रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे,सुधारित बियाणांचा वापर वाढावा आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा,या उद्देशाने कृषी विभागामार्फत विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान (अन्नधान्य व वाणिज्यिक पिके),कडधान्य आत्मनिर्भरता अभियान आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (गळीतधान्य) सन २०२६-२७ अंतर्गत रब्बी हंगामासाठी विविध घटकांचा लाभ घेण्याकरिता …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, दुष्काळाने होरपळलेल्या बळीराजाच्या वेदना व दुःख भाजपा महायुतीला कळलेच नाही, ५ हजारात दिवाळी कशी होणार ? शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसता येत नसतील तर निदान त्यांच्या दुःखाची थट्टा तरी करू नका
राज्यातील शेतकरी अस्मानी संकटाने पुरता हवालदिल झाला आहे. पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम हातातून गेला आहे, दसरा दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. दिवाळीचा सण कसा करायचा हा यक्षप्रश्न शेतकऱ्यासमोर उभा ठाकला आहे, मायबाप सरकार मदतीला धावून येईल अशी अपेक्षा असताना सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. प्रचंड महागाई असताना ५ …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घोषणेवर धाराशिवच्या शेतकऱ्याने १५०० रुपये कर्जाऊ घेत केली ५ हजाराची मनी ऑर्डर दीड एकर सोयाबीनच्या उत्पन्नात १५०० रुपयांच्या कर्जाची रक्कम एकत्रित करत पाठवले पाच हजार
धाराशिव तालुक्यातील सुर्डी येथील एका शेतकऱ्याने शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीवर नाराजी व्यक्त करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाच हजार रुपयांची मनीऑर्डर पाठवली. तसेच दीड एकर सोयाबीनच्या पिकासाठी तब्बल २५ हजार रुपये खर्च करूनही हातात अवघे ३ हजार ९०० रुपये आल्याने शेतकऱ्याने हे पाऊल उचलल्याचे …
Read More »जयंत पाटील यांची मागणी, कांद्याला किमान २००० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करा आणि नुकसान भरपाई द्या प्रति क्विंटल १५०० रुपये अनुदान द्या, जयंत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
कांद्याला किमान २००० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करावा आणि सध्याच्या नुकसानीची भरपाई म्हणून प्रति क्विंटल १५०० रुपये अनुदान देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली. आपल्या पत्रात जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील अग्रगण्य …
Read More »“शेतकरी” या व्याख्येत महिलांचा समावेश करून, समान वेतन, कर्ज व विस्तार सेवा उपलब्ध करा एआय अॅग्री २०२६ परिषदेत तज्ञांची शिफारस
शाश्वत शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभावी ठरत असतानाच, या तंत्रज्ञानात लिंग-संवेदनशीलता जपणे अत्यावश्यक आहे. महिलांना कृषी नवोपक्रमात समान भागीदार म्हणून मान्यता दिली पाहिजे.महिलांची डिजिटल साक्षरता वाढवली पाहिजे. “शेतकरी” या व्याख्येत महिलांचा समावेश करण्याची, समान वेतन सुनिश्चित करण्याची आणि महिलांसाठी अनुकूल कर्ज व विस्तार सेवा उपलब्ध करून देण्याची शिफारस करावी, असे मत नामवंत …
Read More »भारतीय लोक प्रशासन संस्था महाराष्ट्र शाखेतर्फे प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न शासकीय खरेदी प्रक्रिया आणि गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस चे महत्व याविषयी मार्गदर्शन
भारतीय लोक प्रशासन संस्था महाराष्ट्र प्रादेशिक शाखेच्या वतीने विविध विषयांवर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय लोक प्रशासन संस्था प्रादेशिक शाखा मंत्रालय, मुंबईचे मानद खजिनदार विकास विनायक देवधर आणि विशेष कार्य अधिकारी शशांक यशवंत बर्वे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्रात शासकीय खरेदी …
Read More »सचिन सावंत यांचा आरोप, मोदी-फडणवीसांकडून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक सोयाबीनला प्रति क्विंटल ६,००० रुपये हमीभावाची मागणी करणारे फडणवीस सत्तेत असूनही भाव का देत नाहीत ?
मोदी सरकारने या वर्षी सोयाबीनसाठी केवळ ५३२८ रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव जाहीर केला आहे. परंतु २०१३ साली भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी दिंडी काढून सोयाबीनला ६,००० रुपये हमीभाव देण्याची मागणी केली होती. त्या दिंडीला आज १२ वर्षे झाली, आणि मोदी सरकार सत्तेत येऊन ११ वर्षे उलटली तरीही …
Read More »कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची वाशिम जिल्ह्यातील बांधावर जात केली बाधित क्षेत्राची पाहणी पहिल्या टप्यात ७३ कोटी ९१ लाख ४३ हजार तर दुसऱ्या टप्यात ५५३ कोटी ४८ लाख ६२ हजारांचा नुकसानग्रस्त निधी मंजूर
“अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत देण्यासाठी शासन कटिबद्ध असून त्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. राज्यात पहिल्या टप्यात ७३ कोटी ९१ लाख ४३ हजार तर दुसऱ्या टप्यात ५५३ कोटी ४८ लाख ६२ हजारांचा नुकसानग्रस्त निधी शेतक-यांना मंजूर झाला आहे. मंजूर केलेला निधी पुढच्या आठवड्यापासून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात …
Read More »माणिकराव कोकाटे यांचा अजब सवाल, कर्जमाफीच्या पैशांन काय करता? साखरपुडा, लग्न… शेतकऱ्यांनं कर्जमाफी बाबत विचारणा केल्यावर राज्याच्या कृषी मंत्र्यांच उत्तर
राज्यातील लाडकी बहिण योजनेतंर्गत १५०० चे २१०० रूपये देणार आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार या दोन आश्वासने महायुती सरकारने विधानसभा निवडणूकीच्या काळात दिली होती. मात्र राज्यात सरकार स्थानापन्न होऊन चार महिने झाले तरी लाडक्या बहिणींचे १५०० चे २१०० रूपये आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी या दोन गोष्टी काही अद्याप सत्यात उतरल्या नाहीत. त्यातच …
Read More »तीन वर्षातील ४४८ शेतकरी पुरस्काराने सरकारकडून सन्मानित होणार रविवारी राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण व सत्कार समारंभाचे आयोजन
राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषि उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणा-या शेतकऱ्यांचा आणि कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणा-या व्यक्ती, संस्था, गट, अधिकारी, कर्मचारी यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), उद्यान पंडीत, वसंतराव नाईक …
Read More »
Marathi e-Batmya