Tag Archives: chhagan bhujbal

छगन भुजबळ यांची मागणी, तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा

अवकाळी पावसामुळे येवल्यासह नाशिक जिल्ह्यातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. याबाबत माजीमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मदत व पुर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्यासह नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना पत्र दिले आहे. माजी मंत्री छगन …

Read More »

छगन भुजबळ यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट, अजित पवार म्हणाले पक्षातंर्गत मामला छगन भुजबळ यांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष्य

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात समावेश न करण्यात आल्याने भुजबळ यांनी अजित पवार आणि प्रफुल पटेल यांच्यावर जाहिर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर छगन भुजबळ यांनी निर्णय घेणार असल्याचे सांगत ओबीसी चळवळीतील नेते आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेत पुढील निर्णयाच्या अनुषंगाने चर्चा केली. त्यानंतर आज सकाळी …

Read More »

छगन भुजबळ यांची स्पष्टोक्ती, निर्णय घेण्यासाठी चर्चा करतोय…पण अजित पवार यांचा पक्ष सोडणार- ओबीसी कार्यकर्त्यांसोबत बैठकांच सत्र सुरु

राज्यातील महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना स्थान देण्यात आलं नाही. त्यामुळे ओबीसी कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांच्यावर टीका करत मी काही तुमच्या हातातील खेळणे आहे का असा …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा टोला, बहिणींमध्ये आवडती नावडती करू नका २१०० रूपये देण्याच्या घोषणेची अंमलबजावणी करा

राज्य सरकारच्या तिजोरीवर येणाऱा भार कमी करण्यासाठी आता नव्याने सत्तास्थानी विराजमान झालेल्या महायुती सरकारकडून लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांची तपासणी करण्यात येत असल्याचे संकेत राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. तसेच योजनेत नव्याने अटी व नियम लागू करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना पक्ष्प्रमुख उद्धव ठाकरे यांनी …

Read More »

छगन भुजबळ यांचा अजित पवार- पटेल यांना इशारा, उठ म्हंटलं की उठायचं आणि बस… हा भुजबळ तसा माणूस नाही

राज्यात मराठा विरूद्ध ओबीसी असा वाद रंगलेला असताना त्यावेळी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच शेवटपर्यंत लोकसभा निवडणूकीतून उमेदवारी जाहिर करण्यावरून महायुतीने एकंदरीत घोळ घालण्यात आल्याचे दिसून आले. परंतु या प्रकरणावर आतापर्यंत मतप्रदर्शन करण्याचे टाळत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मात्र मंत्री पदाच्या …

Read More »

सुप्रिया सुळे यांची मागणी, बीड आणि परभणीत काय घडलं याचं उत्तर मुख्यमंत्री यांनी द्यावे जनतेने इतक्या विश्वासाने कौल दिला आहे तर लगेच कामाला लागायला पाहिजे

बीड आणि परभणीमध्ये झालेल्या घटना दुर्दैवी आहेत. महाराष्ट्राला तीन आठवड्यांपासून गृहमंत्री नाहीत. माझी अपेक्षा होती की एवढं मोठं बहुमत जर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने यांना दिलं आहे तर त्यांनी कामाला लागायला हवं होतं, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी नवी दिल्ली येथे पत्रकारांशी …

Read More »

लेखक, दिग्दर्शक, अभिनेते ‘नागराज मंजुळे’ यांचा ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव गुरुवारी २८ नोव्हेंबर रोजी समता भूमी, महात्मा फुले स्मारक पुणे येथे होणार ‘समता पुरस्काराचे’ वितरण

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिला जाणारा ‘समता पुरस्कार’ यावर्षी प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते नागराज मंजुळे यांना देण्यात येणार आहे. या पुरस्करामध्ये रुपये एक लक्ष, फुले पगडी, मानपत्र शाल आणि स्मृतीचिन्ह यांचा …

Read More »

कोणी मुर्खासारखं बोलत असेल तर त्याची नोंद का घ्यावी? शरद पवार यांचा टोला मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आरोपावर शरद पवार यांची खोचक टीका

राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. तर १८ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराची सांगता होणार आहे. हा राहिलेला कमी कालावधी पाहता प्रत्येक राजकिय पक्षाच्या नेत्याकडून प्रतिस्पर्धी पक्षाच्या नेत्यावर आरोपांचा धडका अद्याप सुरुच आहे. यापार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आरोपावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांची अजित पवार यांच्यावर टीका, स्वतःचा वेगळा पक्ष काढून… खोचक टीकेवरून अजित पवार समर्थकांचा आव्हाडांना प्रत्युत्तर

विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. तसेच या दोन्ही बाजूच्या आमदारांकडून प्रचाराच्या निमित्तानेही प्रतिस्पर्धी उमेदवारांवर टीका-टीपण्णी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंब्रा-खळव्याचे आमदार तथा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी काल एका प्रचार सभेत बोलताना अजित पवार यांच्यावर टीका करताना म्हणाले …

Read More »

विरोधानंतरही नवाब मलिक म्हणाले, निवडणूक लढणार आणि जिंकणारही अजित पवार, प्रफुल पटेल यांच्या भेटीनंतरही उच्चार

भाजपाच्या विरोधाला न जुमानता निवडणूक लढवणारच, असा निर्धार राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी केला. आपण मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे नवाब मलिक यांनी जाहीर केले असून ते २९ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचेही जाहिर केले. नवाब मलिक यांना उमेदवारी देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी …

Read More »