अग्रीम मदत

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, विदर्भातील भूदान आणि सीलिंगच्या जमिनी तसेच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जमीन कसत असूनही नावावर सातबारा नसल्याने अनेक शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. यावर मार्ग काढून दीड कोटी शेतकऱ्यांना अग्रीम आणि एनडीआरएफची (NDRF) मदत देण्याची व्यवस्था सरकारने केली आहे. ज्या शेतकऱ्यांना अद्याप अग्रीम मदत मिळालेली नाही, त्यांचा शोध घेऊन त्यांना ती मदत दिली जाईल, अशी ग्वाही महसूलमंत्र्यांनी दिली.

दुष्काळग्रस्त तालुक्यांचे पुन्हा सर्वेक्षण

दुष्काळाच्या प्रश्नावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, प्राथमिक स्तरावर ११ तालुक्यांचे ग्राऊंड सर्वेक्षण करून निर्णय घेतला जाणार आहे. तसेच ३०४ तालुक्यांची यादी प्राप्त झाली असून, या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल. “दुष्काळाचा प्रश्न राजकीय होऊ नये, यासाठी आमचा प्रयत्न राहील. मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्यानंतर पात्र तालुक्यांची यादी जाहीर केली जाईल. राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी काळजी घेत आहोत,” असे ते म्हणाले.

महिला सरपंचांना ब्लॅकमेल करणाऱ्या काही महिलांचा नागपूर पोलिसांनी शोध लावून कारवाई केल्याबद्दल महसूलमंत्र्यांनी पोलिसांचे अभिनंदन केले.

राहुल गांधी यांनी भारताच्या बदनामीचा विडा उचलला
काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर बावनकुळे यांनी जोरदार टीका केली. राहुल गांधी परदेशात जाऊन भारताची बदनामी करत असल्याचा आरोप करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वसुधैव कुटुंबकम’ या विचारातून २०४७ चा वेध घेत भारताला जगातील १९२ देशांमध्ये प्रतिष्ठा मिळवून दिली असल्याचे ते म्हणाले. राहूल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील फरक हा संस्कृती, संस्कार आणि विचारांचा फरक आहे. तसेच, काँग्रेसला बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी काहीही देणेघेणे नसून, त्यांचा केवळ फायद्यासाठी वापर केला जात आहे.

About Editor

Check Also

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुणे जि.प प्रवेशद्वाराचे लोकनेते अजित पवार नामकरण व पुतळ्याचे अनावरण दिवंगत अजित पवार ग्रामीण विकास व सहकार क्षेत्रातील ज्ञानकोष आणि नव्या नेतृत्वासाठी विद्यापीठ

दूध संघ, प्राथमिक कृषी पतसंस्था, साखर कारखाने, नागरी सहकारी बँका आणि जिल्हा सहकारी बँकांच्या कामकाजाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *