अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे राज्यात शंभरहून अधिक नागरिकांचा झालेला मृत्यू, पशुधनाची झालेली हानी, शेतजमीन व पिकांचे नुकसान, घरांची व दुकानांची पडझड, या सगळ्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उद्या (२२ जुलै ) त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तसेच …
Read More »राष्ट्रवादीचा आरोप, …हा तर विरोधकांचा आवाज दाबण्याचा एक कुटील प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांचा आरोप
महागाई, बेरोजगारी यांसारखे गंभीर विषय हाताळण्यात अपयशी ठरलेल्या मोदी सरकार विरोधात आवाज उचलला जातो, तेव्हा त्या विरोधकांना केंद्रीय यंत्रणांद्वारा समन्स देऊन त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न आज होत असताना दिसत आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता महेश तपासे यांनी भाजपा सरकारवर केला. २०१९ मध्ये सुद्धा देशाचे नेते शरदचंद्रजी …
Read More »अजित पवार म्हणाले, हा तर महाविकास आघाडीच्या प्रयत्नाचा विजय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा ओबीसी बांधवांच्या हक्कांचा व महाविकास आघाडीच्या प्रयत्नांचा विजय
सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाच्या अहवाल मान्य करुन त्यानुसार स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका तात्काळ घेण्याचा दिलेला आदेश हा राज्यातील ओबीसी बांधवांच्या हक्कांचा आणि महाविकास आघाडी सरकारने ओबीसींच्या हक्कांसाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा विजय आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निर्णयाचे स्वागत केले आहे. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते …
Read More »संजय राऊत ट्विट करत म्हणाले, पीठ से निकले खंजरों को गिना जब… बंडखोर खासदारांवर टीका करत फुटीरावर शायरीतून निशाणा
राज्यात शिवसेना सोडून गेलेल्या आमदारांनंतर आता १२ खासदारही शिंदे यांच्या गटात सहभागी झाले. तत्पूर्वी रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडत शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. या साऱ्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, ते माझे सहकारी होते. त्यांनी …
Read More »राष्ट्रवादीने दिले रामदास कदम यांना प्रत्युत्तर, विश्वासघात योग्य असल्याचे… शिवसेना फोडली... ठाकरे कुटुंबाचा विश्वासघात केला आणि त्याचे खापर राष्ट्रवादीच्या माथ्यावर मारण्याचा प्रयत्न रामदास कदम व बंडखोर नेत्यांचा आहे - महेश तपासे
बंडखोर आमदारांनी शिवसेना फोडली… मातोश्रीला दगाफटका केला… ठाकरे कुटुंबाचा विश्वासघात केला आणि स्वतःच्या कृतीला योग्य आहे हे दाखविण्यासाठी त्याचे खापर राष्ट्रवादीच्या माथ्यावर मारण्याचा हा केविलवाणा प्रयत्न रामदास कदम व काही बंडखोर नेत्यांचा असल्याचे जोरदार प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिले. २०१९ मध्ये पवारसाहेबांनी राष्ट्रवादी – शिवसेना …
Read More »राजीनाम्यानंतर रामदास कदम यांचा ठाकरे पिता-पुत्रांसह, अजित पवार, शरद पवारांवर हल्लाबोल पक्षातून हकालपट्टीच्या प्रश्नावर झाले भावूक होत रडले
शिवसेनेतील बंडखोरीची लागण रामदास कदम यांनाही झाल्यानंतर काल आपल्या शिवसेना नेते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करत शिवसेनेतील फुटीमागे शरद पवार असल्याचा गंभीर आरोप करत अजित पवारांवरही रामदास कदम यांनी निशाणा साधला. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर आरोपांच्या फैरी झाडत म्हणाले, …
Read More »जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील जनता संकटात असताना मंत्रिमंडळ जाग्यावर नाही… पेट्रोल - डिझेलचे दर कमी करुन दिलासा दिला मात्र तो दिलासा विजेचे दर वाढवून हिरावून घेतला
महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील शेतकरी संकटात सापडला असून जिरायत शेतीला तात्काळ ५० हजार व बागायत शेतीला एक लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई द्यावी आणि एसटी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपयांची मदत द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे आज निवेदन देऊन केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे …
Read More »उपराष्ट्रपतीसाठी शिवसेनेचा पाठिंबा कोणाला? संजय राऊत यांनी केले स्पष्ट मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा देणार असल्याचे केले स्पष्ट
शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी भाजपाच्या पाठिंब्याने राज्यात सरकारही स्थापन केले. त्यानंतर या बंडखोरांकडून भाजपाशी जुळवून घ्या म्हणून उध्दव ठाकरे यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केले. त्यातच खासदार राहुल शेवाळे यांनी उध्दव ठाकरे यांना पत्र लिहित राष्ट्रपती पदासाठी भाजपाच्या उमेदवार असलेल्या द्रोपद्री मुर्मु यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी …
Read More »शरद पवार यांनी केली घोषणा, विरोधकांकडून उपराष्ट्रपती पदासाठी मार्गारेट अल्वा भाजपाचे उमेदवार धनकड यांच्याशी देणार लढत
राष्ट्रपती पदासाठी भाजपाने द्रोपदी मुर्मु यांना उमेदवारी जाहिर केल्यानंतर काल संध्याकाळी उपराष्ट्रपती पदासाठी जगदीप धनखड यांचे नाव भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी जाहिर केले. त्यानंतर देशातील सर्व विरोधी पक्षांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरी झाली. त्यानंतर विरोधकांकडून धनखड यांच्या विरोधात काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी निश्चित …
Read More »जयंत पाटील म्हणाले, …तर आता जीएसटीमुळे ब्रिटीशकालीन इतिहासाची पुनरावृत्ती होणार सुट्या अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तुंवरील जीएसटी आकरणीवर दिला इशारा
केंद्र सरकारने आपले बिघडलेले आर्थिक गणित सुधारण्याच्या उद्दिष्टासाठी सुट्या अन्नधान्यावर आणि जीवनावश्यक वस्तूंवर ५ टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका जसा व्यापाऱ्यांना बसणार आहे तसा तो सर्वसामान्य नागरिकांनाही बसणार आहे. परिणामी या जीएसटी कराची वसुली व्यापारी ग्राहकांकडूनच करणार असल्याने महागाईत आणखी वाढ होऊन सर्वसामान्य जनतेच्या खिशावर त्याचा …
Read More »
Marathi e-Batmya