मुंबई: प्रतिनिधी राज्यात सध्या रेमडेसिवीर औषधांचा तुटवडा असताना या औषधांचा मोठा साठा मुंबईत येणार असल्याची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्माच्या मालकाला ताब्यात घेतले. याची माहिती मिळताच देवेंद्र फडणवीस विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यासोबत काल रात्री पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी त्यांनी कारवाईवरुन पोलिसांना जाब देखील …
Read More »केंद्राने साठेबाजी, काळाबाजार करण्याची फडणवीस व भाजपाला परवानगी दिलीय का? पोलीस कारवाईत अडथळा आणणाऱ्या फडणवीस, दरेकर व प्रसाद लाडविरोधात कारवाई करा- नाना पटोले
मुंबई: प्रतिनिधी मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री रेमडेसिवीरची साठेबाजी करणाऱ्या एका कंपनीच्या व्यवस्थापकाला व मालकाला ताब्यात घेतले असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांनी हस्तक्षेप करून पोलिसांवर दबाव टाकून त्याला सोडवले आणि तो साठा भाजपाने केंद्रीय मंत्र्यांच्या परवानगीने मिळवल्याचा दावा केला. वास्तविक रेमडेसिवीरचा साठा खाजगी व्यक्तीला करता येत नाही तर …
Read More »साठेबाजी करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर भाजपा का घाबरली? राज्यात रेमडेसिवीरचा साठा मिळू नये यासाठी भाजपचा प्रयत्न- नवाब मलिक
मुंबई: प्रतिनिधी रेमडीसीवीरचा साठा करणार्या ब्रुक्स फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया याला बीकेसी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर राज्यातील भाजपा का घाबरलीय? राज्यातील भाजप वकिली करण्यासाठी का जातेय याचं उत्तर भाजपने जनतेला द्यायला हवे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक केली. रात्रीच्या वेळी पोलिस स्टेशनमध्ये दोन विरोधी पक्षनेते …
Read More »हे करा… ते करा बोलणं योग्य नाही, गुजरात मॉडेलचे बघा भाजप नेत्यांवर नवाब मलिक यांचे टिकास्र
मुंबई: प्रतिनिधी देशात लॉकडाऊन करताना मोदींनी कुणाला विचारात घेतलं नाही किंवा कुणाच्याही खात्यात पैसे जमा करण्याचा कार्यक्रम केला नाही. नुसत्या राजकारणासाठी हे करा ते करा बोलणं योग्य नसल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला लगावत गुजरातमधील गुजरात मॉडेलचे काय होत आहे त्याकडेही लक्ष द्या …
Read More »सर्वपक्षिय नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले हे संकेत कडक निर्बंधाशिवाय दुसरा पर्याय राहीला नाही
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील. आपल्याला प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहिजे. विरोधी पक्ष नेत्यांनी दिलेल्या सूचनांवर निश्चितपणे गांभीर्याने विचार केला जाईल, त्यांनी चांगल्या …
Read More »परिक्षार्थींच्या मागणीनुसार रविवारची एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली राज ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांची विनंती आणि एमपीएससीची परिक्षा रद्द
मुंबई : प्रतिनिधी पुणे येथे झालेल्या भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीची परिक्षा ११ एप्रिल २०२१ रोजी घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने आता परिक्षार्थींनीच परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी म्हणजे …
Read More »भाजपाच्या आरोपांच्या खळखळाटाला मविआकडून थंडपणाने बांध मुख्य सचिवांच्या अहवालाने सुरुवात
मुंबई: विशेष प्रतिनिधी अँटालिया प्रकरणात मनसुख हिरेन यांचा मृत्यूदेह आढळून आल्यापासून राज्यातील राजकिय वातावरण सातत्याने तापत राहिले असून कधी निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे तर कधी परमबीर सिंग यांचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि आता पोलिस दलाच्या बदल्यांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अहवालावरून सातत्याने महाराष्ट्र कधी नव्हे …
Read More »बंजारा समाजाच्या तांड्यांना मिळणार महसूली गावांचा दर्जा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील बंजारा समाजाच्या तांड्यांना व वस्त्यांना महसुली गावांचा दर्जा देण्यासंदर्भात लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल अशी माहिती, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधान परिषदेत दिली. या संदर्भात सदस्य राजेश राठोड यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना थोरात बोलत होते. औरंगाबाद विभागात परभणी जिल्ह्यातील जिंतूर …
Read More »केंद्रातील भाजपा सरकारला फडणवीसांनी दिला घरचा आहेर लॉकडाऊनमुळे लोकांचे कामधंदे बंद झाल्याची कबुली
मुंबईः विशेष प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमध्ये अनेक नागरीकांचे काम-धंदे रोजगार गेले आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असल्याची स्पष्ट कबुली राज्यातील भाजपाचे नेते विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य जनतेला आर्थिक फटका बसत असल्याचे किंवा अनेकांचे रोजगार गेल्याने नागरीकांसाठी कोणत्याही पध्दतीचे पॅकेज देण्यास एकाबाजूला …
Read More »विधिमंडळ अधिवेशनाच्या कालावधीवरून सत्ताधारी विरोधक आधीच भिडले सांसदीय कामकाज मंत्री परब आणि विरोधी पक्षनेते दरेकरांचे एकमेंकाविरोधात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी
मुंबई: विशेष प्रतिनिधी अर्थसंकल्पिय अधिवेशन बैठकीचे नियोजन करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांची आज बैठक झाली. मात्र अधिवेशनाच्या कालावधीवरून बैठकीत एकमत न झाल्याने विरोधकांनी विधिमंडळ कामकाज सल्लागार मंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याची माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सांगितले. तर सासंदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी विरोधी पक्षनेत्यांचा हा आरोप खोडून …
Read More »
Marathi e-Batmya