Tag Archives: dilip walse patil

मंदिराच्या आत शरद पवार गेलेच नाहीत, राष्ट्रवादी काँग्रेसने सांगितले “हे” कारण अखेर दगडूशेठ हलवाई समितीनेच मंदिराबाहेर केला शरद पवारांचा सन्मान

सार्वजनिक ठिकाणी असलेल्या मंदिरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे जाण्याचे टाळतात कदाचित त्यांचा फुले-शाहु-आंबेडकर विचारधारेवर प्रचंड विश्वास असल्याने पवार हे शक्यतो मंदिरात जाण्याचे टाळतात. मात्र आज पुण्यात भिडे वाड्याची पाहणी कऱण्यासाठी शरद पवार हे पुण्यात गेले. त्यावेळी भिडेवाड्यासमोरच असलेल्या दगडूशेठ हलवाई मंदिर समितीला ही माहिती कळताच समितीने शरद पवारांना …

Read More »

इम्पिरिकल डेटा जूनच्या पहिल्या आठवड्यात न्यायालयात सादर मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ओबीसी आरक्षणासह घेण्याची परवानगी मध्य प्रदेश सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिली. त्यातच राज्य निवडणूक आयोगाकडून न्यायालयाच्याच आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची प्रक्रिया सुरु केली. यापार्श्वभूमीवर काहीही करून ओबीसी आरक्षणासह निवडणूका घेण्यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात इंम्पिरियल डेटा सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ …

Read More »

गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर अजित पवार म्हणाले, संपूर्ण सरकार… कटेझरी येथील पोलीस इमारतीचे लोकार्पण;शौर्य स्थळाला भेट व सी-६० जवानांचा केला सन्मान

गडचिरोली जिल्ह्यातील विकासासाठी शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा तसेच आर.आर. पाटील पालकमंत्री होते तेव्हापासून ते आजपर्यंत आम्ही या जिल्ह्याचा प्राधान्याने विचार केला आहे. येथील विकास कामांसाठी तसेच जवानांच्या पाठीशी गृहविभाग, अर्थ विभाग आहेच. परंतु संपूर्ण कॅबिनेट, संपूर्ण सरकार यासाठी प्रयत्न करेल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडचिरोली येथे …

Read More »

बैलगाडा शर्यतींमधले खटले मागे घेणार, पण या अटीनुसारच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय

राज्यात कोरोना काळात निर्बंध असतानाही बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्यामुळे दाखल झालेले खटले मागे घेण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. निर्बंध असतानाही भाजपाच्या गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. तर मावळ आणि दस्तुरखुद्द गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मतदारसंघ असलेल्या आंबेगाव येथेही शिवसेनेकडून बैलगाडा शर्यतीचे आयोजन …

Read More »

नववर्ष स्वागताचे नियोजन करताय? मग गृह विभागाची नियमावली वाचाच ३१ डिसेंबर निमित्त आयोजित कार्यक्रम व नववर्षाचे स्वागत कार्यक्रमांसंदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

 मराठी ई-बातम्या टीम कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमायक्रॉन विषाणू संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. याचे संक्रमण नागरिकांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता लक्षात घेवून नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्यासाठी गृह विभागाने ३१ डिसेंबर, २०२१ (वर्ष अखेर) व नूतन वर्ष २०२२ चे स्वागत अत्यंत साधेपणाने करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना …

Read More »

गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिला कायदा व सुव्यवस्थेचा विधानसभेत लेखोजागा बलात्काराच्या गुन्ह्यांचा तपास दोन महिन्यात करण्याचे आता बंधन

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरून भाजपाकडून सातत्याने महिलांच्या सुरक्षे्या प्रश्नावरून आणि वाढत्या बलात्काराच्या गुन्ह्यांवरून महाविकास आघाडीला धारेवर धरण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी राज्यातील गुन्ह्यांची माहिती सादर करत बलात्काराच्या गुन्ह्यांचा तपास दोन महिन्याच्या आता तपास करणे चौकशी अधिका-यांवर बंधनकारक करण्यात आल्याचे विधानसभेत सांगितले. हिवाळी अधिवेशनाला …

Read More »

राज्य सरकार आणि कामगार बोर्डाची मान्यता न घेताच दिले कंत्राटदाराला कोट्यावधी रूपये नाव बांधकाम कामगारांचे आणि साडेतेरा कोटी रूपये खाजगी कंपनीचे

मराठी ई-बातम्या टीम कोविड काळात राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मदत सहाय्य निधी वाटपाचा निर्णय राज्य सरकाराने घेतला. परंतु या पैसे वाटपासाठी राज्य सरकार आणि कामगार कल्याण मंडळाची मान्यता न घेताच बांधकाम आणि इतर कामगार विभागाच्या मुख्याधिकाऱ्यांनी (MBOCWW) आणि मंत्रालयातील एका उपसचिवाने परस्पर एका खाजगी कंपनीची नियुक्ती करत बांधकाम कामगारांना पैसे …

Read More »

या कारणाखाली आयपीएस अधिकारी परमबीर सिंग आणि पराग मनेरे निलंबित मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या स्वाक्षरीनंतर राज्य सरकारकडून निलंबनाचे आदेश जारी

मराठी ई-बातम्या टीम राज्याच्या राजकिय इतिहासात एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याने थेट आपल्याच विभागाच्या मंत्र्यावर आरोप करून खळबळ उडवून देण्याची पहिलीच घटना राज्यात घडली. मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी असताना परमबीर सिंग यांनी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रूपयांची वसूली करण्याचे आदेश दिल्याचे आरोप करत राजकिय क्षेत्रात एकच खळबळ उडवून दिली. …

Read More »

गृहमंत्र्यांची स्पष्टोक्ती, चौकशी होणार मात्र दंगलीची दिलीप वळसे-पाटील यांची माहिती

नागपूरः प्रतिनिधी त्रिपुरातील कथित व्हिडीओमुळे अमरावती, नांदेड, मालेगांव येथे झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केली. नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पत्रकारांनी रजा अकादमीवर बंदी घालण्याच्या मागणीविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नावर गृहमंत्र्यांनी उत्तर देताना वरील उत्तर दिले. मात्र याप्रकरणी भाजपाकडून रझा …

Read More »

धनंजय मुंडेच्या “रसिक”तेवर…विनायक मेटेंची टीका तर गृहमंत्र्यांचे मोघम उत्तर सपना चौधरीच्या नाच गाण्याचा कार्यक्रम केला आयोजित

मुंबई: प्रतिनिधी आपल्या “रसिक”तेपणामुळे आधीच राज्यात चर्चेत आलेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिवाळी निमित्त परळीत प्रसिध्द डान्सर सपना चौधरी यांच्या नाच गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला. विशेष म्हणजे राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप, नुकतेच अहमदनगरमध्ये रूग्णालयाला आग लागून झालेल्या दुर्घटनेत ११ कोरोनाबाधितांचा मृत्यू आणि शेतकऱ्यांना पुरेशी नुकसान भरपाईवरून विरोधकांकडून सातत्याने टीका …

Read More »