Tag Archives: assembly election

मतदान केंद्रावर मोबाईल बंदीला उच्च न्यायालयात आव्हान निवडणूक आयोगाच्या नियमाच्या विरोधात मनसेकडून उच्च न्यायालयात याचिका

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यास बंदी घालणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने काढलेल्या अधिसुचनेला जनहित याचिकेतून आव्हान देण्यात आले आहे. लवकरच याचिकेवर सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे. मतदारांना मतदान केंद्रात मोबाइल फोन आणण्याची आणि डिजीलॉकर ॲपद्वारे ओळखपत्रे सादर करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी …

Read More »

अमित शाह नंतर पंतप्रधान मोदी यांच्याकडूनही तोच आरोप, संविधानाच्या पुस्तकात कोरी पाने वंचितांचे अधिकार हिसकावून घेण्याचा काँग्रेस व इंडी आघाडीचा कट

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रवेश झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिराळा येथील सभेत काँगेस विशेषतः राहुल गांधी यांच्यावर टीका करताना काँग्रेसकडून त्यांच्या कार्यक्रमात वाटण्यात येत असलेल्या भारतीय संविधानाच्या पुस्तिकेत कोरी पाने असल्याचा आरोप केला. अगदी तोच आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांचा सवाल,… भाजपाने काय दिले बटेंगे, कटेंगेचे काम भारतीय जनता पक्षाचे

जनतेला दिलेल्या आश्वसनांची नेहमीच काँग्रेस पक्षाने पूर्तता केली. युपीए सरकारनेही मनरेगा, अन्न सुरक्षा कायदा, माहिती अधिकार, शिक्षण हक्क कायदा दिला. आताही काँग्रेस पक्षाने हिमाचल प्रदेश, कर्नाटक व तेलंगणातील जनतेल्या दिलेल्या गॅरंटींची पूर्तता यशस्वीपणे केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी आकडेवारीसह स्पष्ट सांगत नरेंद्र मोदींनी १२ वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री व …

Read More »

शरद पवार यांचा हल्लाबोल, ….त्यांना सत्तेत बसण्याचा अधिकार नाही पंतप्रधान मोदींचे वर्तन विचार करायला लावणारे

राज्यातला शेतकरी सध्या संकटात आहे. त्यांच्याकडे सरकारचे लक्ष नाही. जो शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही, त्यांना सत्तेत बसण्याचा अधिकार नाही असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी उदगीर मधील जाहीर सभेत केला. शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, राज्यातला शेतकरी सध्या संकटात आहे. त्यांच्याकडे सरकारचे लक्ष …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, अदानीसाठी एअर इंडिया कॉलनी खाली करण्यासाठी नोटीस घरात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक असतानाही घरांना सील ठोकण्याचा भाजपा सरकारचा अमानवी प्रकार,

अदानीसाठी काहीही करण्यास तत्पर असणाऱ्या भाजपा युती सरकारने आता सर्व मर्यादा पार केल्या आहेत. एअर इंडिया कॉलनीत अनेक दशकांपासून रहात असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना घरे रिकामी करण्यासाठी अत्यंत अमानुष वागणूक दिली जात आहे. शासन व प्रशासनाने अदानींच्या लोकांना घरे खाली करण्यासाठी काहीही करु देण्याची सुट दिलेली असून फक्त ४८ तासात घर …

Read More »

९ आणि १० नोव्हेंबर रोजी ८५ वर्षांवरील वृद्ध आणि दिव्यांग मतदार घरुनच करणार मतदान तुळजापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाचा निर्णय

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीतही ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेले आणि दिव्यांग मतदार घरुनच मतदानाचा हक्क बजावणार आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील केंद्रस्तरीय मतदान अधिकारी यांनी गृहभेटी दरम्यान ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या ५८३ व ९३ दिव्यांग मतदारांनी घरातुन मतदानाचा पर्याय निवडला आहे. अशा एकूण ६७६ मतदारांचे मतदान आज ९ नोव्हेंबर …

Read More »

राज ठाकरे यांना प्रत्युत्तर देत संजय राऊत यांचा आरोप, पोलिस आणि गुंड टोळ्यांच्या बैठका तर मी बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला संजय राऊत

विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने राज्यात सध्या सर्वच राजकिय पक्षांकडून प्रचाराचा धडाका सुरु आहे. त्यामुळे प्रचारसभांमधून सर्वच राजकिय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. या पार्श्वभूमीवर मुलुंड येथील जाहिर सभेत बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना उद्देशून एक वक्तव्य करत शांत बसतोय म्हणून चुकीचा अर्थ काढू नको नाहीतर आम्ही …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेस हल्लाबोल, शाही परिवारासाठी एटीएम काँग्रेस व मित्रपक्षांच्या तोंडी पाकिस्तानची, विभाजनवाद्यांची भाषा

जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आघाडीला सत्ता मिळताच तेथे कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आला. पाकिस्तान, विभाजनवादी शक्ती, अतिरेकी प्रवृत्ती आणि भारतविरोधी शक्ती ३७० रद्द करण्याची मागणी करतात, त्याचाच पाठपुरावा काँग्रेस व त्यांचे मित्रपक्ष करू लागले आहेत,असा आरोप करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर देशविरोधी शक्तींच्या मागणीचा समर्थनाचा आरोप …

Read More »

पंतप्रधान मोदी आणि भाजपाच्या आरोपावर काँग्रेसचे थेट आव्हान, राज्यात या आणि बघा गरिबांचा पैसा गरिबांना दिला तर भाजपाला पोटदुखी का? गॅरंटींच्या पूर्ततेसाठी बजेटमध्ये तरतूद: सुखविंदर सुख्खू.

काँग्रेसने कर्नाटक, तेलंगाणा, हिमाचल प्रदेशात जाहिर केलेल्या गॅरंटी दिल्या नाहीत अशा खोट्या जाहिराती वर्तमानपत्रात देऊन भाजपाने राज्यातील जनतेची दिशाभूल केली, त्याची सविस्तर चिरफाड काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनच्या ऐतिहासिक पत्रकार करण्यात आली. देशाच्या पंतप्रधानांचा आणि भाजपच्या नेत्यांचा खोटारडेपणा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खू, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, व कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. …

Read More »

मतदारानों, मतदानासाठी हे १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य मतदानाच्या दिवशी मतदान कार्ड नसेल तर हे पुरावे चालणार

विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेबर २०२४ रोजी मतदान होणार असून मतदान करण्यासाठी, ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे अशा मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. १२ प्रकारच्या ओळखपत्रापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे, अशी माहिती …

Read More »