मागील काही दिवसांपासून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहेत. त्यावर केंद्र सरकारकडून पोलिसी बळाचा वापर करत दाबण्याचा प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेससह विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारच्या दबावाला भीक न घालता आंदोलने करण्यात येत आहेत. त्यानुसार विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यावेळी भाजपाचे आभार मानत आपल्या नव्या आंदोलनाची आणि त्याच्या तारखेची घोषणा केली. तसेच यासंदर्भात एक्सवर पोस्टही केली आहे.
निवडणूक आयोगातील अन्य दोन आयुक्तांनी मुख्य निवडणूक आयुक्तांनी काही निर्णय परस्पर घेतले. ही माहिती दिल्यापासून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच मोदी सरका व्होटचोरी करून सत्तेत आल्याचही राहुल गांधी सातत्याने सांगत आहेत. हाच मुद्दा केंद्रस्थानी ठेवत केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलनेही केली जात आहेत. याचाच पुढचा टप्पा म्हणून आता १ नोव्हेंबरला आंदोलन रामलीला मैदानावर करण्यात येणार आहे.
हमारा वोट चुराया जा रहा है और ये हम किसी हाल में चुपचाप नहीं सहेंगे।
मतदाता सूचियों से नाम काटे गए। नियम-कानून तोड़े गए। और सवाल पूछने वालों पर लाठियां चलीं।
अब जवाब देश देगा।
1 नवंबर – चलो दिल्ली।
वोट बचाओ – देश बचाओ जन मार्च और महारैली।छात्र, किसान, मज़दूर, महिलाएं, नौजवान और व्यापारी – जिस-जिस को लोकतंत्र की फ़िक्र है, वो ज़रूर आए।
वोट आपका है। लड़ाई भी आपकी है।
📍 रामलीला मैदान, नई दिल्ली
PS: BJP और उसके साथियों का दिल से धन्यवाद, जो इस कार्यक्रम का इतना ज़ोर-शोर से प्रचार कर रहे हैं और इसे ज़्यादा से ज़्यादा लोगों तक पहुंचा रहे हैं।
बस अगले 7 दिन भी यही जोश और लगन बनाए रखिए!
#ChaloDilli
#RamlilaMarch— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 25, 2026
एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, आमच्या मतांची चोरी केली जाते आहे आणि ही बाब आम्ही शांतपणे बघत बसणार नाही. मतदार याद्यांमधून नावं वगळली गेली. नियम आणि कायदा धाब्यांवर बसविण्यात आले. याबाबत प्रश्न विचारले तेव्हा लाठ्या चालल्या. आता उत्तर देश देणार. १ नोव्हेंबरला चलो दिल्ली, व्होट बचाओ मार्च आणि महारॅली विद्यार्थी शेतकरी मजूर महिला तरूण तरूणी आणि व्यापारी. ज्या ज्या लोकांना लोकशाहीची काळजी आहे त्या सगळ्यांनी रामलीला मैदानावर या असे आवाहन करत मत तुमचं आहे आणि लढाईही तुमचीच आहे. भाजपा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार कारण या आंदोलनाची चर्चा त्यांचेच लोक करत आहेत. आणि ही माहिती घरांघरामध्ये पोहोचवत आहेत. पुढचे सात दिवस हाच जोश दाखवा असं म्हणत राहुल गांधी यांनी ही खोचक पोस्ट लिहिली.
दरम्यान भाजपाने १ नोव्हेंबरच्या या रॅलीवर आक्षेप घेतला आहे. कारण १९८४ ला याच दिवशी शीख विरोधी दंगे भडकले होते. भाजपाचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद म्हणाले की, काँग्रेसने १ नोव्हेंबरला रॅलीची घोषणा करून संवेदना शुन्य असल्याचं दाखवून दिलं. दुसरीकडे राहुल गांधी यांनी आंदोलन पुढे ढकलावं कारण देशभरात दिवाळी सण साजरा होणार आहे. त्यामुळे आंदोलन करून लोकांच्या आनंदावर विरजण टाकू नये असेही यावेळी म्हटलं.
Marathi e-Batmya