शिर्डी-मुंबई: प्रतिनिधी संत, महंत, वारकरी मंडळींच्या संयमाची आणखी परीक्षा न पाहता महाआघाडी सरकारने राज्यातील मंदिरे आणि अन्य धर्मियांची प्रार्थना स्थळे उघडण्यास त्वरीत परवानगी द्यावी. संत, महंत, वारकरी संप्रदायातील मंडळींवर मंदिरांत जबरदस्तीने घुसण्याची वेळ आणू नका, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी दिला. राज्यात मंदिरे आणि अन्य धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी …
Read More »महिलांवरील अत्याचार थांबेपर्यंत आघाडी सरकारला स्वस्थ बसू देणार नाही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा इशारा
पुणे: प्रतिनिधी राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत, मात्र महाआघाडी सरकार ढिम्म बसून आहे. अशा असंवेदनशील सरकारला जागे करण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभर आंदोलन केले जात आहे. राज्यातील महिला सुरक्षित बनेपर्यंत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते महाआघाडी सरकारला स्वस्थ बसू देणार नाहीत, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी दिला. …
Read More »महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपातर्फे १२ ऑक्टोंबरला राज्यभर निदर्शने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी महाआघाडी सरकारच्या काळात राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ राज्यभर 12 ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे निदर्शने करण्यात येणार आहेत , अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिली. भाजपा प्रदेश पदाधिकारी आणि कार्यसमिती बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये , प्रदेश माध्यम विभागाचे प्रमुख विश्वास पाठक …
Read More »महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपा प्रदेश कार्यसमितीची गुरुवारी पहिली बैठक प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या नवनियुक्त प्रदेश कार्यसमितीची पहिली बैठक गुरुवार ८ ऑक्टोबर रोजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून बैठकीत राज्याच्या राजकीय परिस्थिती सोबत महिलांवरिल वाढत्या अत्याचाराच्या घटनांबाबत चर्चा करण्यात येईल. शेतकरी व कामगारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेल्या कायद्यातील ऐतिहासीक सुधारणांबाबत बैठकीत ठराव संमत करण्यात …
Read More »विधेयकाच्या समर्थनासाठी भाजपाला झाली शेतकरी नेते शरद जोशींच्या चळवळीची आठवण शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी पंतप्रधान मोदींचा पुढाकार, एकमुखाने पाठिंबा देण्याची प्रदेशाध्यक्ष पाटील यांचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी शेतकऱ्यांना वर्षानुवर्षांच्या बंधनातून मुक्त करून मर्जीनुसार कोठेही व हव्या त्या किंमतीला शेतीमाल विकण्याचे स्वातंत्र्य देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने कायदा करण्यात येत असून सर्व शेतकऱ्यांनी मा. पंतप्रधानांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी करत याच स्वातंत्र्यासाठी शेतकरी नेते शरद जोशी यांनी …
Read More »“मी पुन्हा येणार” गोष्टआवडली कि नाही याचा शोध घेतोय भाजपा नेते एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका
जळगांव : प्रतिनिधी निव्वळ मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार ही गोष्ट जनतेला आवडली नाही का ? कोणत्या कारणासाठी ? याचा शोध मी घेत असल्याचा उपरोधिक टोला भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावत मेहनत आणि कष्टाने आम्ही महाराष्ट्रात भाजपाचं एकट्याच्या बळावर …
Read More »‘मदिरा चालू मंदिर बंद, उद्धवा तुझा कारभारच धुंद’ म्हणत भाजपाचा घंटानाद परवानगी न दिल्यास मंदिरे उघडू - भाजपाचा राज्य सरकारला इशारा
मुंबई: प्रतिनिधी राज्यभरातील मंदिरे उघडण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी शनिवारी भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभर हजारो मंदिरांबाहेर करण्यात आलेल्या दार उघड उद्धवा या घंटानाद आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मॉल, बाजारपेठा , दारूची दुकाने उघडण्याची परवानगी देणाऱ्या आघाडी सरकारने मंदिरे उघडण्याची परवानगी न दिल्यास प्रार्थनास्थळे नाईलाजाने उघडू , असा इशारा या आंदोलनावेळी देण्यात आला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील , विधान …
Read More »प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची निवडणूक आयोगाला खोटी माहिती: न्यायालयाचे चौकशीचे आदेश राजकिय अडचणीत वाढ होणार
पुणे- मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याचे महसूल मंत्री म्हणून काम केलेले आणि भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदी असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी निवडणूकीसाठी असलेल्या शपथपत्रात खरी माहिती लपवून खोटी माहिती दिली. तसेच स्वत:च्या उत्पन्नाचे स्त्रोत लपविल्याप्रकरणी कोथरूड येथील रहिवासी डॉ.अभिषेक हरिदास यांनी यासंदर्भात पुणे जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने चौकशी करून १६ …
Read More »बदल्यांची सीआयडी चौकशी करा अन्यथा न्यायालयात दाद मागणार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा इशारा
मुंबई : प्रतिनिधी कोरोना महामारीमुळे राज्य गंभीर संकटात असूनही बदल्यांना परवानगी देताना राज्य सरकारने मनमानीपणे आपलेच धोरण बदलले, कोरोनाच्या उपाययोजनात सातत्य न राहिल्याने जनतेचे जीवित संकटात आले, बदली कायद्याचा भंग झाला, राज्याचे आर्थिक नुकसान झाले व बदल्यांचा बाजार मांडून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाले आहेत. बदल्यांच्या सीआयडी चौकशीचा आदेश द्यावा, …
Read More »दूधाला १० तर भुकटीला ५० रू. च्या अनुदानासाठी भाजपा-महायुतीचे आंदोलन राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळाल्या महायुतीचा दावा
मुंबई : प्रतिनिधी दुधाला सरसकट १० रु. लिटर अनुदान व दुध पावडरला प्रती किलो ५० रु. अनुदान द्यावे या मागणीसाठी आज भाजपा, रयत क्रांती, रासप, रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) महायुतीतर्फे राज्यभर करण्यात आलेल्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या आंदोलनात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश …
Read More »
Marathi e-Batmya