शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन ई-पीक पाहणीची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली असून, मोबाईल नेटवर्क नसलेल्या भागांत शेतकऱ्यांना ऑफलाइन पद्धतीनेही ई-पीक पाहणी करता येणार आहे, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, राज्यातील ३ कोटी ४५ लाख शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत ३ कोटी २० लाख शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी …
Read More »आदिती तटकरे यांचे आवाहन, गावागावांत वनराई बंधारे बांधून जलसाठ्याचे संवर्धन करा दुष्काळ निवारणासाठी वर्षभर नियोजन करण्याचे निर्देश
हवामान बदलामुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढून उपलब्ध जलसाठा लवकर कमी होत आहे. संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कृषी व वन विभागाच्या समन्वयातून गावागावांत वनराई बंधारे बांधावेत. रोजगार हमी योजना, ग्रामस्थांच्या सहभागातून जलसंधारणाची कामे वर्षभर राबवावीत. तसेच पाणीसाठा वाढविण्यासाठी बंधाऱ्यांमधील गाळ काढण्याची कामे प्राधान्याने हाती घ्यावीत, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती …
Read More »शेतीच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली शेतातील पिकांची पाहणी सोनेगाव रिठी व कोहळी येथील शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा
पावसाअभावी शेतातील कापूस व तुरीची झाडे सुकत असून अशा परिस्थितीत कापसाची शेती करणारा शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा शेतकऱ्यांना तातडीने आवश्यक मदत देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कळमेश्वर तालुक्यातील कोहळी या गावातील बाबुराव काळे या शेतकऱ्याला दिली दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्यासाठी व त्यांच्यासोबत दिवाळी …
Read More »दुष्काळी परिस्थितीमुळे निवडणूक स्थगित सहकारी संस्थांवरील प्रशासक नियुक्ती नियमात सुधारणा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियमात सुधारणा करण्याचा निर्णय
दुष्काळी परिस्थितीमुळे निवडणूक स्थगित करण्यात आलेल्या सहकारी संस्थांवर प्रशासक नियुक्तीबाबत महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम २०१४ नियम ४ मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. राज्यात ३०४ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळ जाहीर केलेल्या जिल्हयातील सहकारी संस्थांची …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, मराठवाड्यातील दुष्काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, मराठवाड्यातील दुष्काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे मराठवाड्यातील उद्योजकांकडून दुष्काळग्रस्तांसाठी ६ कोटी १८ लाखांचा मदतनिधी
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मराठवाड्यातील उद्योजकांनी पुढाकार घेत आज ६ कोटी १८ लाख रुपयांचा धनादेश दिल्याबद्दल आभार व्यक्त करताना बळीराजाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर येथे दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देवेंद्र सेवा महोत्सव समितीच्या वतीने १ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील जबिंदा …
Read More »दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल • मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत २०२६-२७ या वर्षासाठी विशेष सवलत • वैयक्तिक लाभार्थी व शेतकरी गटांना एकापेक्षा अधिक वेळा लाभाची संधी
राज्यात २०२६-२७ मध्ये कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळी परिस्थिती जाहीर झालेल्या ३०४ तालुक्यांतील पशुपालकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजने’च्या अटी शिथिल केल्या आहेत. चारा टंचाईवर मात करण्यासाठी या योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थी तसेच शेतकरी गटांना अतिरिक्त चारा बियाणे व ठोंबे वाटप करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही सवलत केवळ …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळी पूर्वी पाच हजार रुपये जमा करणार आणखी चाळीस तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश, परीक्षा शुल्क सरसकट माफ होणार, पिण्याचे पाणी, चाऱ्याची उपलब्धतेबाबत नियोजन; शेतकऱ्यांकडून वसूली नको - बँकांना निर्देश
राज्यातील आणखी चाळीस तालुके दुष्काळी म्हणून जाहीर करतानाच, या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांना आगामी दिवाळीच्या तोंडावर दिलासा म्हणून त्यांच्या खात्यावर पाच हजार रुपयांचा अग्रीम जमा करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस …
Read More »कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून राजापूर, बुरलेवाडी येथील दुष्काळ परिस्थितीची पाहणी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासन कटिबद्ध
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगोला तालुक्यातील राजापूर व बुरलेवाडी येथे दुष्काळसदृश्य परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून खरीप पिकांची सद्यस्थिती आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पावसाचे प्रमाण, पिकांची वाढ, पाणी उपलब्धता आणि शेतीच्या नुकसानीबाबत माहिती जाणून घेतली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय …
Read More »शरद पवार यांचे आश्वासन, दुष्काळी परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार राज्यावर ओढवलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या दौऱ्याला सुरुवात
राज्यावर ओढवलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आजपासून पुणे जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा सुरू केला. बारामती, पुरंदर आणि दौंड या तालुक्यांमध्ये ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत. पुरंदर तालुक्यातील परिंचे गावात शरद पवार यांनी या दौऱ्यात राज्य …
Read More »राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र वैरण विकास धोरण जाहीर दुग्धव्यवसाय, पशुपालन व्यवसायाला उद्योगाचे स्वरूप, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
दुग्धव्यवसाय आणि पशुपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र वैरण विकास धोरण लागू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या धोरणामुळे राज्यातील पशुधनासाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता निश्चित होणार आहे. अशारितीने राज्यात प्रथमच वैरण विकास धोरण लागू करण्यात येत आहे. या धोरणामध्ये जिल्हानिहाय चारा उत्पादन, …
Read More »
Marathi e-Batmya