Tag Archives: bjp

उध्दव ठाकरेंची कॅसेट जुनी झाली म्हणणाऱ्या बावनकुळेंवर उमेदवार माघारीची नामुष्की

कै. रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा जागेकरीता पोट निवडणूक जाहीर झाली. निवडणूक जाहिर झाल्यानंतर शिंदे गट-भाजपाच्यावतीने उमेदवारही जाहिर करत त्या उमेदवारी अर्जही भरला. विशेष म्हणजे नागपूरात बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उध्दव ठाकरे यांची कॅसेट जुनी झाल्याची टीका करत त्यांना संताजी-धनाजी सारखे शिंदे आणि फडणवीस …

Read More »

पोलिसांच्या नियमित आरोग्य तपासणीवर विशेष लक्ष देणार

पोलिसांचे आरोग्य उत्तम राहिले पाहिजे यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील. ४० वर्ष वयावरील सर्व पोलीसांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येईल, यासाठी पुढाकार घेणाऱ्या वैद्यकीय संस्थांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अपोलो क्लिनिक कुलाबा मुंबई येथे सेवेन्स टेक्नॉलॉजीच्या सहाकार्याने मुंबई वाहतूक पोलिसांच्या संपूर्ण …

Read More »

शरद पवार म्हणाले, कोणत्याही राजकिय पक्षाने विषय प्रतिष्ठेचा न करता…

अंधेरी पोटनिवडणुकीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडी सरकारकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपाकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, ही निवडणूक ही बिनविरोध व्हावी, यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहीत भाजपाने माघार घ्यावी, असे …

Read More »

राज ठाकरे यांच्या पत्रानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही

अंधेरी विधानसभा पोटनिवडणूकीत उध्दव ठाकरे यांच्या गटाने ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहिर करत त्यांचा उमेदवारी अर्जही भरला. त्यापाठोपाठ शिंदे गट-भाजपाच्यावतीने मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर या दोघांकडूनही प्रचाराचे रणशिंग फुंकत प्रचाराला सुरुवात केली. यापार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उध्दव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना पाठिंबा जाहिर …

Read More »

नागपूरकरांनी भाजपा आणि फडणवीसांच्या धोरणांना नाकारले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांची टीका

भाजपाच्या चुकीच्या धोरणांना व दडपशाहीला देशातील जनता कंटाळली असून आता हळूहळू ग्रामीण भागात परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. नागपूर जिल्ह्यातील १३ पंचायत समिती सभापती निवडणुकीचा निकाल नुकताच लागला असून त्यामध्ये नागपूरकरांनी भाजपला सपशेल नाकारले आहे असा अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपाच्या नागपूर येथील पराभवावर जोरदार टीका …

Read More »

अंधेरी पोटनिवडणूक: ठाकरे गटाला राज ठाकरे यांचा पाठिंबा, केले भाजपाला आवाहन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी उमेदवार मागे घ्या

अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक रणधुमाळीला सुरुवात झाली. त्यानंतर काल शनिवारी दुपारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या दोन भेटीमुळे राज्याच्या राजकारणात या भेटी कशासाठी आणि का? अशी चर्चा सुरु झाली. त्यातच आज रविवारी सकाळी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्या …

Read More »

मोगलांना संताजी धनाजी दिसायचे तसे उद्धव ठाकरेंना सर्वत्र शिंदे–फडणवीस दिसतात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला

मोगलांच्या सैनिकांनी धसका घेतल्याने त्यांना जसे सर्वत्र संताजी-धनाजी दिसायचे तसे उद्धव ठाकरे यांना सर्वत्र शिंदे – फडणवीस दिसतात असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना लगावला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी संताजी धनाजींसारखा शिंदे फडणवीसांचा धसका घेतला आहे. त्यांना ते सर्वत्र दिसतात. …

Read More »

‘हा’ माजी मंत्री हाती बांधणार शिवबंधन, उध्दव ठाकरेंची विदर्भात सभा

शिवसेनेतील फुटीसंदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयात अद्याप निकाल प्रलंबित असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगानेही शिवसेना कोणाची याबाबत अद्याप अंतिम निर्णय दिलेला नाही. त्यातच अंधेरी पोट निवडणूकीच्या निमित्ताने शिवसेनेला अनेक पक्षांकडून पाठिंबा देण्यात येत आहे. तसेच आगामी महापालिका निवडणूका आणि त्यापाठोपाठ विधानसभा, लोकसभेच्या निवडणूका कधीही लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शिंदे …

Read More »

उध्दव ठाकरे गटाच्या आरोपामुळे भाजपा उमेदवार मुरजी पटेल अडचणीत भाजपा काय उत्तर देणार याकडे लक्ष

राज्यातील उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार भाजपाच्या पाठिंब्याने शिवसेनेचेच मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीने उलथून टाकले. त्यानंतर अंधेरी विधानसभा पोट निवडणूकीच्या निमित्ताने उध्दव ठाकरे विरूध्द शिंदे गट-भाजपा दरम्यान पहिली लिटमस टेस्ट होत आहे. या निवडणूकीसाठी ठाकरे यांच्या शिवसेनेच्यावतीने ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला तर भाजपा-शिंदे गटाच्यावतीने मुरजी पटेल यांनी …

Read More »

उद्धव ठाकरे यांना मत म्हणजे काँग्रेस – राष्ट्रवादीला मत

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली व त्यांचे विचारही स्वीकारले. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांना मत देणे म्हणजे काँग्रेसला व राष्ट्रवादी काँग्रेसला मत असेल. भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते घरोघर जाऊन याबद्दल जागृती करतील, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी सांगितले. ते मुंबई …

Read More »