भोकरदनमधील पिडीत कैलास बोराडें प्रकरणी एकनाथ शिंदे यांचे निवेदन पिडीत कैलास बोराडे यांच्या उपचाराचा संपूर्ण वैद्यकीय खर्च राज्य शासन करेल

जालना जिल्ह्यातील भोकरदनमधील कैलास बोराडे यांना झालेल्या मारहाणीची घटना अतिशय दुर्देवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई  केली जाईल, यामध्ये कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. पिडीत कैलास बोराडे यांच्या उपचाराचा संपूर्ण वैद्यकीय खर्च राज्यशासन करेल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत सांगितले.

भोकरदनमधील कैलास बोराडे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी विधानसभेत सदस्य छगन भुजबळ यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी निवेदन केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, यासंदर्भात जालन्याच्या पोलिस अधीक्षकांशी बोलणे झाले आहे. बोराडे यांना झालेली मारहाण अतिशय अमानुष आहे. या घटनेतील गुन्हेगारांना अजिबात पाठीशी घालणार नाही. त्यांना ‘मकोका’ लावण्याची प्रक्रिया गृह विभागामार्फत करण्यात येईल.

शेवटी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मारहाणीत जखमी झालेल्या बोराडे यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले आहे. त्यानुसार त्याच्यावर आता उपचार सुरू आहेत. त्यांच्या उपचाराचा संपूर्ण वैद्यकीय खर्च शासन करेल मी स्वतः बोराडे यांच्याशी फोनवरून बोललो होतो. त्यांची विचारपूस केली, सरकार तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाहीही त्यांना दिली आहे, असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, कुणाचाही हक्क न काढता मराठा समाजाला न्याय परभणीतील शेतकरी संवाद मेळाव्यातून मराठा समाजासह सर्व समाजघटकांना न्याय, सन्मान आणि विकास देण्याची एकनाथ शिंदेंची ग्वाही

मराठा समाजाला न्याय देतानाच ओबीसी, बहुजन, आदिवासी आणि अन्य सर्व समाजघटकांच्या हक्कांचे संरक्षण करून सर्वसमावेशक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *