मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषित केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा पर्दाफाश करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने केलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी आज भाजप कार्यालयासमोर आंदोलन करत, मोदीजी, कहाँ गये वो २० लाख करोड? हा जाब विचारण्यात आला. मुंबईतील कार्यालयासमोर आंदोलनास जात असताना पोलिसांनी अध्यक्ष सत्यजीत तांबे व त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतले. कहां …
Read More »काँग्रेसने मुख्यमंत्र्यांवर दबाव आणण्याचे तरी धाडस दाखवावे भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे आव्हान
मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारने महाराष्ट्राला विविध माध्यमातून २८ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची थेट मदत दिली आहे . याउलट महाआघाडी सरकारने राज्यात एका ‘कवडी’चेही पॅकेज गोरगरिबांना दिलेले नाही. भाजपा कार्यालयावर मोर्चा काढण्याऐवजी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांवर दबाव आणून असे पॅकेज जाहीर करायला लावावे, तेवढे धाडस राज्यातील काँग्रेस नेत्यांनी दाखवावेच असे आव्हान भाजपा मुख्य प्रवक्ते केशव …
Read More »१९४२ च्या लढ्याला विरोध करणाऱ्या विचारधारेचे सरकार संविधानाला पायदळी तुडवतेय प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी आपल्या पूर्वजांनी प्राणांचे बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. काँग्रेस पक्षाने या देशात लोकशाही रूजवली मात्र केंद्रातील भाजप सरकार संविधानाला पायदळी तुडवून देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहे. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी १९४२ च्या लढ्याप्रमाणे पुन्हा लढा देण्याची वेळ आली आहे, काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यासाठी सज्ज रहावे. असे आवाहन …
Read More »महाविकास आघाडीने फडणवीस सरकारवर केलेला आरोप स्वत:च खोडून काढला राज्याच्या डोक्यावर ५ लाख ५० हजार कोटींचे नव्हे तर ३ लाख ७ हजार कोटींचे कर्ज
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात तत्कालीन फडणवीस सरकारने महाराष्ट्राच्या डोक्यावर तब्बल ५.५० लाख कोटींचे कर्ज केल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारचे तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह अनेकांनी केला. परंतु राज्यातील कोरोना परिस्थितीमुळे महसुली उत्पन्न कमी झाल्याने आवश्यक असलेली रक्कम रक्कम उभी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने २ …
Read More »सोमवार पासून भाजप किसान मोर्चातर्फे बँकांमध्ये ठिय्या आंदोलन मोर्चा अध्यक्ष डॉ. अनिल बोंडे याचा इशारा
मुंबई: प्रतिनिधी खरीप हंगाम अर्ध्यावर आला असताना सुद्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीय बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्याकरीता दिरंगाई करत असून अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून शेतकऱ्यांना नाहक त्रास देत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे अध्यक्ष व माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे कर्ज …
Read More »भाजपा आमदार आणि दिशा सालियनाच्या वडीलांचे पत्र अभिनेता सुशांतसिंग राजपूत, दिशा सालियनाची आत्महत्याप्रकरण
मुंबई : प्रतिनिधी जवळपास एक महिन्यापूर्वी बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियना हीचा मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसांनी अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने घरात गळफास लावून आत्महत्या केली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी त्यांच्या पध्दतीने तपास करत आहेत. या दोन्ही मृत्यूप्रकरणी पोलिस तपासातील जेवढे अॅगल असतील त्या सर्व पध्दतीने तपास …
Read More »रामभक्तांवर पोलिसांची कारवाई, राज्यात मोगलाई अवतरली भाजपा प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका
मुंबई : प्रतिनिधी अयोध्या येथील श्रीराममंदिराच्या भूमिपूजनानिमित्त शांततेत आनंदोत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांवर महाविकास आघाडी सरकारने कारवाई करून मोगलाईचे दर्शन घडविल्याची टीका भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी मुंबईत केली. प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी भाजपा प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते. कोरोना …
Read More »परिवहन मंत्र्यांचं वरातीमागून घोडं ही तर चाकरमान्यांची फसवणूक- भाजपा नेते अँड आशिष शेलारांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा निर्णय आज परिवहन मंत्र्यांनी जो घोषित केला, तो वरातीमागून घोडं आहे, ही कोकणी माणसाची फसवणूक असल्याची टीका भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केली. कोकणातील चाकरमान्यांबाबत निर्णय योग्य वेळी घ्या, या विषयावर सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी …
Read More »भाजपाची पुन्हा राज्यपालांकडे धाव…. बिहारसाठी महाराष्ट्र पोलिसांच्या विरोधात तक्रार यावेळी विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्याऐवजी मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली
मुंबई: प्रतिनिधी धार्मिक स्थळे त्वरित उघडा, गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना त्वरित दिलासा द्या, सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात बिहार पोलिसांना होत असलेल्या असहकाराबद्दल भाजपाच्या शिष्टमंडळाने पुन्हा एकदा राजभवनावर जात राज्य सरकारच्या विरोधात तक्रार केली. मात्र भाजपाच्या या शिष्टमंडळात यंदा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नव्हते. तर भाजपाचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा …
Read More »खासदार विनायक राऊत, काय चावटपणा चालवलाय ? भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांची शिवसेनेवर टीका, वाचा त्यांच्याच भाषेत
एकीकडे तुम्ही नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध करायचा, आणि दुसरीकडे शिवसेनेच्या दै.सामना मुखपत्रात खा.संजय राऊतांनी त्याच नाणार रीफायनरी कंपनीकडुन पैसे घेऊन पहिल्या पानावर जाहिराती छापायच्या, वर बिनधडक सांगायचे की हा वर्तमानपत्राच्या उत्पन्नाचा प्रश्न आहे. हे काय चाललंय ? तुम्ही जाहिराती घेऊन शिवसेनेचे उत्पन्न वाढवायचे, कोकणातील बेरोजगारांनी मात्र उपाशी मरायचे का ? …
Read More »
Marathi e-Batmya