Tag Archives: assembly election

काँग्रेसचे १६ बंडखोर उमेदवारांना ६ वर्षासाठी काँग्रेस पक्षातून निलंबित काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची कारवाई

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार तसेच काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी केलेल्या १६ जणांना काँग्रेस पक्षातून ६ वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या आदेशावरून काव प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने ही कारवाई करण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी ही माहिती दिली आहे. …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, विदर्भाला पूर्णपणे दुष्काळमुक्त करणार ८८ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प महायुती सरकार वेगाने पूर्ण करणार

वैनगंगा – नळगंगा सारखे नदीजोड प्रकल्प राबवत महायुती सरकार विदर्भाला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करणार आहे,असा ठाम निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी धामणगाव येथील प्रचार सभेत व्यक्त केला. धामणगाव रेल्वे मतदार संघातील उमेदवाराच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या या सभेला माजी खासदार नवनीत राणा, सुरेशभाऊ वाघमारे, गुजरातचे आमदार बाळकृष्ण पटेल, रविराज भाऊ देशमुख, …

Read More »

भाजपाचा चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका, काँग्रेसचा जाहीरनामा फसवा काँग्रेसने योजनांचे बजेट सांगावे

काँग्रेससह महाविकास आघाडीचा जाहीरनामा फसवा असून त्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. मतांच्या लागूंलचालनाकरीता काँग्रेस खोटारडेपणा करीत असल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली असून, काँग्रेसच्या रक्तात विकास नाही, असेही ते म्हणाले. नागपूर येथे ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी योजनांच्या …

Read More »

निवडणूक कर्तव्य नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उगारला जाणार कारवाईचा बडगा कठोर शिस्तभंग कारवाईचा जिल्हाधिकारी ‍तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांचा इशारा

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठीची मतदान प्रक्रिया येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडणार आहे. ‍निवडणुकीचे काम हे राष्ट्रीय कर्तव्य असून ही मतदान प्रक्रिया पार पाडण्याकामी विविध शासकीय, निमशासकीय आस्थापनांतील अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु अनेकजण निवडणुकीचे काम नाकारण्यात धन्यता मानीत असल्याचे तसेच कामात टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, आयोगाने पोलिस महासंचालक वर्मा यांच्या नियुक्तीबाबत हस्तक्षेप करावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे निवडणूक आयोगाला पत्र

महाराष्ट्र सरकारने संजय कुमार वर्मा यांची पोलीस महासंचालक (DGP) म्हणून सशर्त नियुक्ती करण्याची कृती ही घटनात्मक तरतुदी, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि स्थापित प्रशासकीय तत्त्वे यांचे उघड उघड उल्लंघन करणारी आहे. यामुळे पोलीस महासंचालकांना निवडणुकीच्या काळात तटस्थ व निष्पक्षपणे काम करण्यात अडचणींचा सामना करावा लागले म्हणून निवडणूक आयोगाने आपल्या अधिकाऱ्यांचा वापर …

Read More »

अमित शाह यांची निवडणूकीला नवी उपमा, शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्यातील लढाई जाहिरसभेत बोलताना महायुती आणि महाविकास आघाडीतील निवडणूकीच्या सामन्याला दिली उपमा

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या मतदानाला अवघे १० दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यातच भाजपाचे नेते पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा राज्यातील निवडणूकीच्या प्रचारात प्रवेश होवून दोन दिवस झाले. तरी भाजपाच्या प्रचारात म्हणावा तशी हिंदू-मुस्लिम धुव्रीकरणाचे मुद्दे म्हणावे तसे आले नसल्याचे दिसून येत होते. मात्र आता आठभराचा कालावधी शिल्लक राहिलेला असताना …

Read More »

पोर्शेप्रकरणी सुनिल टिंगरे यांची नोटीस दाखवत सुप्रिया सुळे म्हणाल्या, दबाव आणण्याचा प्रयत्न… अजित पवार यांच्या गटाच्या आमदाराने पाठविलेली नोटीस दाखवत दिले प्रत्युत्तर

काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमातील वृत्ताच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना अजित पवार गटाचे आमदार सुनिल टिंगरे यांनी पुण्यातील पोर्शे कारप्रकरणी नोटीस पाठविल्याचे वृत्त प्रकाशित झाले. त्यावर सुप्रिया सुळे यांनी टीकाही केली होती. त्यावर अजित पवार यांनी यासंदर्भात एका जाहिरसभेत बोलताना सुनिल टिंगरे …

Read More »

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे संकल्पपत्र जाहिरनाम्याचे प्रकाशन महाराष्ट्राला देशात क्रमांक एकचे राज्य बनवू-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा विश्वास

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलीयन डॉलर्स ची बनवून देशातील क्रमांक एकचे राज्य बनविण्याचा भारतीय जनता पार्टीचा संकल्प आहे. भारतीय जनता पार्टीने आजवर दिलेली अनेक आश्वासने पूर्ण केली असल्याने महाराष्ट्राला मजबूत, समृद्ध, सुरक्षित राज्य बनवू, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या संकल्पपत्राचे प्रकाशन …

Read More »

मविआकडून विधानसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्रनामा जाहिरनामाः काय आहेत आश्वासने महाराष्ट्राची निवडणूक देशाचे भविष्य बदलणारी, खोके सरकार खाली खेचून मविआचे सरकार आणा: मल्लिकार्जून खर्गे

महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी मविआ अर्थात महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रनामा या जाहिरनाम्याचे हॉटेल ट्रायडंट मधील भव्य पत्रकार परिषदेत प्रकाशन करण्यात आले. मविआ सत्तेत आल्यानंतर पहिल्या १०० दिवसात काय कामे करणावर व पाच वर्षांत काय काम करणार हे या जाहीरनाम्यात सविस्तर मांडण्यात आले आहे. या महाराष्ट्रनामामध्ये महिलांना वर्षाला ६ सिलेंडर ५०० रुपयात दिले …

Read More »

विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा अजेंडा कोण करतंय सेट, भाजपा-महायुती की मविआ? विधानसभा निवडणूकीत प्रचाराचा अजेंडा होतोय सेट

साधारणतः २००९ सालापासून राज्यातील विधानसभा निवडणूका असतील किंवा लोकसभेच्या निवडणूका असतील परंतु आतापर्यंत राज्यातील निवडणूकीत प्रचाराचा अजेंडा सेट करण्यात भाजपाला यश आले आहे. मात्र २०१९ आणि २०३४ निवडणूकीत राज्यातील विरोधक थोडे भानावर येत निवडणूक कोणतेही असो पण भाजपाच्या अजेंड्यावर निवडणूक लढायची नाही असा निर्धार केलेला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूकीत भाजपाने …

Read More »