राष्ट्रपती पदासाठी भाजपाने द्रोपदी मुर्मु यांना उमेदवारी जाहिर केल्यानंतर काल संध्याकाळी उपराष्ट्रपती पदासाठी जगदीप धनखड यांचे नाव भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी जाहिर केले. त्यानंतर देशातील सर्व विरोधी पक्षांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरी झाली. त्यानंतर विरोधकांकडून धनखड यांच्या विरोधात काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी निश्चित करण्यात आल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.
आज दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी बिगरभाजपा विरोधी पक्षांची बैठक झाली. या बैठकीमध्ये विरोधी पक्षांच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून मार्गारेट अल्वा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यासंदर्भात बैठकीनंतर या पक्षांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शरद पवारांनी माहिती दिली.
आज दुपारी दिल्लीतील शरद पवारांच्या ६ जनपथवरील निवासस्थानी बिगर भाजपा विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला एकूण १७ पक्षांचे नेते उपस्थित होते. यावेळी सर्वांनी एकमताने मार्गारेट अल्वा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सर्व बिगर भाजपा पक्षांपैकी अनेकांशी आमची चर्चा झाली. देशाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आमच्याकडून आम्ही एक उमेदवार घोषित करण्याचा निर्णय घेतला. मार्गारेट अल्वा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्या केंद्र सरकारमध्ये मंत्री होत्या, राज्यपाल म्हणून देखील त्यांनी कारभार पाहिला आहे. त्या राज्यसभा सदस्य देखील होत्या. आम्ही काही नावांवर चर्चा केली आणि शेवटी एकमताने मार्गरेट अल्वा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षांचा अल्वा यांच्या नावाला काँग्रेस, डीएमके, सपा, एनसीपी, आरजेडी, शिवसेना, टीआरएस, आरएसव्ही, मणी काँग्रेस, एमडीएमके, सीपीआय, सीपीआयएल, नॅशनल काँग्रेस, आरएलडी अशा एकूण १९ पक्षांचा पाठिंबा अल्वा यांच्या उमेदवारीसाठी मिळाला आहे. आम्ही ममता बॅनर्जींनाही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या बैठकीमध्ये होत्या. आम्ही अरविंद केजरीवाल यांनाही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याकडून असा निरोप आला आहे की त्यांनी ज्याप्रमाणे विरोधी पक्षांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी पाठिंबा दिला, तसाच देखील ते पाठिंबा देतील असेही त्यांनी सांगितले.
येत्या मंगळवारी अर्थात १९ जुलै रोजी मार्गारेट अल्वा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विरोधी पक्ष जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
बहुतांश विपक्ष दलों ने हमारे उम्मीदवार को अपना सपोर्ट दिया हैं। हमने श्रीमती ममता बॅनर्जी को संपर्क करने की कोशिश की, लेकिन वह एक परिषद में व्यस्त होने के कारण संपर्क हुआ नहीं। इसके साथ हमनें अरविंद केजरीवाल जी को भी संपर्क किया। उनका निर्णय अभी आना बाकी है। pic.twitter.com/r4n1P7AKkx
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 17, 2022
Marathi e-Batmya