मुंबई : प्रतिनिधी मागील काही महिन्यापासून राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नावरून सातत्याने मोर्चे, धरणे आंदोलन करण्यात येत होते. तसेच राज्याच्या विधिमंडळातही विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे एक आठवड्याहून अधिक दिवस कामकाजही होवू शकले नाही. अखेर मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याविषयीचा कृती अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर विधान …
Read More »अहवालात दडलय काय? विरोधकांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मराठा समाज आणि धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकारला सादर करण्यात आलेला राज्य मागासवर्ग आयोग आणि टीसचा अहवाल विधानसभेत मांडण्याची विरोधकांकडून सातत्याने मागणी करण्यात येत आहे. तरीही राज्य सरकार आणि मुख्यमंत्री हे दोन्ही अहवाल सभागृहात मांडायला तयार नाही. त्यामुळे या अहवालात दडलय तरी काय ? असा सवाल …
Read More »मान्य केलेल्या पुरवण्या मागण्या रद्द करुन नंतर चर्चा घ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांच्यासह विरोधकांची मागणी
मुंबई: प्रतिनिधी मराठा आरक्षण, धनगर आरक्षणासंदर्भात सादर झालेले अहवाल सभागृहात मांडण्याच्या मुद्यावरून विरोधकांनी आग्रही भूमिका मांडली. मात्र राज्य सरकारकडून वारंवार त्या मागणीकडे दुर्लक्ष करत कामकाज पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. अखेर विरोधकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असता विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुरवण्या मागण्या मतास टाकत त्या एकमताने मंजूर केल्या. त्यामुळे …
Read More »आरक्षणाबाबत निर्णय घेता येत नसल्याने सरकार पळ काढतेय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी आरक्षणाबाबत सरकार चालढकलपणा करण्याचा प्रयत्न करत असून सरकारला निर्णय घेता येत नसल्याने सरकार यापासून पळ काढत आहे असा आरोप विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी केला. सभागृहनेते चंद्रकांत पाटील हे मागील आठवडयात तेच बोलत आहे आणि आजही तेच बोलत आहेत. त्यामुळे सरकारकडे आलेला मागास आयोगाचा अहवाल आणि टीसचा अहवाल …
Read More »अजित पवार म्हणतात दिलेला शब्द फिरविणाऱ्यातला मी नाही भाजप आमदार शेलारांच्या वक्तव्यावर अजितदादांचा खुलासा
मुंबई: प्रतिनिधी मी माझ्या जीवनात एकदा दिलेला शब्द कधीही फिरवित नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाच्याबाबत मी मांडलेली भूमिका कालही तीच होती आजचही तीच आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर हे आरक्षण न्यायालयात टिकणारे हवे. त्यामुळे राज्य मागासवर्ग आयोगाने काय अहवाल दिला? याची माहिती सभागृहाला मिळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत …
Read More »मराठा आरक्षण द्यायचे असेल तर ५० टक्केपेक्षा जास्तची तरतूद करा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा सरकारला सल्ला
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात न्यायालयात गेल्यास त्या आरक्षणाचे उलट-सुलट होणार आहे. जर आरक्षण द्यायचे असेल तर ते ५० टक्के पेक्षा जास्त देता येणार नाही. तशी सिलिंग राज्यघटनेने नाही तर सर्वोच्च न्यायालयाने घातली आहे. त्यामुळे राज्यातील मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर संसदेत जावून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या …
Read More »राजदंड पळवूनही सभागृह सुरु ठेवणे म्हणजे सार्वभौम सभागृहाचा अवमान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची टीका
मुंबई : प्रतिनिधी सभागृहात राजदंड पळवला जातो याचा अर्थ सभागृहाचे कामकाज बंद व्हायला हवे होते मात्र अध्यक्षांनी सभागृह तहकुब केले नाही. हा एकतर राजदंडाचा अपमान आहे किंवा राज्याच्या सार्वभौम सभागृहाचा अवमान आहे असा आरोप माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. विधानसभा आणि विधानपरिषदेचे कामकाज परंपरेनुसार चालते. सभागृहात राजदंड उचलला …
Read More »प्यायला नाही पाणी, सरकारची फक्त आश्वासनांची वाणी मराठा आरक्षण, कर्जमाफीच्या प्रश्नावर विरोधकांचे सरकार विरोधात घोषणाबाजी
मुंबई : प्रतिनिधी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील मराठा आरक्षण, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि दुष्काळी मदत जाहीर करण्याच्या प्रश्नावरून विरोधकांनी आंदोलन केले. विधिमंडळाचे कामकाज सुरु होण्यापूर्वीच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर बसून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी विरोधकांकडून प्यायला नाही पाणी सरकारची फक्त आश्वासनांची वाणी, विठ्ठला विठ्ठला…मराठा, मुस्लिम, …
Read More »भाजप-शिवसेनेचे सरकार म्हणजे ‘ठग ऑफ महाराष्ट्र’! धनगर, मुस्लीम समाजालाही जल्लोषाची संधी का नाही? विरोधी पक्षांचा सवाल
मुंबई : प्रतिनिधी मागील ४ वर्षांपासून राज्यात केवळ ठगबाजी करणारे भाजप-शिवसेनेचे सरकार ‘ठग ऑफ महाराष्ट्र’असल्याचा घणाघात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. नुकताच प्रदर्शित झालेला ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ हा चित्रपट फ्लॉप करणारी जनता आता महाराष्ट्रातील या ठगांनाही भूईसपाट केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या …
Read More »मराठा समाजाला एसईबीसी या स्वतंत्र प्रवर्गाखाली आरक्षण देणार मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारने स्विकारल्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारला मिळाला आहे. या अहवालातील शिफारसीनुसार मराठा समाजाला एसईबीसी अर्थात सामाजिक-शैक्षणिक मागास वर्ग या स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारच्यावतीने आयोजित चहापानाच्या कार्यक्रमानंतर …
Read More »
Marathi e-Batmya