कार्यालयात ६ जण पॉझिटीव्ह सापडल्याने भुजबळांना व्हावे लागले क्वारंटाईन मुंबईतील कार्यालय एक आठवडा बंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाची सूक्ष्म लक्षणे जाणवत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये सहा अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने मुंबई येथील कार्यालय एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आला आहे.

कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे होम क्वारंटाइन झाले असून कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे आढळल्यास कोरोना तपासणी करून घ्यावी, असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

About Editor

Check Also

प्रकाश आबिटकर यांची माहिती, सार्वजनिक आरोग्य विभागात अधिकाऱ्यांचे दरवर्षी वस्तुनिष्ठ गुणांकन मागील तीन वर्षांच्या कामगिरीच्या आधारे श्रेणी निश्चित होणार; उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुढील जबाबदाऱ्यांमध्ये प्राधान्य

सार्वजनिक आरोग्य विभागात कामगिरीआधारित प्रशासकीय कार्यसंस्कृती रुजविण्याच्या दृष्टीने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *