राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे पहिल्यांदाच वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलताना म्हणाले, साखरेचा राजकिय गोडवा शरद पवारांच्या बोलण्यात आले. त्यामुळेच अनेक नेत्यांच्या तोंडी त्यांचे नाव असते. याशिवाय त्यांचे मार्गदर्शन मी नेहमी घेत असतो अशी कबुली दिली. …
Read More »मंत्रालयातील कंत्राटी कामगारांना सहा महिने पगार नाही ही गंभीर बाब त्यांची देणी तातडीने देण्याची खासदार सुप्रियाताई सुळे यांची मागणी
मंत्रालयातील प्रवेशाचे पास देणाऱ्या कंत्राटी कामगारांना गेल्या सहा महिन्यांपासून पगारच मिळाला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. ही अतिशय गंभीर बाब असून या कर्मचाऱ्यांना त्यांची देणी तातडीने द्यावीत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ट्वीट करत केली आहे. याशिवाय मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असणारे पास बंद …
Read More »सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्यावरून साधला निशाणा हैद्राबादच्या उद्योजकांना दावोसला भेटण्याची गरज नव्हती
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौर्यावर येत असून या मुंबई दौऱ्यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपाबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरही निशाणा साधला. महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असल्याने त्यांचे आम्ही स्वागतच करतो. या भाजपामध्ये अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, अरुण जेटली, यशवंत सिन्हा, सुषमा स्वराज यांच्यासारखे मोठे नेते पाहिले …
Read More »नाना पटोलेंची घोषणा, सत्यजीत तांबेंवर कारवाई, तर मविआचा पाटील- अडबालेंना पाठिंबा सत्यजित तांबेवरही काँग्रेस पक्ष निलंबनाची कारवाई करणार
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी पाटील व नागपूर शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे. नाशिक मतदारसंघातील घटनांमुळे डॉ. सुधीर तांबे यांना पक्षाने आधीच निलंबित केले असून सत्यजित तांबेवरही कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना …
Read More »अजित पवार म्हणाले, आदित्य ठाकरेंच्या सांगण्यात १०० टक्के तथ्य अर्थसंकल्प झालेला असताना इतके पैसे कोठून आणणार
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेत नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराचे नाव अखेर शिवसेनेकडून अंतिम करण्यात आल्यानंतर आणि नाशिक व नागपूर जागेची काँग्रेस आणि शिवसेनेने आपापसात आदलाबदल केली. नाशिकच्या उमेदवाराला काँग्रेसने पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची कोणती भूमिका राहणार याची माहिती अजित पवार यांनी दिली. यावेळी मुंबईतील सिमेंट रस्त्याच्या निविदेबाबत नुकतीच शिवसेना …
Read More »अजित पवारांचा खोचक टोला, दावोसहून मोठी गुंतवणूक आणाच पण आल्यावर… हिंदी राष्ट्रभाषा करायला हरकत नाही तसा केंद्रसरकारने प्रयत्न करावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दावोसला गेले आहेत. त्यांनी राज्यात गुंतवणूकीच्या दृष्टीकोनातून जास्तीत जास्त निधी आणावा, मात्र दावोसवरून आल्यानंतर आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करावे असा उपरोधिक टोला अजित पवार यांनी लगावत कारण काही लाख कोटी रुपये गुंतवणूक असणारे प्रकल्प बाहेर जाऊ देणे आणि काही लाख तरुणांना रोजगारापासून वंचित ठेवले हे त्रिवार सत्य …
Read More »अजित पवार सरकारला म्हणाले, …मुजोर बँकांना कडक शब्दात समज द्या शासन आदेश धुडकावत पीक कर्जासाठी बँकांकडून ‘सीबील’ची सक्ती
राज्यातील काही व्यापारी, राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना अल्पमुदतीचे पीक कर्ज देताना ‘सीबील’ अहवाल विचारात घेतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मंजूर होताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याबाबत मी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आवाज उठवला होता. त्यावेळी शेतकऱ्यांना कर्ज देताना ‘सीबील’ स्कोअर पाहिला जाणार नसल्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते. त्याबाबत शासनाने आदेश …
Read More »MPSC प्रश्नी शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट फोन अन चंद्रकांत पाटलांवर निशाणा विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांसोबत होणार बैठक
महाराष्ट्र केसरी विजेता शिवराज राक्षे याचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते पुण्यातील मोदी बागेतील घरी झाला. त्यानंतर शरद पवार यांनी स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून शरद पवार चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक …
Read More »शरद पवार यांनी सत्कार केल्यानंतर शिवराज राक्षेकडून व्यक्त केली ‘ही’ अपेक्षा पहिल्यांदाच गैरहजर राहिल्याचे कारणही स्पष्ट केले
पुणे येथे काल ६५ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार रंगला. या स्पर्धेला पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार अनुपस्थित होते. आजवर अनेकदा स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी शरद पवार हे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहत असत. यावेळी महाराष्ट्र केसरीच्या आयोजनात आणि निमंत्रित मान्यवरांमध्ये भाजपातील नेतेच दिसत होते. आज शरद …
Read More »अजित पवार म्हणाले, माझी हात जोडून विनंती, २ वरच थांबा उगाच पलटण वाढवू नका देवाची कृपा की कोणाची कृपा आम्हाला माहितच आहे
वाढत्या लोकसंख्येमुळे स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधांवर पडणाऱ्या ताणावरून नेहमीच राजकिय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या जातात. मात्र हाच मुद्दा राज्याचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अतिशय मिश्किलपणे उपस्थित करत छोटे कुटुंब सुखी कुटुंबाचा सल्ला दिला. बारामतीत आयोजित एका कार्यक्रमात अजित पवार म्हणाले, ‘माझी महिलांना हात जोडून विनंती …
Read More »
Marathi e-Batmya