मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाची सूक्ष्म लक्षणे जाणवत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये सहा अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने मुंबई येथील कार्यालय एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आला आहे. …
Read More »या विधेयकावरून फडणवीस आणि महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्ये झाली खडाजंगी हसन मुश्रीफ, जयंत पाटील, अजित पवारांच्या उत्तराने झाले नाही समाधान
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याचे पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्यासंदर्भातील विधेयक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधासभेत मांडले. मात्र त्यास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हरकत घेत सध्या हे याप्रश्नी उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने त्याबाबतचे विधेयक सभागृहात मांडता येत नसल्याची भूमिका मांडली. त्यामुळे …
Read More »या लाभार्थ्यांना मिळणार पाच महिने मोफत चणाडाळ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई: प्रतिनिधी प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील राज्यामधील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींना जुलै ते नोव्हेंबर २०२० या कालावधीकरिता अख्या चण्याऐवजी प्रति महिना प्रत्येक शिधापत्रिकाधारकास एक किलो मोफत चणाडाळ वितरित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यात अख्या चण्याऐवजी डाळ …
Read More »मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात इतर मागासवर्गीयांवर अन्याय योजनेत बदल करण्याची अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची मागणी
मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती या योजनेच्या धर्तीवर राज्यातील बेरोजगार युवक युवतींसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत इतरमागास प्रवर्गाचा समावेश सर्वसाधारण प्रवर्गात केला गेला. त्यामुळे इतर मागासवर्गीय प्रवर्गातील युवक- युवतींवर अन्याय होत असून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात इतर मागासवर्गीय प्रवर्गास डावलण्यात आल्यामुळे योजनेत बदल करण्याची …
Read More »टेस्टिंग वाढवल्याने रुग्णसंख्येत वाढ होतेय, मात्र मुंबईची परिस्थिती वाईट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची माहिती
नाशिक: प्रतिनिधी राज्यात टेस्टिंग वाढवल्याने कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. रुग्णांसाठी बेड्सची संख्या वाढवण्याच्यादृष्टीने आरोग्य खात्याकडून पुढील काही दिवसात महत्त्वपूर्ण पावले टाकण्यात येतील. त्यासाठी एक यंत्रणा तयार करण्यात आली आहे. भारतात सध्या महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली आणि कर्नाटक या राज्यात रुग्णसंख्या वाढली आहे. महाराष्ट्राचा विचार केल्यास मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण, डोंबिवली, …
Read More »शासकीय गोदामातील कंत्राटी हमाल पद्धत बंद करा राज्यातील हमाल मापाडी महामंडळाची शरद पवारांकडे मागणी
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील शासकीय गोदामातील हमालांना अन्यायकारक अशी कंत्राटी पद्धत बंद करण्यात यावी, हमालांना स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, विश्रांतीगृह यासारख्या किमान नागरी सुविधा मिळाव्यात, अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकेचा लाभ मिळावा, अशा विविध मागण्या हमाल मापाडी महामंडळाची राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेवून केली. महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या प्रतिनिधींनी आज …
Read More »मंत्री भुजबळांच्या या मागणीला दानवेंच्या मंत्रालयाने दिली परवानगी जास्तीच्या मका खरेदीला दिली परवानगी
नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी राज्यात मका धान्याची खरेदी करूनही आणखी मका शिल्लक असल्याने त्याची वाढीव खरेदी करण्यास केंद्राने मान्यता द्यावी अशी मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्राकडे केली. त्यावर केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने त्यास तातडीने मान्यता दिली. विशेष म्हणजे केंद्राच्या या मंत्रालयाचे भाजपा नेते …
Read More »कोरोनाचा धोका : मोफत तांदूळ व डाळ वाटण्यास ३ महिन्यांची मुदतवाढ द्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची केंद्राकडे मागणी
मुंबई : प्रतिनिधी कोविड – १९ प्रादुर्भावामुळे देशात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात केंद्र शासनाच्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून एप्रिल ते जून २०२० या तीन महिन्यांसाठी प्रती व्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ व प्रती शिधापत्रिका १ किलो डाळ मोफत वाटप करण्यात येत आहे. मात्र अद्यापही देशात कोरोनाचा धोका कायम …
Read More »चक्रीवादळ बाधितांना मोफत केरोसीनचे वाटप करणार अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती
मुंबई :प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील निसर्ग चक्रीवादळामुळे या भागातील वीज खंडीत झाल्याने बाधीत कुटुंबियांना केरोसीन राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून मोफत केरोसीनचे वाटप करण्यात येणार आहे. राज्यातील अन्य नुकसानग्रस्त जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांची मागणी असल्यास त्या जिल्ह्यांनाही केरोसीन पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती अन्न नागरी व …
Read More »७३४ रिक्त पदे भरा, अन्यथा प्रशासनाने कामाची अपेक्षा करू नये शिधावाटप कर्मचारी संघटनेचा सरकारला इशारा
मुंबई: प्रतिनिधी सध्या राज्यभर कोरोना विषाणूने थैमान घातलेले असून मुंबई/ठाणे विभागात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. अशा परिस्थितीत अन्न, नागरी पुरवठा विभागाअंतर्गत येणा-या नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांचे आस्थापनेवरील शिधावाटप कर्मचारी/अधिकारी हे बदलापूर, कल्याण, विरार, पनवेल अशा अनेक दूरवरच्या ठिकाणावरून प्रवास करून …
Read More »
Marathi e-Batmya