MPSC प्रश्नी शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट फोन अन चंद्रकांत पाटलांवर निशाणा विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांसोबत होणार बैठक

महाराष्ट्र केसरी विजेता शिवराज राक्षे याचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते पुण्यातील मोदी बागेतील घरी झाला. त्यानंतर शरद पवार यांनी स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून शरद पवार चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक शब्दात निशाणा साधला.

यावेळी शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून बोलताना म्हणाले, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आज माझ्याकडे काही प्रश्न घेऊन आले आहेत. माझी त्यांच्यासोबत चर्चा झाली असून, या प्रश्नावर लवकर बैठक झाली पाहिजे. त्यावर सर्वांनी सामोपचाराने प्रश्न मार्गी लागला पाहिजे. विद्यार्थ्यांमधील काही प्रतिनिधी आणि मी, तसेच तुमच्याकडील काही लोक अशी एकत्रित बैठक आपण सह्याद्रीवर घेऊया. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हो साहेब तुमची तब्येत कशी आहे. त्यावर शरद पवार म्हणाले ठीक आहे, असा दोन्ही नेत्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर संवाद झाला.

तर पुणे जिल्ह्यातील दादागिरी आणि मक्तेदारी संपवली असल्याचे विधान भाजपाचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यावर शरद पवार म्हणाले की, ते फार शक्तिमान गृहस्थ आहेत. त्यांचे एक घर कोल्हापूर येथे आहे. कोल्हापूर सोडून कोथरूड येथे त्यांना यावे लागले. कोथरूडमध्ये त्यांचे काय योगदान होते त्याबद्दल कोथरूडकरांनाच विचारलेले बरे राहील. तसेच, ज्या माणसाची स्वतःच्या जिल्ह्यातून येण्याची क्षमता नाही. त्यांच्यावर काय भाष्य करावे अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांना खोचक टोला लगावला.

About Editor

Check Also

संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हौतात्म्य पत्करलेल्या १०६ हुतात्म्यांचे चिरंतन स्मरण व्हावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने ताब्यात घेतलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *