Tag Archives: वर्षा गायकवाड

वर्षा गायकवाड यांचा आरोप, अदानीला आणखी १३ लाख चौरस फूट जागेचा TDR देण्याचा घाट भाजपा युती सरकार पंतप्रधानांच्या मित्रासाठी सरेंडर, म्हाडाने बांधलेल्या इमारतींचा फायदाही अदानीलाच?

अदानीचा एक लाख कोटी रुपयांचा धारावी विनाश महाघोटाळा दिवसेंदिवस रौद्ररूप धारण करत आहे. या महाघोटाळ्याचा नवा अध्याय म्हणजे, अदानी सरकार अदानीला तब्बल १३.३९ लाख चौरस फूट विक्रीयोग्य क्षेत्र (sale incentive area) TDR स्वरूपात गिफ्ट देऊ इच्छित आहे. ते पण अशा पुनर्वसन घरांसाठी/ गाळ्यांसाठी, जे अदानीने बांधलेले देखील नाहीत, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा …

Read More »

वर्षा गायकवाड यांची खोचक टीका,… अदानीला भस्म्या रोग डोनाल्ड ट्रम्पचा फोन येताच नरेंदर सरेंडर तर अदानी साठी मोदींचा फोन येताच देवेंदर सरेंडर

मुंबईतील जमिनी लुटण्याचा भस्म्या रोग अदानीला जडला असून संपूर्ण मुंबई त्यांना गिळायची आहे आणि त्यासाठी भाजपा सरकार स्थानिकांचा विरोध डावलून अदानीला जमिनी देत सुटले आहे. कुर्ला मदर डेअरीची जमीन पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असताना केवळ अदानीच्या आग्रहाखातर ती हस्तांतरित करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयाला जनतेचा तीव्र विरोध असतानाही या सरेंडर सरकारने …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, धारावी पुनर्विकास मास्टर प्लॅन तात्काळ मागे घ्या, थेट जनसुनावणी घ्या सर्व घरांचे सर्वेक्षण पूर्ण न करता एमआरटीपी MRTP चे उल्लंघन

भाजपा युती सरकारने मंजूर केलेला धारावी पुनर्विकास मास्टर प्लॅन हा पूर्णपणे अन्यायकारक आहे. सार्वजनिक पद्धतीने सल्लामसलत न करता, धारावीतील सर्व घरांचे सर्वेक्षण पूर्ण न करता आणि महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियमांचे (MRTP) स्पष्टपणे उल्लंघन करीत सरकारने या प्रकल्पाला दिलेली मंजुरी धक्कादायकच नाही तर असंवैधानिक आणि अनैतिक आहे. हा मास्टर प्लॅन सर्वसमावेशक …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल, आरोग्य विभागाचा ७ हजार कोटींचा निधी जातो कुठे ? नालेसफाईत हातसफाई, मिठी नदीत अजून गाळ तसाच, मुंबईची तुंबई करणाऱ्या अधिकारी-ठेकेदारांवर कारवाई कधी?

मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक आहे. महानगरपालिकेने यावर्षी ७४ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला, त्यात आरोग्य विभागासाठी ७ हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली असूनही मुंबईतील उपनगरीय आरोग्य सेवांची अवस्था अत्यंत बिकट आहे. रुग्णांना मूलभूत सुविधा देखील उपलब्ध होऊ शकत नसतील, तर महापालिकेचा पैसा नेमका जातो कुठे? …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईच्या नालेसफाईतील भ्रष्टाचाराची ‘एसीबी’ मार्फत चौकशी करा यंदाही मुंबईत मुसळधार पावसात अनेक भागांत पाणी साचण्याची गंभीर परिस्थिती

