मुंबई : प्रतिनिधी शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने अखेरीस राज्यातील मंदिरे व प्रार्थनास्थळे सोमवारपासून उघडण्याची परवानगी दिली असली तरी हा भक्तांच्या श्रद्धेचा विजय आहे, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी सांगितले. मंदिरांमध्ये दर्शन घेताना भाविकांनी कोरोनाविषयी निर्बंधांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुनःश्च …
Read More »कोरोनामुळे नागपूरचे हिवाळी अधिवेशन मुंबईत विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय
मुंबईः प्रतिनिधी विधिमंडळाच्या प्रथेप्रमाणे वर्षभरातील किमान एक अधिवेशन नागपूरात घेतले जाते. त्यानुसार नियोजित हिवाळी अधिवेशन नागपूरात घेण्याचा निर्णय झाला होता. मात्र दिवाळीनंतर राज्यात कोरोनाची दुसरी लाय येण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने नियोजित नागपूरचे अधिवेशन यंदा मुंबईत घेण्याचा निर्णय आज झालेल्या विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. …
Read More »भाजपाकडून पदवीधर- शिक्षक मतदारसंघ निवडणूकीतील उमेदवारांची यादी जाहीर दिल्लीवरून झाली नावांची घोषणा
मुंबईः प्रतिनिधी १ डिसेंबर २०२० रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघात होणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने आज भाजपा उमेदवारांची नावे घोषित केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील यांनी दिली. उमेदवारांची नावे अशी आहेत – १) औरंगाबाद ( पदवीधर ) – शिरीष बोराळकर २) पुणे ( पदवीधर ) …
Read More »अर्णव गोस्वामीवरील कारवाईने सत्ताधारी-विरोधक आमने सामने भाजपाचे ठिकठिकाणी मोर्चे
मुंबईः प्रतिनिधी रिपब्लिक टि.व्ही.चे संपादक अर्णव गोस्वामी यांना आर्किटेक्ट अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी आज सकाळी अटक करण्यात आली. या अटकेवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपा आमने-सामने आल्याचे चित्र राज्यात पाह्यला मिळाले. गोस्वामी यांना अटक केल्यानंतर भाजपाकडून महाविकास आघाडी सरकारवर काँग्रेसच्या मदतीने आणीबाणी आणत असल्याचा आरोप शिवसेनेवर करत महाराष्ट्रात लोकशाहीचा गळा …
Read More »पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच रिक्त जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर आचारसंहिता आजपासून लागू १ डिसेंबरला होणार मतदान
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीत पदवीधर मतदारसंघातून ३ पैकीपैकी एक विधान परिषद सदस्य विजयी झाल्याने तर २ शिक्षक पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने या पाच जागांसाठीच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या निवडणूकीसाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून १ डिसेंबर २०२० रोजी मतदान होणार आहे. विधान परिषदेवर औरंगाबाद …
Read More »राज्य सरकार फेरीवाले, रिक्षाचालक आणि घरकाम करणाऱ्या महिलांना कधी मदत करणार? भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सवाल
पुणे : प्रतिनिधी राज्य सरकार सगळ्या विषयात हात झटकून केंद्र सरकारवर जबाबदारी टाकत आहे. पण राज्यातील फेरीवाले, रिक्षाचालक, घरकाम करणाऱ्या महिलांसाठी आर्थिक पॅकेज देणार आहे का नाही, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. पुणे शहर भाजपा, लायन्स क्लब इंटरनॅशनल, स्मार्ट पुणे फाऊंडेशनच्यावतीने एम. आय.टी. कॉलेज रोड …
Read More »राज्यपालांवर कुत्सित टीका करणे जाणत्या राजाला शोभत नाही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शरद पवार यांना टोला
मुंबईः प्रतिनिधी घटनात्मक पदावर असलो तरीही आपण जनतेला उत्तरदायी आहोत, या उदात्त भावनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या वर्षभराच्या कामाचा अहवाल प्रसिद्ध करून लोकप्रतिनिधींकडे पाठविले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कुत्सितपणे उत्तर पाठविण्याचा दृष्टिकोन जाणत्या राजाला शोभत नाही, असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी …
Read More »मराठा आरक्षणाबाबत आघाडी सरकारच्या न्यायालयीन अपयशामुळे संपूर्ण राज्य वेठीला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला निषेध
कोल्हापूर : प्रतिनिधी राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही व हे सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नाही हे आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या घडामोडींमुळे दिसले. राज्य सरकारच्या अशा भूमिकेमुळे केवळ मराठा समाज नाही तर संपूर्ण महाराष्ट्र वेठीला धरला गेला आहे. महाविकास आघाडी सरकारचा …
Read More »खडसे यांनी पक्ष सोडू नये यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया
मुंबई : प्रतिनिधी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडू नये यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र आमचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. नाथाभाऊ ज्या पक्षात जातील तेथे त्यांनी जनतेचे प्रश्न मांडावेत, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील एकनाथ खडसे यांच्या …
Read More »यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी
मुंबई : प्रतिनिधी कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याबद्दल तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केली. न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्यानंतर नैतिक जबाबदारी म्हणून यशोमती ठाकूर यांनी ताबडतोब मंत्रिपदाचा राजीनामा देणे …
Read More »
Marathi e-Batmya