Tag Archives: Ramlila Ground

एकनाथ शिंदे यांची टीका, ‘लोकशाही बचाव’चा ढोंगी नॅरेटिव्ह उघडा पाडा मुंबई मनपामध्ये 'नोट चोरी' करणारेच आज व्होट चोरीची भाषा करायला लागले..

‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’च्या नावाखाली काँग्रेस, इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात फेक नॅरेटिव्ह पसरवत आहेत. १९७५ मध्ये आणीबाणी होती; तेव्हा नेते तुरुंगात, आणि माध्यमांवर बंदी होती. आज विरोधक जंतरमंतरवर आंदोलन करतात, मोर्चे काढतात, पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन करतात आणि तरी लोकशाही धोक्यात असल्याचा दावा करतात, असा घणाघात उपमुख्यमंत्री …

Read More »

इंडिया आघाडीच्या रामलीला मैदानावरील सभेवर भाजपाच्या अमित शाह यांची टीका अमित शाह म्हणाले की, याच दिवशी शीख दंगल झाली होती

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी काँग्रेस आणि त्यांचे नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. विरोधी पक्षांनी १ नोव्हेंबर रोजी दिल्लीत आयोजित केलेल्या मोर्चावरून अमित शाह यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. त्यांनी आरोप केला की, काँग्रेसने जाणीवपूर्वक अशा दिवसाची निवड केली आहे, जो १९८४ च्या शीखविरोधी दंगलींशी संबंधित आहे—ज्या दंगलींमध्ये …

Read More »

इंडिया आघाडीच्या मोर्चात तेजस्वी यादव यांचा महाभारताचा संदर्भ, तर ममता बँनर्जी यांची बालगीतातून भाजपावर टीका मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासह मोदी-शाह यांच्यावर टीकेचा भर

अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरीच्या प्रकरणापासून ते महाभारतातील संदर्भापर्यंत आणि एका लोकप्रिय बालगीताच्या बदललेल्या रूपापर्यंत, रविवारी दिल्लीच्या रामलीला मैदानावर झालेल्या ‘इंडिया’ (INDIA) आघाडीच्या रॅलीत अनेक संदर्भ पाहायला मिळाले. याद्वारे विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर एकत्रित हल्ला चढवला. ‘इंडिया’ आघाडीने मिंटो रोड-कनॉट प्लेस जंक्शनपासून …

Read More »

दिल्लीतील महारॅलीसाठी महाराष्ट्रातून काँग्रेसचे ५ हजारांहून अधिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते जाणार.. १ नोव्हेंबर रोजी रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची वोट बचाओ, देश बचाओ भव्य महारॅली..

दिल्लीच्या रामलीला मैदानावर १ नोव्हेंबर २०२६ रोजी इंडिया आघाडीची महारॅली होत आहे. या महारॅलीत सहभागी होण्यासाठी राज्यातील, प्रमुख नेते खासदार, आमदार, माजी मंत्री, माजी आमदार, माजी खासदार, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, काँग्रेसचे विविध सेल व विभागाचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. दिल्लीतील महारॅलीसाठी महाराष्ट्रातून काँग्रेसचे पाच हजारांहून अधिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते …

Read More »

राहुल गांधी ज्ञानेश कुमार बाबत म्हणाले की, गॉन इन ३० सेंकड्स ज्ञानेश कुमारला पदावरून हटवल्यास ३० सेंकदात निदर्शने थांबतील

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी दिल्लीतील दुकानदार आणि व्यापाऱ्यांना, मतदार पुनर्पडताळणी प्रक्रियेत (SIR) कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या देशव्यापी निदर्शनांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. विरोधी पक्षनेते म्हणाले, “दिल्लीतील प्रत्येक व्यापाऱ्याला सांगू इच्छितो: आम्ही तुमच्या भावना समजतो आणि तुमच्या पाठीशी आहोत. …

Read More »

भाजपाचे आभार मानत राहुल गांधी यांची नव्या आंदोलनाची घोषणा १ नोव्हेंबर रोजीपासून रामलीला मैदानावर मत वाचवा-देश वाचवा महारॅली

मागील काही दिवसांपासून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहेत. त्यावर केंद्र सरकारकडून पोलिसी बळाचा वापर करत दाबण्याचा प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेससह विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारच्या दबावाला भीक न घालता आंदोलने करण्यात येत आहेत. त्यानुसार विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यावेळी भाजपाचे आभार मानत …

Read More »