मुंबई : प्रतिनिधी राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळाचे गांर्भिय लक्षात घेवून राज्यसरकारने निश्चित कृती कार्यक्रम हाती घ्यावा आणि वेळीच पाऊले उचलून जनतेला दिलासा दयावा अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिले असून त्यासोबत दुष्काळी संकटाशी सामना करण्यासाठी लागणाऱ्या उपाययोजनांची टिप्पणीही पाठवली आहे. महाराष्ट्राच्या …
Read More »शासकिय अधिकाऱ्यांनो फक्त चांगलीच माहीती द्या मुख्यमंत्र्यांनी फर्मान दिल्याचे आयएएस अधिकाऱ्यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी राजकिय फायद्यासाठी सत्ताधारी राजकिय पक्षांकडून शासकिय यंत्रणेचा गैरवापर करण्याचे प्रकार आतापर्यंत अनेकदा झाले. परंतु आगामी निवडणूका जिंकायच्याच आणि पुन्हा सत्तास्थानी यायचेच या उद्देशाने शासकिय सेवेतील सर्वच आयएएस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच वापरण्याचा अश्लाघ्य प्रकार विद्यमान राज्य सरकारकडून सुरु असल्याची माहिती एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. …
Read More »मराठा आरक्षणाचे विधेयक आगामी अधिवेशनात मंजूर होणार ? अहवालाचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची लगबग
मुंबईः प्रतिनिधी अखेर राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाला द्यावयाच्या आरक्षणासंबधीचा अहवाल गुरूवारी राज्य सरकारला सादर करण्यात आला. या अहवालाचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी प्रशासनातील ६ अभ्यासू अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. तसेच या हिवाळी अधिवेशनातच याविषयीचे विधेयक मांडून मंजूर करण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. मराठा …
Read More »सरकार दरबारी प्रश्न सोडविण्यासाठी जनतेने राष्ट्रवादीकडे प्रश्न पाठवावे जनतेने प्रश्न आणि समस्या राष्ट्रवादी कार्यालयात पाठविण्याचे आवाहन
मुंबईः प्रतिनिधी दुष्काळ… महागाई… इंधनाचे वाढते दर… महिला सुरक्षितता… आरक्षण… शेतकऱ्यांचे… सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न आवासून उभे आहेत त्यामुळे जनतेकडूनच थेट प्रश्न मागवण्यात येत असून हे प्रश्न आणि समस्या येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये भाजप सरकारच्या गळी उतरवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी देतानाच राज्यातील जनतेने आपले प्रश्न …
Read More »काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकारविरोधात मुंबईत आंदोलन राष्ट्रवादीच्या कार्यालयात महत्वपूर्ण संयुक्त बैठक पार
मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी युवक काँग्रेस, युवक काँग्रेस (INC)आणि समविचारी पक्षाच्या युवकांची महत्वपूर्ण बैठक राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयामध्ये आज पार पडली. येत्या काळामध्ये सरकारच्या धोरणाविरोधात मुंबईमध्ये मोठे आंदोलन उभे करण्याचा निर्धार या बैठकीमध्ये करण्यात आला. ही बैठक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीला …
Read More »आधी बनवा आणि मग नावाची भांडणे करा समृध्दी महामार्गाला नाव देण्याच्या मागणीवरून नवाब मलिक यांचा सेना-भाजपला टोला
मुंबई : प्रतिनिधी समृध्दी महामार्गातील शेतकऱ्यांवर अन्याय न करता समृध्दी महामार्ग बनवा नंतर नावाची भांडणे करा असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला आहे. समृध्दी महामार्गाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दयावे अशी मागणी शिवसेनेने तर भाजपने माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची …
Read More »मराठा समाजाला स्वतंत्र १० टक्के आरक्षण देण्याची शिफारस निर्णय मात्र राज्य सरकारच्या हातात
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी लावण्यात आलेल्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक निकषाच्या आधारे मराठा समाज मागस असल्याचे सिध्द होत आहे. त्यामुळे ओबीसी प्रवर्गाखाली किंवा स्वतंत्ररित्या किमान ९ ते १० टक्के आरक्षण मराठा समाजाला देण्यास राज्य मागासवर्गीय आय़ोगाने सहमती दर्शविल्याची माहिती आयोगाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. आयोगाकडून राज्यातील जवळपास ४५ …
Read More »सामाजिक वातावरण खराब करणाऱ्या शक्तीच्याविरोधात लढण्यासाठी सज्ज व्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आदेश
मुंबईः प्रतिनिधी जाती-जातीमध्ये…धर्मा-धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे आणि गावागावात चुकीचे संदेश पोचवण्याचे काम केले जात असल्यामुळे देशात आज खराब आणि भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे…या शक्तीच्याविरोधात सामना करण्यासाठी तयार होतानाच आपल्याला नेहरु,मौलाना आजाद,आंबेडकरांचे विचार घेवून आपण पुढे जायला हवे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले. मौलाना …
Read More »विधानसभा-लोकसभेच्या निवडणूका एकत्रित घेणार ? जनतेचे जनमानस जाणून घेण्यासाठी कंत्राटी नोकर भरतीची सरकारची जाहीरात
मुंबईः प्रतिनिधी संसदेच्या लोकसभा सभागृहाची मुदत येत्या मे २०१९ रोजी संपत आलेली आहे. त्यामुळे देशभरातील सर्वच राजकिय पक्षांकडून लोकसभेच्या निवडणूकीची पूर्व तयारी सुरु केलेली असताना केंद्रातील भाजप सरकारसोबतच राज्यातील विधानसभेची निवडणूक घेण्याच्या हालचाली पक्षीय पातळीवर सुरु आहे. मात्र महाराष्ट्रात लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणूकांना सामोरे जाण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. …
Read More »अखेर राज्यातील २६ जिल्ह्यातील १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर ११२ तालुक्यात गंभीर तर ३९ तालुक्यात मध्यम दुष्काळ सरकारकडून जाहीर
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील २६ जिल्ह्यातील १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून ११२ तालुक्यात गंभीर तर ३९ तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर करण्यात आला. यासंदर्भात राज्याच्या महसूल विभागाने शासनादेश जारी केला आहे. राज्यात ३५५ तालुके असून यापैकी सांगली जिल्ह्यातील जत, कवठे-महांकाळ, खानापूर, आटपाडी, तासगांव तर सातारा जिल्ह्यातील माण- दहिवडी, सोलापूर जिल्ह्यातील …
Read More »
Marathi e-Batmya