महाराष्ट्राने सहकार चळवळीचे मर्म शंभर वर्षांपूर्वीच समजून घेत शेतकऱ्यांना आर्थिक बळ दिले. आजही सहकार हेच ग्रामीण विकासाचे सर्वात प्रभावी साधन ठरत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे सहकार क्षेत्राला नवे बळ मिळत असून, शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत कर्ज व विकास पोहोचविण्यात सहकारी संस्थांची भूमिका निर्णायक ठरत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, राज्यातील ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा यावर्षाअखेरीस उर्वरित २५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न
राज्यात सध्या वीजेची कोणतीही टंचाई नसून कृषी पंपांना नियमानुसार दिवसा आठ तास वीजपुरवठा केला जात आहे. राज्यातील सुमारे ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली असून उर्वरित २५ टक्के शेतकऱ्यांनाही यावर्षाअखेरीस दिवसा वीजपुरवठ्याच्या कक्षेत आणण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य सदाभाऊ …
Read More »योगेश कदम यांची माहिती, बांग्लादेशी घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी ‘विशेष कृतीदल’ सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांनी सरकारला धारेवर धरले
मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये अवैधरित्या वास्तव्य करणार्या बांग्लादेशी घुसखोरांमुळे शहराची सुरक्षा धोक्यात आली असून यामुळे ‘लॅण्ड जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’चे प्रकार वाढले आहेत. बांग्लादेशी घुसखोरांमुळे मुंबईच्या पारंपारिक व्यवसायांवर आणि सुरक्षेवर गदा येत आहे. बांग्लादेशी घुसखोर स्थानिक हिंदूंना त्यांच्याच घरातून बाहेर काढत आहेत. हा विषय अत्यंत ज्वलंत असून मुंबईसह राज्याला बांग्लादेशी मुक्त करण्यासाठी …
Read More »कुणाल कामरा हक्कभंग समितीसमोर हजर पण तक्रारदार गायब सुनावणी १० मार्चपर्यंत तहकूब
स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा मंगळवारी महाराष्ट्र विधान परिषदेच्या विशेषाधिकार हक्कभंग समितीसमोर हजर झाले. हा प्रकार एकनाथ शिंदे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याशी संबंधित आहे. मात्र मुख्य तक्रारदार गैरहजर राहिल्याने सुनावणी १० मार्चपर्यंत तहकूब करण्यात आली. समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांनी सांगितले की, तक्रारदार प्रवीण दरेकर उपस्थित नसल्यामुळे कुणाल कामरा …
Read More »रामदास आठवले यांच्या रिपाईकडून ३९ उमेदवारांची यादी जाहिर; प्रविण दरेकर भेटणार आठवलेंना मुख्यमंत्री फडणवीस रामदास आठवले यांची नाराजी दूर करणार
नुकतेच मुंबई महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने रिपाईचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीबाबत जागा वाटपाच्या संदर्भात नाराजी व्यक्त करत भाजपाकडे किमान १६ जागा मागितल्या. परंतु भाजपाचे विधान परिषदेतील गटनेते प्रविण दरेकर यांनी रामदास आठवले यांची नाराजी दूर करणार असल्याचे जाहिर केले. मात्र आज रामदास आठवले यांनी त्यांच्या पक्षाच्यावतीने ३९ …
Read More »रामदास आठवले यांची मागणी, महायुतीने रिपब्लिकन पक्षाला किमान १६ जागा सोडाव्या जागा वाटपातील चर्चेत झालेली रिपब्लिकन पक्षाची नाराजी मुख्यमंत्र्याकडे आठवले मांडणार
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने रिपब्लिकन पक्षाला किमान १६ जागा सोडाव्यात. महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेत रिपब्लिकन पक्षाला सन्मानाने बोलाविले नाही आणि चर्चेत सहभागी करुन घेतले नाही. त्याबद्दल रिपब्लिकन कार्यकर्त्यामध्ये तीव्र नाराजी आहे. ही नाराजी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून उद्या मांडणार आहोत. अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसापुर्वी रिपब्लिकन पक्षाला महायुतीकडुन …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दहीहंडी द्वारे गोविंदा पथकांचा सैन्य दलाच्या शौर्याला सलाम शहर व उपनगरातील विविध दहीहंडी कार्यक्रमांना भेट देऊन नागरिकांना शुभेच्छा
“ऑपरेशन सिंदूर द्वारे भारतीय सैन्य दलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्धार आणि विचार प्रत्यक्षात उतरवला. पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणे नष्ट करून शत्रूला धडा शिकविला आणि आपल्या शौर्याची जगासमोर प्रचीती दिली आहे. आजच्या या दहीहंडी उत्सवातून गोविंदा पथकांनी सैन्य दलाच्या शौर्याला सलाम करण्याचे सुंदर काम केले आहे,” असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »उदय सामंत यांचे आश्वासन, ट्रान्झिट कॅम्पमधील रहिवाशांना दिलासा देण्यासाठी कायदा करणार विधान परिषदेतील लक्षवेधीला उत्तर देताना दिली माहिती
मुंबईमध्ये अनेक चाळी आणि वसाहतींचा पुनर्विकास होत आहे. या पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये ठेवण्यात येते. या ट्रान्झिट कॅम्पचे भाडे तसेच प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याबाबत लवकरच कायदा करणार, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य शशिकांत शिंदे यांनी ताडवाडी येथील बीआयटी इमारतीच्या पुनर्वसन प्रकल्पाबाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला …
Read More »कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव भाजपाच्या आ. प्रविण दरेकरांनी मांडला हक्कभंग
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक कविता सादर केली होती. तिच कविता, त्याच चालीत, ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी बोलताना बोलून दाखवली होती. याचे पडसाद आज विधान परिषदेच्या सभागृहात उमटले. भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करणार भाजपाच्या प्रविण दरेकर यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
भविष्यातील प्रकल्पांसाठी तसेच आवश्यक निधीच्या तुटवड्याचे संकट सोडवण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रस्तावानुसार कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. कोकण रेल्वे महामंडळांदर्भात विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कोकण रेल्वे …
Read More »
Marathi e-Batmya