९८ व्या अखिल भारतीय साहित्य समंलेनाच्या निमित्ताने दिल्लीत सध्या राज्यातील साहित्यिक, प्रेक्षक-वाचक यांच्याबरोबरच राजकिय नेत्यांची वर्दळही सुरु आहे. आज साहित्य संमेलनस्थळी मी कसा घडलो या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना बोलविण्यात आले. यावेळी नीलम गोऱ्हे यांच्या मुलाखत वजा कार्यक्रम पार पडली. यावेळी …
Read More »हलक्यात घेऊ नका, एकनाथ शिंदे यांचा इशारा नेमका कोणासाठी फडणवीस की ठाकरे एकनाथ शिंदे यांनी मंजूरी दिलेल्या प्रकल्पांना स्थगिती आणि चौकशी
राज्यातील शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वाढत्या दरीच्या कथित चर्चेदरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या विरोधकांना हलके न घेण्याचा इशारा दिला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकांना टाळाटाळ करणारे एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या पतनाचा संदर्भ देत …
Read More »एकनाथ शिंदे यांची टीका, ‘कंपाउंडर’कडून औषध घेतल्याने पोटदुखी कधीच थांबणार नाही माजी आमदार राजन साळवींचा शेकडो सर्मथकांसह शिवसेनेत प्रवेश
मराठी माणसाला तो पुरस्कार दिला त्याचा अभिमान पाहिजे, मात्र माझ्या द्वेषाने पछाडलेल्या लोकांनी महादजी शिंदे यांचा अपमान केला, साहित्यिकांचा अपमान केला आणि शरद पवार यांचाही अपमान केला. ही पोटदुखी कधीच थांबणार नाही कारण ते ‘कंपाउंडर’कडून औषध घेतात त्यांना चांगल्या डॉक्टरकडे दाखवलं पाहिजे, अशी उपरोधिक टीका शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे …
Read More »शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत सन्मान, महाराष्ट्रात धुमशान शरद पवार यांच्या बचावासाठी एकनाथ शिंदे आले पुढे
मंगळवारी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद गट) अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे पुरस्कार देऊन गौरव केला. शरद पवार यांनी दिल्लीत एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला पण त्या पुरस्काराच्या सन्मानावरू महाराष्ट्रात मात्र घमासान सुरू झाले. शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना …
Read More »एकनाथ शिंदे यांचे निर्देश, ड्रायव्हर, कंडक्टरसाठी वातानुकुलित विश्रांती गृह बांधा प्रत्येक एसटी स्टँडवर उपलब्ध करून द्या
एसटीच्या पुनरुत्थानासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ” प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा!” समजून काम केले पाहिजे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास आमच्या शासन सक्षम आहे. असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते खोपट बसस्थानकावरील नुतनीकरण करण्यात आलेल्या वातानुकूलित चालक -वाहक विश्रांतीगृहाच्या लोकार्पण सोहळयाच्या वेळी बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे परिवहन …
Read More »एकनाथ शिंदे यांचे आदेश, ‘झिरो प्रीस्क्रिप्शन’ निर्णयाची अमंलबजावणी तात्काळ करा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मुंबई शहरच्या ६९० कोटीच्या प्रारुप आराखड्यास मान्यता
जनतेला दर्जेदार आणि सुलभतेने आरोग्य सुविधा देण्याची शासनाची भूमिका असून या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झिरो प्रिस्क्रिप्शन निर्णयाची अमंलबजावणी तात्काळ करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजित मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड.राहूल नार्वेकर, कौशल्य …
Read More »एसटी भाडेवाढीवरून दोन उपमुख्यमंत्र्यांचे परस्पर विरोधी विधानेः मात्र भाडेवाढ तर लागू अजित पवार म्हणतात, भाडेवाढीची फक्त चर्चाः तर एकनाथ शिंदे म्हणाले, चांगल्या सेवेसाठी भाडेवाढ
राज्यातील महायुती सरकारमध्ये बाहेरून कितीही सारं काही अलबेल असल्याचे चित्र टीव्हीच्या कॅमेऱ्यासमोर दाखविण्यात येत असली तरी वास्तविक तशी परिस्थिती महायुतीतील नेत्यांमध्ये तशी नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच एसटी भाडेवाढीवरून मुख्यमंत्री पदानंतर महत्वाचे असलेल्या उपमुख्यमंत्री पदावरील अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात मात्र मते-मतांतरे असल्याचे दिसून येत आहे. पंरतु या दोघांच्या …
Read More »वैभव नाईक यांचा गौप्यस्फोट, राजन साळवी आणि मला ऑफर….. लोकसभा निवडणूकीनंतर आलेल्या ऑफरची माहिती
लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूका पार पडून त्यातून निवडूण आलेले सरकारही स्थानापन्न झाले आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटातील नेत्यांना भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सातत्याने त्यांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी विविधस्तरावरून कशा ऑफर देण्यात येत होत्या याची माहिती माजी आमदार वैभव नाईक यांनी आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना …
Read More »संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची मंत्री संजय शिरसाट यांनी घेतली भेट संबधित आरोपीला अटक करून कारवाई करेल
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद विधानसभेत उमटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेत दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर परभणीत राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या दिवसाचे औचित्य साधत शिवसेनाओएफसीचे आमदार तथा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आज …
Read More »एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, मुंबईबाहेर गेलेल्या नागरिकांना मुंबईत घर मिळवून देणार कोकणाच्या विकासासाठी कोकण विकास प्राधिकरणाची स्थापना
विकासकांनी अर्धवट सोडलेल्या व रखडलेल्या धोकादायक इमारतींमुळे मुंबईकर मुंबईबाहेर गेला आहे. अशा बेघर व मुंबई बाहेर गेलेल्या नागरिकांना मुंबईत हक्काचे घर मिळवून देत त्यांना पुन्हा मुंबईत आणण्याचे काम शासन करणार आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत सदस्य प्रविण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावरील चर्चेदरम्यान दिली. उपमुख्यमंत्री …
Read More »
Marathi e-Batmya