Tag Archives: chief minister

पुणे जिल्ह्यातील हयात विधवा महिलेला मयत दाखवून आर्थिक फसवणूक एसआयटी चौकशी करून महिलेला न्याय द्या - दलित पँथरची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

मुलाच्या मृत्यूनंतर वारस म्हणून असलेल्या संबंधित मुलाच्या हयात असलेल्या आईला मयत दाखवून तिच्या नावावर असणाऱ्या हक्काच्या पैशांची लुबाडणूक करण्यात आल्याची बाब दलित पँथर या संघटनेने मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री व पोलीस महासंचालक यांच्या निदर्शनात आणून दिली आहे या प्रकरणात दोषी असलेल्या सर्व संबंधितांची एस आयटीमार्फत चौकशी करून त्या विधवा आणि वृद्ध महिलेला …

Read More »

भाग-१ः मी राज्यपाल, माझ्या घरचे-गणगोत-मित्रांना राज्य अतिथींचा दर्जा द्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे मम, नियमांना पायदळी तुडवित नव्या सुमार पध्दतीच्या कारभाराचा प्रारंभ

काही महिन्यापूर्वी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल (Governor) भगतसिंग कोश्यारी (BhagatSingh Koshyari) यांच्या नियमबाह्य वागणूकीमुळे निर्माण झालेल्या राजकिय पेच प्रसंगावरून सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) चांगलीच खरडपट्टी काढली. मात्र कदाचित त्याचा अंदाज कोश्यारी यांना असावा त्यामुळे त्यांनी केंद्र सरकारच्या मागे लागून राज्यपाल पदावरून पदमुक्त करून घेतले. त्यांच्या ठिकाणी राज्याच्या राज्यपाल (Governor ) पदी …

Read More »

‘शासन आपल्या दारी’ला मिळणार महालाभार्थी पोर्टलची जोड अभियानाची व्याप्ती वाढवा, सर्वांना सहजपणे लाभ मिळावेत– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘शासन आपल्या दारी’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महालाभार्थी पोर्टलचा उपयोग करून घेण्यात येणार असून यामुळे या योजनेची व्याप्ती वाढणार आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे याबाबत आज एक सादरीकरण करण्यात आले. जास्तीत जास्त नागरिकांना सहज सुलभ लाभ मिळावेत म्हणून या पोर्टलचा देखील उपयोग व्हावा, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी केली. …

Read More »

जी-२० प्रतिनिधी, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून जुहू समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता स्वच्छता अभियानामध्ये लोकचळवळीची आवश्यकता-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जी-२० परिषदेच्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीला ‘जी-२० समुद्र किनारा स्वच्छता’ मोहिमेने सुरुवात करण्यात आली. राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समुद्राचे किनारा स्वच्छ ठेवण्याची तसेच प्रदूषण व कचऱ्यापासून समुद्राचे रक्षण करण्याची शपथ देवून स्वत: जी-२० परिषदेतील सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींसमवेत स्वच्छता केली. स्वच्छता अभियानामध्ये लोकचळवळीची आवश्यकता …

Read More »

सामुदायिक सोहळ्यातील विवाहासाठीच्या अनुदानात २५ हजारांची वाढ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

आदिवासी तसेच आर्थिक दुर्बल घटकातील वधू-वर सामुदायिक विवाह सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. सामुदायिक विवाहसोहळ्यातील विवाहासाठीच्या अनुदानात २५ हजारांपर्यंत वाढ करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली. पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार रवींद्र फाटक, राजेश पाटील, श्रीनिवास वनगा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष …

Read More »

समाज माध्यमांवरील नागरिकांच्या तक्रारी, निवेदनांवरील कार्यवाहीसाठीची यंत्रणा कार्यान्वित होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला माहिती तंत्रज्ञान विभागाचा आढावा

नागरिक आपल्या सूचना व तक्रारी शासनाशी संबंधित विविध समाज माध्यमांतून मांडत असतात. त्यावर तत्काळ कार्यवाही होण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे आपले सरकार आणि मुख्यमंत्री सचिवालय अशी संयुक्त यंत्रणा उभारण्यात येत असून ती त्वरित कार्यान्वित करण्याची सूचना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आज सह्याद्री अतिथीगृह येथे माहिती तंत्रज्ञान विभागाच्या विविध उपक्रमांची …

Read More »

देशातील वैशिष्ट्यपूर्ण अशा सुशासन नियमावलीस मुख्यमंत्र्यांची मान्यता प्रशासन अधिक उत्तरदायी, गतिमान होणार

देशातील वैशिष्ट्यपूर्ण अशा सुशासन नियमावली २०२३ ला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिल्याने राज्याचे प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शी होण्यास मदत होणार असून यात वातावरणीय बदलाच्या परिणामावरील कार्यवाहीसाठी स्वतंत्र कक्षाच्या निर्मितीचा देखील अंतर्भाव असणार आहे. राज्याचे प्रशासन उत्तरदायी, सुलभ, गतिमान आणि पारदर्शी व्हावे यासाठी स्थापन समितीच्या अहवालावर आज सह्याद्री अतिथीगृह …

Read More »

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला दिले ‘हे’ निर्देश नाल्यांचे अधिकाधिक खोलीकरण करून पाणी तुंबणार नाही याची दक्षता घ्यावी

मुंबईतील सुमारे २२०० किमी लांबीच्या नाल्यांची सफाई व्यवस्थित आणि खोलपर्यंत केल्यास यंदा पावसाळ्यात पाणी साचण्यापासून मुंबईकरांना होणारा त्रास वाचेल. त्यामुळे किती मेट्रीक टन गाळ काढला यापेक्षा मुंबईत पाणी कुठे तुंबणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नालेसफाईच्या कामांचा प्रत्यक्ष जागेवर जात आढावा …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, …समुपदेशन शिबिरं मोलाची भूमिका बजावतील युवा पिढीच्या ताकदीवर देश महाशक्तीकडे वाटचाल करतोय

“जास्तीत जास्त रोजगार निर्मितीसाठी राज्यशासन प्रयत्नशील असून कुशल आणि रोजगारयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिरं नक्कीच मोलाची भूमिका बजावतील”, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिरात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

सोनिया गांधी यांची शिष्टाई आणि मुख्यमंत्री पदाचा पेच सुटलाः शनिवारी शपथविधी सिध्दरामय्या मुख्यमंत्री तर डि.के.शिवकुमार होणार उपमुख्यमंत्री

मागील तीन दिवसांपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कोण सिद्धरामय्या की डि.के.शिवकुमार बसणार यावरून चर्चेच्या फेऱ्या सातत्याने होऊनही पेच सुटत नव्हता. डि.के.शिवकुमार आणि सिध्दरामय्या याच्यात माघार घ्यायलाही कोणी तयार नव्हत. या दोघांमध्ये समन्वय साधण्याचे काम काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि राहुल गांधी यांनी केले. पण डि.के.शिवकुमार आपला मुख्यमंत्री पदावरील दावा सोडविण्यास तयार …

Read More »