मुंबईत मान्सूनपूर्व नालेसफाईसाठी भाजपा युती सरकारने करदात्यांचे कोट्यवधी रुपये खर्च केले. पण प्रत्यक्ष कामांची स्थिती अत्यंत भीषण आहे. नालेसफाई असो वा रस्ते काँक्रिटीकरणाची कामे यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या कामांमधील भ्रष्टाचाराची चौकशी एसीबी ACB मार्फत करा आणि दोषी कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करा, …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, बेस्ट बसची दुप्पट भाडेवाढ करून सरकारकडून मुंबईकरांची लुट बेस्टला संपवण्याचा भाजपा सरकार व बीएमसीचा हेतू, आर्थिक नुकसानीस वेट लीज खासगीकरण मॉडेल जबाबदार

भारतीय जनता पक्ष युतीच्या सरकारमध्ये आधीच महागाईने कहर केला आहे, सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्कील झाले असताना सरकारला त्याचे काही देणेघेणे नाही. महागाईने होरपळत असलेल्या मुंबईकरांवर बेस्ट बसच्या तिकिटदरात दुप्पट वाढ करून जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. मुंबईकरांचा या भाडेवाढीस विरोध असतानाही सरकारने त्याकडे दुर्लक्ष करून मुंबईकरांची लुट सुरु केली आहे, असा …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा खोचक सल्ला, लाडकी बहिण योजनेसाठी मोदी सरकारकडून पॅकेज आणा आदिवासी, मागास व वंचित समाजाच्या हक्काचा निधी ‘लाडकी बहिण’ योजनेसाठी वळवू नका

भाजपा युती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभागाचा अनुसूचित जाती आणि नव-बौद्ध समाजासाठी असलेला निधी वळवला आहे. नियमानुसार या समाज घटकांचा निधी इतर खात्याला वर्ग करत येत नाही, पण भाजपा सरकार सर्व कायदे धाब्यावर बसवून मनमानी कारभार करत आहे. आदिवासी व सामाजिक विभागाचा निधी …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, फुले चित्रपट करमुक्त करा, शाळा-महाविद्यालयात दाखवा 'फुले’ हा चित्रपट केवळ एक चित्रपट नसून, एक एका महान पुरोगामी चळवळीचा इतिहास

‘फुले’ हा चित्रपट क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवन, संघर्ष आणि विचारांवर आधारित प्रेरणादायी कलाकृती आहे. फुले दाम्पत्याने महिला व वंचित घटकाला शिक्षणाचे दरवाजे उघडले त्यासाठी त्यांना किती मोठा संघर्ष करावा लागला. त्यांच्या संघर्ष आजच्या पिढीला समजला पाहिजे आणि ते फुले चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याची संधी आहे. …

Read More »

पवन खेरा यांचा आरोप, ईडी ही मोदी-शाह यांची वसूली गँग, आरोपपत्राला भीक घालत नाही सोनिया गांधी व राहुल गांधींविरुद्ध ईडीने दाखल केलेले तथाकथित आरोपपत्र एक राजकीय षड्यंत्र

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेले तथाकथित आरोपपत्र हे एक राजकीय षड्यंत्र आहे. गांधी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला भाजपाकडून जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असून ईडी ही मोदी शाह यांची वसूली गँग आहे आणि त्यांच्या तथाकथित आरोपपत्राला काँग्रेस भिक घालत नाही, …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, विलेपार्लेतील दिगंबर जैन मंदिर पाडणे हा पूर्वनियोजित कट जैन समाजाला विश्वासात घेऊन त्याच ठिकाणी मंदिर पुनर्बांधण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे आश्वासन

विलेपार्ले पूर्व येथील दिगंबर जैन मंदिर प्रकरण न्यायालयात असताना न्यायालयाच्या निकालाची वाट न पहाता बीएमसी अधिकाऱ्यांनी मंदिर जमीनदोस्त केले. जैन मंदिर पाडताना जैन तीर्थंकरांच्या मूर्ती, जिनवाणी आणि आदरणीय ग्रंथ आणि धर्मग्रंथांचाही घोर अपमान करण्यात आला. विलेपार्लेतील दिगंबर जैन मंदिर पाडणे हा पूर्वनियोजित कट असून भाजपा युतीचे ‘बुलडोझर सरकार’च जबाबदार असल्याचा …

Read More »