Tag Archives: शिवसेनाओएफसी

राज्य आपत्कालिन कार्य केंद्राला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भेट आष्टी तालुक्यात पुरामुळे अडकलेल्या ४० जणांना एअरलिफ्ट करण्याचे दिले निर्देश

मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी मंत्रालयातील राज्य आपत्कालिन कार्य केंद्राला भेट देऊन पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. बीड जिल्ह्यातील आष्टी पाथर्डी तालुक्यातील काही गावांना पुराच्या पाण्याने वेढल्याने अडकलेल्या ४० ग्रामस्थांना एनडीआरएफच्या मदतीने एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Read More »

मराठा आंदोलनावर राज ठाकरे यांची स्पष्टोक्ती, सगळ्यांच उत्तर एकनाथ शिंदेच देऊ शकतील मराठा-ओबीसी वादावर राज ठाकरे यांनी मांडली भूमिका

जवळपास वर्षभरापासून राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी मराठा आंदोलक समर्थक मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत अनेकवेळा आंदोलन केले. तसेच मागील काही वर्षी नवी मुंबईत मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः विशेष शासन निर्णय जारी करत त्याची …

Read More »

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन, अपघाती मृत्यू रोखण्यावर भर द्यावा पदोन्नत अधिकाऱ्यांचा पद अलंकरण सोहळा

विभागाच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच ३३१ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांना मोटार वाहन निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नतीने अधिकारांबरोबरच जबाबदारीमध्ये वाढ झाली आहे. पदोन्नत अधिकाऱ्यांनी राज्यात रस्ता सुरक्षा वाढवून अपघाती मृत्यू रोखण्यावर भर देण्याचे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. मोटार वाहन निरीक्षकपदी पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांच्या गणवेशावर नव्या पदाचे …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला, शिंदेसेनेच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले भाजपाचा मोर्चा काँग्रेस कार्यालयावर आला असता तर त्यांना ‘हू किल्ड करकरे’ पुस्तक भेट दिले असते.

काँग्रेसला देशभक्तीचे प्रमाणपत्र गद्दारसेनेने देण्याची गरज नाही. काँग्रेसचा विचार हा पाकिस्तानचे दोन तुकडे करणारा आहे तर पाकिस्तान निर्मितीच्या विचाराला पाठबळ देणारा विचार भाजपा व रा. स्व. संघाचा आहे. स्वातंत्र्याची लढाई सुरु असताना देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाची मोहम्मद अली जीन्नाच्या मुस्लीम लिगशी युती होती, त्या मुस्लीम लिगच्या सरकारमध्ये भाजपा नेते श्यामा …

Read More »

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्या विरोधात शिवसेनेचे जोरदार आंदोलन पृथ्वीराज चव्हाण, राहुल गांधींसह सर्व काँग्रेस नेत्यांनी हिंदूंची माफी मागावी

हिंदू दहशतवाद, सनातन दहशतवाद अशी वक्तव्यं करणाऱ्या काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात शिवसेनेकडून आज मुंबई आणि ठाण्यात जोरदार आंदोलन करण्यात आले. मुंबईतील टिळक भवन या काँग्रेस कार्यालयावर शिवसैनिकांनी आणि महिला आघाडीने पृथ्वीराज चव्हाण, राहुल गांधी यांनी हिंदूंची माफी मागावी, या मागणीसाठी ठिय्या केला. या आंदोलनात आमदार मनीषा कायंदे, शिवसेना …

Read More »

एकनाथ शिंदे यांचा इशारा, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांवर दगड मारू नये शासन आपल्या दारी विशेष शिबिरातून हजारो दाखल्यांचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाटप

काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांवर दगड मारू नये, असा इशारा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उबाठा गटाला दिला. उबाठाच्या नेत्यांनी शिवसेना नेते रामदास कदम आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर अधिवेशनात आरोप केले होते. या आरोपांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कडक शब्दांत समाचार घेतला. …

Read More »

उदय सामंत यांचे आश्वासन, ट्रान्झिट कॅम्पमधील रहिवाशांना दिलासा देण्यासाठी कायदा करणार विधान परिषदेतील लक्षवेधीला उत्तर देताना दिली माहिती

मुंबईमध्ये अनेक चाळी आणि वसाहतींचा पुनर्विकास होत आहे. या पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये ठेवण्यात येते. या ट्रान्झिट कॅम्पचे भाडे तसेच प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याबाबत लवकरच कायदा करणार, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य शशिकांत शिंदे यांनी ताडवाडी येथील बीआयटी इमारतीच्या पुनर्वसन प्रकल्पाबाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला …

Read More »

आनंदराज आंबेडकर यांची एकनाथ शिंदे युती दुर्दैवीः वंचित बहुजन आघाडीने केला निषेध वंचित बहुजन आघाडीने तातडीची बैठक घेत संविधानाला न मानणाऱ्यांबरोबर केली युती

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांची शिवसेनाओएफसी आणि आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना यांच्या आज युती झाल्याची घोषणा केली. त्यावर वंचित बहुजन आघाडीने तातडीने पक्षाची ऑनलाईन बैठक घेत या युतीचा निषेध करत ही युती दुर्दैवी असल्याचे मतही प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीत करण्यात आले. …

Read More »

महाविकास आघाडीचा नारा, लुटारू आणि दरोडेखोर चड्डी बनियान गँग महाराष्ट्रात फिरतेय विधान भवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांचे जोरदार आंदोलन

महाराष्ट्रात लुटारू आणि दरोडेखोर चड्डी बनियान गँग फिरत असल्याने आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. महाराष्ट्रात चड्डी बनियान गँगने हौदास घातला आहे. वेगवेगळ्या कंत्राटाच्या माध्यमातून चड्डी बनियन गँग राज्यात जनतेच्या पैशांवर दरोडे टाकत आहे. सर्वसामान्य माणसाला मारहाण करत चड्डी बनियनवर अंधश्रद्धा पसरवणारे होमहवन केले …

Read More »

आदित्य ठाकरे यांच्या चड्डी-बनियन गँगच्या उल्लेखावर निलेश राणे यांचे आव्हान हिंमत असेल तर नाव घेऊन बोला, उगाच मोघम बोलू नका

महाराष्ट्र विधानसभेत आज शिवसेना (उबाठा)चे आमदार आदित्य ठाकरे यांनी २९३ च्या प्रस्तावावर बोलत होते. यावेळी प्रस्तावावरील भाषण संपविताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचे अभिनंदन करत त्यांच्याकडून युतीचा धर्म पाळण्यात येत असून ज्या चड्डी-बनियनवर कारवाई करायला पाहिजे त्यांच्यावर कारवाई करता येत नाही. त्यामुळे त्यांचे खरेच आभार मानायला पाहिजे असे सांगत आपले …

Read More »