विधानसभेचे नियमित कामकाज सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगराध्यक्ष थेट निवडणूकीच्या माध्यमातून निवडूण आणण्याविषयीचे सुधारीत विधेयक आज मांडले. मात्र त्यांच्या या विधेयक मांडण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सतर्कता दाखविल्याने मुख्यमंत्र्यांची कोंडीत सापडण्याऐवजी सुटका …
Read More »खासदार विनायक राऊत यांनी दिली शिंदे-फडणवीसांना ‘काळू-बाळू’ची उपमा ४० जण गेले म्हणजे शिवसेना संपत नाही
शिवसेनेतील फुटीप्रकरणी उद्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. त्याचबरोबर उध्दव ठाकरे गटाकडून आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झडत आहेत. आतापर्यत आदित्य ठाकरे, उध्दव ठाकरे यांच्यासह शिवसेनेतील सर्वच नेत्यांनी बंडखोर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांना गद्दार म्हणून टीका करत होते. मात्र आज शिवसेनेचे कोकणातील खासदार विनायक …
Read More »काँग्रेस करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर आंदोलन ‘आरे वाचवा’साठी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील घरासमोर उद्या आंदोलन !: समीर वर्तक
मुंबईची फुफ्फुसे असलेले आरेचे जंगल हे भविष्यातही जंगलच रहावे आणि आरेमधील मेट्रो कारशेड रद्द करावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागातर्फे उद्या रविवारी २१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता शांततेत निषेध धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण …
Read More »एक एकनाथ (खडसे) दुसऱ्या एकनाथाला म्हणाले, बोलण्याचा काही नेम नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर साधला निशाना
राज्यातील दही हंडी उस्तवाच्या एक दिवस आधी गोविंदानाही आता सरकारी नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहिर करत थर रचण्याच्या खेळाला साहसी खेळात समावेशही जाहिर केला. तसेच दही हंडी उत्सवाच्या दिवशी शिंदेचा बालेकिल्ला असलेल्या टेंभी नाक्यावरील कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी, आम्ही दिड महिन्यापूर्वी ५० थरांची हंडी फोडली होती …
Read More »अजित पवार म्हणाले; तो मुद्दा मला पटला, पण निर्णय भावनिक होवून घ्यायचा नसतो दही हंडीवरून मुख्यमंत्री शिंदेवर साधला निशाणा
मुंबईसह राज्यात नुकताच दही हंडीचा उत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर आता गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षणाचा मुद्यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर एकाबाजूला अशिक्षित गोविंदाना नोकरी देणार मग राज्यातील शिक्षित असलेल्या शिक्षक, आरोग्य विभाग आणि पोलिस भरतीवरून सवाल करण्यात आलेला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावरून …
Read More »शिंदे गटातील मंत्र्यांवर मुख्यमंत्री शिंदेंची माणसे ठेवणार लक्ष्य भाजपाच्या पध्दतीने शिंदेंचे पाऊल
राज्यात स्थानापन्न झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्र्यांना खात्याचे वाटप करण्यात आले. मात्र खाते वाटपानंतर आधीच्या तुलनेच चांगली खाती मिळाली नसल्यावरून शिंदे गटातील मंत्र्यांमध्ये नाराजीच्या चर्चा बाहेर आल्यानंतर या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच मंत्री झालेल्यांकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ताफ्यातील माणसे त्यांच्या दिमतीला देत आपल्याच मंत्र्यांवर अप्रत्यक्ष लक्ष ठेवणार असल्याची धक्कादायक माहिती पुढे …
Read More »फुटीर आमदारांच्या मतदारसंघात आता शिवसेनेकडून बांधणी; सुरुवात सोलापूरातून शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघातून सुरुवात
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावित सेनेच्या ४० आमदारांसह १० समर्थक अपक्षांनाही सोबत नेले. त्यामुळे आता शिवसेनेत होणारी पडझड थांबविण्यासाठी शिवसेनेकडून बांधणीचा प्लॅन आखला असून बंडखोर आमदारांना धडा शिकविण्यासाठी बंडखोरांच्या मतदारसंघात उध्दव ठाकरे यांना मानणाऱ्या समर्थकांची सभा घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या …
Read More »निमित्त दही हंडीचे, शिंदे गट- भाजपाकडून समिकरण मात्र महापालिका निवडणूकीचे गोविंदा पथकांना आकृष्ट करण्याकडे कल
राज्याच्या राजकारणात विशेषत: २०१४ साली सत्तेत आल्यापासून आणि विरोधात बसून पुन्हा सत्तेत विराजमान झालेल्या भाजपाकडून प्रत्येक गोष्ट ही निवडणूक प्रचार आणि मतदार वाढविण्यासाठी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे प्रत्येक सण आणि प्रत्येक गोष्ट ही इव्हेंट पध्दतीने करायची असा खाक्याच जणू भाजपाने स्विकारल्याचे दिसून येत आहे. …
Read More »मुख्यमंत्री शिंदें यांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांचा पलटवार, थर लावले की थरकाप ५० थराची हंडी लावली वक्तव्याचा घेतला समाचार
आज मुंबईसह राज्यात दही हंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. मात्र या दही हंडीतील थर लावण्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हीही हंडी फोडलीय. ती हंडी मोठी कठीण होती. पण ५० थर लावून ती हंडी फोडल्याचे वक्तव्य करत आपल्या बंडखोरीचे मोठेपणा सांगितला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्याचा धागा …
Read More »टेंभी नाक्यावरील दही हंडीत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, हंडी कठीण होती पण आम्ही फोडली… हे थर आणखी वाढणार काळजी करायचे काम नाही
गेल्या दीड ते दोन महिन्यात खूप घडामोडी घडल्या असून त्या दरम्यान आम्ही सर्वात मोठी हंडी फोडली. हंडी कठीण होती. पण, बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने आम्ही हंडी फोडली, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील टेंभीनाक्यावरील दहीहंडी उत्सवात बोलताना केले. या हंडीसाठी ५० थर लावले होते आणि …
Read More »
Marathi e-Batmya