मुंबईः विशेष प्रतिनिधी अर्थसंकल्पावर अनेक सदस्यांनी आपली मते मांडली. या मतांची दखल घेत अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देणारे मुद्दे मांडणे अपेक्षित होते. मात्र त्यांच्या चर्चेवरील उत्तरात फक्त राजकिय मुद्यांचीच उत्तरे असल्याची टीका माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी करत पवार यांच्या भाषणाने भ्रमनिरास झाल्याचे सांगत भाजपाच्या सदस्यांनी सभात्याग …
Read More »चार दिवस सुनेचेही येतात… त्यामुळे चुकीला माफी नाही फडणवीस, मुनगंटीवारांवर अजित पवारांचा पलटवार
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील सत्तेवर कधी समोरचे येतात तर सत्तेतले कधी समोर जातात. त्यामुळे सत्तेत यायची कधी संधी मिळाली तर असे पुन्हा वागू नका असा उपरोधिक सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देत सासूचे चार दिवस असले तरी सूनेचे चार दिवस येतात अशी कोपरखळी लगावत सुधीर …
Read More »सरकार पडण्यावर शरद पवार म्हणाले, शिमगा संपला ना आता? राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा भाजपाला टोला
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडव्या आधी पडणार असल्याचे भाकित भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी केलेल्या वक्तव्याला २४ तास ही उलटत नाही, तोच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतित्तुर देत म्हणाले की, शिमगा संपला ना? माझ्या माहितीप्रमाणे कालच झाल्याचा उपरोधिक टोला भाजपा नेत्यांना लगावत राज्यातील सरकार पाच वर्षाचा कार्यकाल …
Read More »अजित पवारांच्या मनात आजही फडणवीसच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मागितली माफी
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर त्यावरील चर्चा सुरु करण्यासंदर्भात आज दुपारी विधानसभेत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चर्चा होती. त्यावेळी अजित पवार यांनी अनावधाने फडणवीस यांचा उल्लेख विरोधी पक्षनेते असा करण्याऐवजी मुख्यमंत्री असा केला. मात्र लगेच आपली चूक …
Read More »राज ठाकरेंना पडला प्रश्न सततच्या पराभवातून आलेली उद्विग्नता पडली बाहेर
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात स्पष्ट वक्ता, अचूक टायमिंग साधणारा नेता म्हणून मनसे प्रमुख राज ठाकरे यांची ओळख आहे. मात्र गेल्या ९ वर्षापासून राज ठाकरे अर्थात मनसे पक्षाला विधानसभा, लोकसभा आणि महानगरपालिकांमध्ये सपाटून मार खावा लागत आहे. त्यामुळे या पराभवाबद्दलची उद्विग्नता पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी व्यक्त करत मतदानाच्यावेळी लोक जातात …
Read More »ब्लॅकमेलिंगसाठी आरटीआयचा वापर नको स्थापन करतानाच मनसे प्रमुख राज ठाकरेंची तंबी
नवी मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढण्यासाठी शॅडो कॅबिनेटची स्थापना मनसेकडून १४ व्या वर्धापन दिनाच्या औचित्य साधून केली. मात्र या स्थापनेच्यावेळीच सरकारच्या निर्णयाची माहीती घेताना ब्लॅकमेलिंगसाठी शॅडो कॅबिनेटमधील सदस्यांनी आरटीआयचा वापर करू नये असा सज्ज़ दम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला. नवी मुंबई येथे पक्षाच्या १४ …
Read More »आर्थिक मंदीच्या प्रभावाखालचा ३१ हजार तूटीचा अर्थसंकल्प सादर पेट्रोल-डिझेलवरील करवाढीसह फक्त तीन नव्या घोषणा
मुंबईः विशेष प्रतिनिधी आंतरराष्ट्रीयस्तरावरील आर्थिक मंदी आणि राष्ट्रीयस्तरावर अर्थव्यवस्थेच्या सुधारणेसाठी करण्यात येत असलेल्या अपुऱ्या उपाय योजनांचे पडसाद अर्थसंकल्पात उमटले. राज्य सरकारला यंदाच्या वर्षी ३१ हजारांच्या वित्तीय तूटीला सामोरे जावे लागणार आहे. त्यातच बांधकांम क्षेत्राला चालना देण्यासाठी मुंद्रांक शुल्कात १ टक्का सूट तर उद्योगांना पुरविण्यात येणाऱ्या वीज दरात कपात करत ७.५ …
Read More »कॅगच्या न्यायालयात फडणवीस सरकार दोषी ऊर्जा, सिडको-नगरविकास, परिवहन, एमएसआरडीसीच्या कारभारावर ठपका
मुंबईः विशेष प्रतिनिधी गतीमान सरकार, पारदर्शक सरकारचा नारा देत राज्यात विराजमान झालेल्या भाजपा सरकारने आपल्या कार्यकाळात विकासकामांच्या नावाखाली गुंतवणूक वाढविली. मात्र दुसऱ्याबाजूला या वाढविलेल्या गुंतवणूकीचा परतावा मिळविण्याऐवजी नुकसानीचा कारभार केला असून एमएसआरडीसी, परिवहन विभाग, ऊर्जा विभागाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. तर सिडकोच्या निविदा वाटपात मोठ्या प्रमाणावर नियमांचे उल्लंघन …
Read More »गृहनिर्माण मंत्र्यांकडून फडणवीसांचे कौतुक आणि कारभारावर टीकाही भाजपा आमदारांच्या प्रश्नांवर आव्हांडाचा टोला
मुंबईः विशेष प्रतिनिधी मुंबई महानगरातील परवडणाऱ्या घरांच्या प्रश्नावर विधानसभेतील चर्चेदरम्यान गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काही मोठे गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यासाठी आणि पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य गरजेचे असल्याचे सांगत त्यांची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुंतवणूकदार आणि विकासकांशी असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. …
Read More »नादीरशहानंतर अमित शाहंची नोंद होईल अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची टीका
मुंबईः प्रतिनिधी इतिहासात नादिरशहाने दिल्ली जाळल्याची नोंद आहे. त्यामुळे आता नादिरशहानंतर अमित शाह यांचे नाव दिल्ली जळीत प्रकरणामध्ये निश्चितपणे नोंदले जाईल अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. दिल्ली जळत असताना पोलिसांनी हिंसा करणाऱ्यांवर कारवाई केली नाही. पोलिस ‘मूक दर्शक’ बनून राहिले. …
Read More »
Marathi e-Batmya