९ आणि १० नोव्हेंबर रोजी ८५ वर्षांवरील वृद्ध आणि दिव्यांग मतदार घरुनच करणार मतदान तुळजापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाचा निर्णय

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीतही ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेले आणि दिव्यांग मतदार घरुनच मतदानाचा हक्क बजावणार आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील केंद्रस्तरीय मतदान अधिकारी यांनी गृहभेटी दरम्यान ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या ५८३ व ९३ दिव्यांग मतदारांनी घरातुन मतदानाचा पर्याय निवडला आहे. अशा एकूण ६७६ मतदारांचे मतदान आज ९ नोव्हेंबर आणि १० नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे.

गृहभेटीतून होणाऱ्या मतदानाची पूर्व कल्पना ५ नोव्हेंबर २०२४ रोजी घेतलेल्या उमेदवार यांच्या बैठकीमध्ये देण्यात आली. तसेच ८ नोव्हेंबर २०२४ रोजी बैठक घेऊन सर्व उमेदवारांना याची माहिती देण्यात आली.यासाठी ३० पथक नियुक्त करण्यात आले आहे.या पथकात १ क्षेत्रिय अधिकारी, २ सहाय्यक मतदान कर्मचारी,सूक्ष्म निरीक्षक आणि एक पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे.

गृहभेट मतदान पथक हे ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रत्येक मतदार जिथे रहात असेल तिथे त्यांची पडताळणी करुन त्यांना मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन देणार आहे.तरी सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व मतदार यांना आवाहन करण्यात येते की या प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन मतदान सुरळीत पार पडेल याची काळजी घ्यावी असे निवडणूक निर्णय अधिकारी, २४१-तुळजापूर विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी धाराशिव संजय डव्हळे यांनी दिली.

About Editor

Check Also

समुद्रात शनिवारी झाला कमी तीव्रतेच्या भूकंप; त्सुनामीचा कोणताही धोका नाही किनारपट्टीवरील नागरिक - पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळण्याचे आवाहन, अरबी समुद्रातील उच्च भरतीच्या लाटांचा ऑरेंज अलर्टमुळे मच्छीमारांना सतर्कतेचे आवाहन

अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनारपट्टीसाठी उच्च भरतीचा (High Tide) २४ तासांचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *