एकट्या गडचिरोली जिल्हयात २५ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतीचे नुकसान झाले असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाऊणलाख रुपयांची मदत करावी आणि ज्या १२ लोकांनी जीव गमावला आहे त्यांच्या कुटुंबीयांना भरीव मदत करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारकडे केली आहे. अतिवृष्टी झालेल्या गडचिरोली जिल्हयातील …
Read More »जयंत पाटील यांचा खोचक टोला, जास्त आवडणारे मिळाले म्हणून उद्धव ठाकरे… राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून शिंदे गटावर खरमरीत टीका
गुवाहाटीतील वस्तीचे दिवस आणि आतापर्यंतचे दिवस पाहिले तर दोन महिने झाले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीतील वाटाघाटीत व्यस्त आहेत. दुसरीकडे राज्याला अपंग करुन सोडलंय अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. जयंत पाटील यांनी प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. मंत्रिमंडळाचा विस्तार न …
Read More »अजित पवार यांचा सवाल, बहुमताचे सरकार आहे ना, मग अधिवेशन का घेत नाही? शिंदे-फडणवीस सरकारवर उठविली टीकेची झोड
राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकत बंडखोरांचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचे भाजपाच्या पाठिंब्याने सरकार स्थापनापन्न झाले. हे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्याने आमचे सरकार हे बहुमताचे आणि जनतेचे सरकार असल्याचा दावा करत आहेत. मात्र महिना …
Read More »ब्राह्मण महासंघाचा सवाल; नेमके शरद पवार कोणते? १९७४ चे की कालचे… शिवशाहीर बा.म.पुरंदरे यांच्यावरील टीकेनंतर आनंद दवे यांचा सवाल
शिवचरित्र लिहीण्यावरून आणि त्यातील एकांगी लेखनावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवशाहिर बाबासाहेब म. पुरंदरे यांच्यावर टीकेची झोड उठवित धादांत खोटा इतिहास सांगणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांची भाषणं आणि लेखनाइतका अन्याय शिवछत्रपतींवर दुसऱ्या कुणीही केला नसल्याचे वक्तव्य केले. तसेच, शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांचे योगदान काय? …
Read More »महेश तपासे यांचा टोला, भाजपा हा मोठा दगड कधी दुसर्याच्या गळयात बांधून… चंद्रकांत पाटील यांना शिंदे सरकार असंविधानिक आहे हे माहीत आहे
शिंदेसरकार बेकायदेशीर आणि असंविधानिक पद्धतीने तयार झाले आहे असे लोकांची धारणा असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हे सरकार चालणार नाही म्हणूनच भाजपाने आपल्या मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिले आहे व येणाऱ्या काळात भाजपा आपल्या मनावर ठेवलेला हा मोठा दगड कधी दुसर्याच्या गळयात बांधून कुणाला बुडवेल? हे लवकरच …
Read More »शरद पवार यांचा भाजपाला खोचक टोला, त्यांनी दगड मनावर ठेवावा की डोक्यावर… चंद्रकांत पाटील यांच्यावर वक्तव्यावरून लगावला टोला
मागील महिनाभरापासून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाचे समर्थन भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने समर्थन करण्यात येत आहे. मात्र फडणवीस हे समर्थन करत असले तरी त्यांच्याच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्यातील खदखदीला वाट मोकळी करून देत म्हणाले की, मनावर दगड ठेवत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले …
Read More »मंत्रिमंडळ विस्तारांवरून शरद पवार यांचा शिंदे-फडणवीसांना टोला, सत्ता दोघांनाच… एक केंद्रीत सत्ता करायची असल्याने कारभार पहात आहेत
राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकत बंडखोर एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. मात्र या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असून सत्ता स्थापन होवून एक महिना होत आला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे …
Read More »शरद पवार म्हणाले, बाबासाहेब पुरंदरेंकडून शिवछत्रपतींवर भाषण, लिखाणातून अन्याय सत्यावर विश्वास ठेवणारा व्यक्ती त्यांच्या मांडणीवर विश्वास ठेवणार नाही
बाबासाहेब पुरंदरेंची भाषणं, त्यांचं लिखाण माझ्या मते शिवछत्रपतींवर इतका अन्याय दुसरा कोणी केलेला नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त करत जे काही लिखाण त्यांनी केलं, जी काही मांडणी त्यांनी केली. ती मांडणी ज्याला सत्यावर विश्वास आहे तो घटक कधीही मान्य करणार नाही. नाही त्या व्यक्तींचं महत्व …
Read More »अजित पवार यांना त्यांच्याच सोबत असणाऱ्या खास व्यक्तीकडून वाढदिवसाच्या अशाही शुभेच्छा समाजमाध्यमावरून अजित पवार यांच्या व्यक्तीमत्वाची दिली नवी ओळख
राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबद्दल सातत्याने अनेक विषयावरून चर्चा होत असते. कधी त्यांच्या वक्तशीरपणाबद्दल तर कधी त्यांच्या चिमटे काढण्याच्या पध्दतीवरून तर कधी त्यांच्या कामाच्या तर कधी फटकळपणाबद्दल चर्चा होत राहते. मात्र या पलीकडचेही एक अजित पवार तुम्हा-आम्हाला माहित नसलेले एक प्रकारची ओळख त्यांच्याच सोबत …
Read More »पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचा मोठा निर्णय, सेलिब्रेशन नको सोहळे, समारंभ, पुष्पगुच्छ, होर्डींग्ज, जाहिरातींवरील खर्च टाळून त्या निधीतून पूरग्रस्त शेतकरी, विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आवाहन
अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे राज्यात शंभरहून अधिक नागरिकांचा झालेला मृत्यू, पशुधनाची झालेली हानी, शेतजमीन व पिकांचे नुकसान, घरांची व दुकानांची पडझड, या सगळ्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उद्या (२२ जुलै ) त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तसेच …
Read More »
Marathi e-Batmya