राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सत्ता गेल्यामुळे अस्वस्थ आहेत, त्यांच्या पक्षात प्रचंड अस्वस्थता आहे, त्यामुळे विरोधी पक्षनेते असल्याचे दाखविण्यासाठी ते काही तरी आरोप करत आहेत, असे सडेतोड प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी दिले. ते मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील व भाजयुमो प्रदेशाध्यक्ष …
Read More »भ्रष्टाचारमुक्त गरीब कल्याणाच्या योजना हे मोदी सरकारचे वैशिष्ट्य
घर, शौचालय, गॅस, पाणी यासारख्या सुविधा कोणत्याही भ्रष्टाचाराविना गोरगरीबांपर्यंत पोहचविल्या हे मोदी सरकारच्या कार्यपद्धतीचे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात ‘धन्यवाद मोदीजी’ कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यातील १० लाख लाभार्थ्यांची आभाराची पत्रे पाठवण्याच्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे, सहकारमंत्री …
Read More »भाजपा म्हणते, नैतिकता असेल तर जितेंद्र आव्हाडांना पक्षातून निलंबित करा
राष्ट्रवादी काँग्रेस महिला सक्षमीकरणाची चर्चा करते पण त्या पक्षाकडे नैतिकता असेल तर त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आ. जितेंद्र आव्हाड यांना पक्षातून निलंबित केले पाहिजे, अशी मागणी भाजपार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पुणे येथे केली. जितेंद्र आव्हाड यांच्या गुन्ह्याचे समर्थन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई …
Read More »अजित पवार म्हणाले, लोकप्रतिनिधीवर विनयभंगाचे कलम लावणे हा भ्याड प्रकार
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपाच्या महिला कार्यकर्त्यीकडून पोलिसांमध्ये विनयभंगाची तक्रार दाखल केली. तसेच सदर घटनेचा व्हिडिओही ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला. या साऱ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, लोकप्रतिनिधीवर विनयभंगाचे कलम लावणे हा अतिशय भ्याड प्रकार असून सरकारने हा गुन्हा मागे घ्यावा अशी …
Read More »अजित पवार म्हणाले, कोण काय बोलतं? कोण कोणाबरोबर जातं? कोण काय करत…
काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे नेते तथा राज्याचे कृशीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळेंबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही शरद पवारांवर टीका करताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर जादूटोणा केला होता, असे वक्तव्य केले. या साऱ्या गदारोळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार कुठे आहेत? …
Read More »गोपीचंद पडळकर म्हणाले, इतकी चुळबूळ झाली की पवार घराण्यात फूट…
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज सांगलीत आल्यानंतर पक्षाच्या विविध कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह स्थानिक भागातील आमदार, खासदार, पदाधिकारी उपस्थितीत होते. यावेळी गोपीचंद पडळकर म्हणाले, सरकार गेल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इतकी चुळबुळ झाली की पवार घराण्यात फूट पडते की काय …
Read More »केंद्राचा तो प्रकल्प जाण्यामागचा घटनाक्रम काय? शिंदे-फडणवीसच याला जबाबदार शिंदे-फडणवीसांमुळेच राजकिय कुरघोड्यामुळे प्रकल्प गेला
मागील दोन-तीन दिवस राज्यातील केंद्र सरकारने देशभरातील सर्व राज्य आणि केंद्र शासित राज्यांना सौर ऊर्जा आणि अपांरपारीक ऊर्जेशी संबधित उत्पादन निर्मिती करण्यासंबधीच्या उद्योग निर्मितीचा १४०० कोटी रूपयांचा प्रस्ताव दिला. याबाबत विद्यमान उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रस्ताव महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्याचे सांगत शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात हा …
Read More »महेश तपासेंचा आरोप, शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात प्रकल्प जाण्याचा सपाटा…
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून सुरुवातीला वेदांता-फॉक्सकॉन सर्वाधिक गुंतवणूकीचा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेला. त्यापाठोपाठ राज्यात येवू घातलेला बल्क ड्रग्ज् पार्क आणि तिसरा टाटाचा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेला. या तिन्ही प्रकल्पावरून राज्यात राजकिय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. या प्रकल्प बाहेर पडण्याच्या यादीत आता आणखी एका प्रकल्पाची समावेश झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते …
Read More »भाजपा म्हणते, शिंदे-फडणवीसांच्या राज्यात दादागिरी सहन करणार नाही
एखाद्या चित्रपटातील काही दृश्यांबाबत आक्षेप असेल तर त्याच्या विरोधात तक्रार करता येईल किंवा शांततामय पद्धतीने विरोधही करता येईल. पण चित्रपटगृहात जाऊन मारहाण करण्याची दादागिरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात कोणीही सहन करणार नाही, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी दिला. बावनकुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या संघटनात्मक प्रवासात …
Read More »पदयात्रेतील शिवसेनेच्या सहभागावर भाजपाची टीका अनावश्यक
कन्याकुमारी ते काश्मीर निघालेल्या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्राच्या जनतेने जल्लोषात स्वागत केले असून नांदेड जिल्ह्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील जनतेनेही आपुलकीने, आनंदाने स्वागत केले आहे. ही पदयात्रा पुढे मार्गक्रमण करत २० तारखेनंतर मध्य प्रदेशात प्रवेश करेल पण राहुल गांधी यांनी या पदयात्रेच्या माध्यमातून जो संदेश दिला आहे तो महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे …
Read More »
Marathi e-Batmya