महिला व मुलींवर होणारे लैंगिक अत्याचार, शाळा कॉलेजच्या परिसरामध्ये खुलेआम गर्द विक्री, जुगाराचे अड्डे या सर्व गोष्टी मुक्त पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात होतात व ह्या सर्व गोष्टींना राजाश्रय आहे की काय असा सवाल सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाल्याची संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केली. …
Read More »जयंत पाटील यांचा खोचक सवाल,… पैसे वाटले म्हणजे तुमचे बाकीचे कर्तव्य संपलं? राज्यातील गृह खातं मूग गिळून का गप्प बसलंय?
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बदलापूर येथील अत्याचार प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करत तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. आपल्या एक्स हँडलवरून प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले की, सध्या राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. महिलांवरील अत्याचारासाठी आपण दिल्ली नोएडा सारख्या भागांना नावे ठेवायचो आता …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, बदलापूर घटनेची अतिशय गंभीर दखल आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार
बदलापूरमध्ये एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला. आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक) तातडीने खटला चालविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी पोलीस आयुक्तांशी देखील …
Read More »उमेद महिला बचतगट अभियानातील बहिणींचे वर्षा शासकीय निवासस्थानी रक्षाबंधन मुख्यमंत्र्यांसाठी एक कोटी राख्यांचा संकल्प, राज्यातील बहिणींची कृतज्ञता
“माझ्या बहिणी राज्याच्या विकासात मोठे योगदान देतात. त्यांना आधार देण्यासाठी जे-जे करता येईल ते करेन. आमची ताकद जस-जशी वाढत जाईल, तशी आर्थिक मदतही वाढवली जाईल,”असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच रक्षाबंधनापूर्वी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेतील दोन हप्ते जमा करण्याचा निर्धारही पूर्ण केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर, मुख्यमंत्री शिंदे खरं आहे म्हणाले तर मी राजकीय संन्याय घेईन मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपावर उपमुख्यमंत्री फडणवीसांचे प्रत्युत्तर
केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणूकीची तारीख अद्याप जाहिर केलेली नसली तरी निवडणूकांचा कालावधी जसजसा जवळ येत चालला आहे, तसतसा राज्यातील राजकिय वातावरण तापू लागले आहे. त्यातच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर दररोज आरक्षणाचे आंदोलनकर्त्ये मनोज जरांगे पाटील यांच्याकडूनही दररोज मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर दररोज आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर आज …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी, ३५ हजार कोटीची तरतूद पन्नास हजार महिलांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्वकांक्षी व क्रांतिकारी योजना असून ही लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. या आर्थिक वर्षात योजनेसाठी ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याची आर्थिक स्थिती जसजशी मजबूत होत जाईल तसे सद्यस्थितीत असणारी दरमहा १ हजार ५०० रुपयांची रक्कम वाढवत जावून टप्या-टप्याने …
Read More »राज्यातील पहिल्या सौरग्रामाचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण साताऱ्यातील मान्याची वाडी ठरले पहिले सौर ग्राम
राज्य शासनाने गेल्या अडीच वर्षांत सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून वीजक्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांना एप्रिलपासून पुढील पाच वर्ष मोफत वीज देण्यात येत आहे. तर मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना व मागेल त्यांना सौर कृषिपंप योजनेतून दिवसा वीजपुरवठा करण्यात येणार आहे. सोबतच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज …
Read More »डॉक्टरांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसमवेत चर्चा कोलकत्ता येथील महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आदेश
राज्यासह देशात डॉक्टरांच्या सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केंद्रीय सार्वजनिक आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय स्तरावर एक कडक कायदा तयार करण्यात यावा, याअनुषंगाने यावेळी चर्चा झाली. यासंदर्भात सकारात्मक विचार करावा, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. कोलकत्ता येथील प्रशिक्षणार्थी …
Read More »वादग्रस्त रामगिरी महाराजांची भेट घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे आता सलोखा राखण्याचे आवाहन राज्यात कायदा-सुव्यवस्था, सामाजिक सलोखा राखा
दोन दिवसांपूर्वी रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मगुरु महम्मंद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. तरीही त्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रामगिरी महाराज यांची भेट घेत त्यांच्यासोबत एका कार्यक्रमात एकाच मंचावर उपस्थितही राहिले. तर …
Read More »मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, माझी लाडकी बहिण योजनेचा शानदार शुभारंभ लाडक्या बहिणींच्या जीवनात सुखाचे-आनंदाचे क्षण यावे हीच या भावाची इच्छा
महिलांच्या ढोल आणि लेझीम पथकाचे सादरीकरण, उत्सवाच्या वातावरणात सजलेला आणि महिला भगिनींनी फुललेला शिवछत्रपती क्रीडानगरीचा परिसर, महिलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी महिलांना दिलेल्या शुभेच्छा… अशा उत्साहपूर्ण वातावरणात ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने’चा पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. महिलांच्या जीवनात सुखाचे, आनंदाचे दिवस यावे हीच भाऊ म्हणून प्रामाणिक इच्छा …
Read More »
Marathi e-Batmya