Tag Archives: ncp

ही कसली प्रगती ? ही तर अधोगती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सेना-भाजप युतीला ३१ ऑक्टोंबरला चारवर्षे पूर्ण होत असून या चार वर्षात सरकारने काय केले असा सवाल करीत ही कसली प्रगती ही तर अधोगती असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. राज्य असुरक्षित अर्थशुन्य, अशांत, असहाय्य असल्याचे सांगत राज्य सरकारने काय केले असा सवाल त्यांनी विचारला. …

Read More »

मराठा मोर्चाचे २५ नोव्हेंबरपासून आमदार-खासदाराच्या घरासमोर आंदोलन आबासाहेब पाटील आणइ रमेश केरे-पाटील यांचा इशारा

मुंबईः प्रतिनिधी भाजप सरकारने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे कि येत्या १५ नोव्हेंबर २०१८ पर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल परंतु आम्हाला सरकारकडून कोणतीही हालचाल किंवा सकारात्मक कृती दिसत नाही. भाजप सरकार आणि मुख्यमंत्री यांच्यावर आता आमचा विश्वास राहिलेला नाही. आम्हाला जी तोंडी व लेखी आश्वासने …

Read More »

दुष्काळामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार दया आणि भारनियमनमुक्त महाराष्ट्र करा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर असून महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत दया शिवाय महाराष्ट्राला भारनियमन मुक्त करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. अर्ध्यापेक्षा जास्त महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना केंद्रांचे पथक येण्याची वाट पाहिली जात आहे. …

Read More »

छत्रपतींच्या स्मारकाला तांत्रिक परवानगी नाही सरकार जनतेच्या डोळयात धुळफेक करत असल्याचा नवाब मलिक यांचा आऱोप

मुंबईः प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी कोणतीही तांत्रिक परवानगी नसताना कंत्राटदारांकडून फक्त काम सुरु केल्याचे दाखवून सरकार जनतेच्या डोळयात धुळफेक करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. मुंबईतील अरबी समुद्रातील छत्रपतींच्या स्मारकाचे दोन वर्षापूर्वी मोदींनी जलपूजन केले होते. परंतु पुढे त्याचे काही झालेले नाही. …

Read More »

दुष्काळासाठी ३१ ऑक्टोबरनंतर कोणता मुहुर्त ? प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबईः प्रतिनिधी सरकारला ३१ ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर करायला कोणता मुहुर्त मिळणार आहे असा संतप्त सवाल करतानाच भाजपला सरकारी तिजोरीतले पैसे वाचवायचे आहे म्हणून दुष्काळ जाहीर करण्यात उशीर केला जात आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी सरकारवर केला. महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ३१ ऑक्टोबरनंतर राज्यात दुष्काळ …

Read More »

चार वर्ष सत्तेत आहात मग राममंदीर का नाही झाले ? राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव हेमंत टकले यांचा सवाल

मुंबईः प्रतिनिधी चार वर्ष सत्तेत आहात मग कोणी थांबवलं होतं कायदा करायला आणि राममंदीर बनवायला. शिवसेना आणि भाजपचे लोक विषय संपवण्याचा विचार करत नाही तर तो विषय तसाच भिजत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत जेणेकरुन लोकांना इमोशनल ब्लॅकमेल करता येईल असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव आमदार हेमंत टकले यांनी …

Read More »

जनताच माझा पक्ष निवडणूक लढवण्यावर उदयनराजे ठाम

मुंबईः प्रतिनिधी जनताच माझा पक्ष आहे. जोपर्यंत जनतेला मी निवडणूक लढवावी, असे वाटते तोपर्यंत मी निवडणूक लढवणार, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी आपल्याला पक्षाने उमेदवारी देवो अथवा ना देवो, आपण निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार, असल्याचे सूचित केले. मंगळवारी खासदार उदयनराजे मंत्रालयात आले होते. तेथे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

राष्ट्रवादीचे सरकारविरोधात २ ऑक्टोबरला राज्यभर धरणे आंदोलन महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर बसून मुक आंदोलन करणार

मुंबईः प्रतिनिधी केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या धोरणांमुळे आर्थिक,सामाजिक परिस्थिती खालावली असून सर्वच क्षेत्रात अपयशी ठरलेल्या आणि लोकशाही मुल्यांची पायमल्ली करणाऱ्या भाजप सरकारच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस २ ऑक्टोबरला राज्यभर धरणे आणि मौनव्रत आंदोलन करत आहे. भाजपच्या प्रतिगामी धोरणांमुळे महात्मा गांधींनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य, लोकशाही व संविधानिक सार्वभौमत्व धोक्यात आलेले आहे. त्यामुळे …

Read More »

धन्यवाद सनातन संस्था, आता मी कोर्टातच सिध्द करेन नवाब मलिक यांनी स्विकारले सनातनचे आव्हान

मुंबईः प्रतिनिधी धन्यवाद सनातन संस्था…मला कोर्टात सिध्द करण्याची संधी दिली आणि मी ते कोर्टातच सिध्द करेन… अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी सनातन संस्थेने पाठवलेल्या नोटीसीला उत्तर दिले आहे. सनातन संस्थेने आज नवाब मलिक यांना कोर्टाची नोटीस पाठवली आहे. त्या नोटीसीमध्ये सनातन संस्थेने संस्थेची बदनामी केल्याचे …

Read More »

विरोधकांच्या टीकेनंतर अर्थमंत्र्यांची सारवासारव सरकार वित्त आय़ोगासमोर बाजू मांडणार असल्याची वित्तमंत्री मुनगंटीवार यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या आर्थिक परिस्थितीवरून विरोधकांनी टीकेची झोड उठविल्यानंतर अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी सारवा सारव करत अर्थशास्त्राच्या मापदंडानुसार सरकार वेतन देत आहे. कर्जावरील व्याज, निवृत्तीवेतन देत आहोत. या आणि अशाच कितीतरी बाबी आम्ही १५ व्या वित्त आयोगापुढे मांडणार आहोत. त्या मांडल्यानंतर वित्त आयोग आपल्या निष्कर्षाबाबत निश्चितच खुलासा करेल, असा विश्वास त्यांनी …

Read More »